पायथ्यापासून सिंहगडावर चालत जाण्याचा प्रवास सुद्धा जीवन संघर्षाची कित्येक गुपिते सोडवतो. पहिल्या पावलासोबत असणारा उत्साह पावला पावला गणिक वाढत जातो. पायथ्यापासून ना रस्ता दिसतो ना, ना वळण फक्त पुढे चालणारी काही माणसं.. काही आपल्या पुढे, काही आपल्या सोबत आणि काही मागाहून येणारी बऱ्याच वेळा समोर दोन-दोन, तीन-तीन वाटा दिसतात, जेव्हा कोणती वाट निवडावी असा प्रश्न पडतो तेव्हा आपल्या पायांच्या आणि मनाच्या निवडीची वाट एकच असेल असं नाही. पाय नेहमीच साधी सरळ वाट निवडू पाहतात मग ती लांब असली तरी चालेल पण तारुण्याच्या म्हणा किंवा उत्साहाच्या मनातल्या किड्याला ते पटत नाही. थोडी अवघड, आडवळणाची किंवा थ्रिल वाटावी अशी वाट तो निवडतो. सरळ उंच दगडांवर हात टेकत टेकत जरी चढू लागलो तरी पायांवर येणाऱ्या ताणामुळे हुसस्स आणि फुसस असे श्वासोच्छ्वास बाहेर पडू लागले की मग सुरू होतो संघर्ष. शेवटचा 20-30 मिनिटांचा टप्पा म्हणजे अगदीच क्रूर. वरती पोहोचून कट्ट्यावर बसलेली लोकं खालून येणाऱ्या लोकांची सर्कस पाहत असतात आणि खालून आपल्याला तो कट्टा खुणावू लागतो की बस्स आता थोडंच राहिलंय. गळून लटपटणारऱ्या आणि डळमळणाऱ्या पायांसोबत मनाचा उत्साह ही डळमळू लागतो की एवढ्या गुलाबी थंडीत रविवारच्या दिवशी मस्त पांघरून ओढून झोपायचं सोडून, एवढ्या हापसत हापसत सिंहगड चढायची कोठून दुर्बुद्धी सुचली. अगदी 10-15 मिनिटांच्या वाटेवर पाय साथ सोडून देतात आणि थांबावं लागतं. वर किल्ल्याकडे पाहून आपण वरती पोहचू की नाही अशी शंका मनात येऊ लागते तेव्हा. परतीच्या वाटेवरून उतरणारे एखादे आजोबा चेतवतात. "अ हं..सिंहगड चढताना वरती पाहायचं नाही..फक्त पुढचं पाऊल कुठे टाकणार आहात एवढंच पहायचं आणि चालत रहायचं...गडाची उंची पाहिली की पुढचं पाऊल टाकण्याचा उत्साह कमी होतो.. फक्त पुढच्या पावलाची उंची बघ.. गड कधी चढलो कळणार देखील नाही" मनाचा खेळ सगळा...! शेवटी त्या किल्ल्याच्या तटावर बसून "उगवत्या सूर्याला पाहण्याचा अवर्णनीय आनंद... त्याचा प्रत्येक किरण जणू सोबत संदेश घेऊन येत आहे... "तू सूर्य आहेस..!तुझा जन्मच मुळी संपूर्ण सृष्टी उजळविण्यासाठी झाला आहे...!"
रविवार, २३ डिसेंबर, २०१८
सोमवार, ५ मार्च, २०१८
#PaytoProfessor: Part VIII " शिक्षक आजच्या जगाचा, पगाराविना भिकारी"
प्रती,
परमेश्वर,
साष्टांग नमस्कार,
आज तुमच्या दगडूशेठच्या मंदिरात आपणास भेटायला आलो होतो. संकष्टी असल्यामुळे कदाचित तुम्ही बिझी असणार लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यात त्यामुळे आपल्यासोबत सविस्तर बोलता आले नाही. एवढ्या लोकांनी आज तुम्हाला भेट दिली असेल त्यामुळे मी कोण ते अजून ओळखले नसल्यास एक खूण सांगू का? पांढऱ्या गांधी टोप्या घालून २०-३० लोकांची रांग आली होती पहा ज्यांवर
"आम्ही बिनपगारी - आम्ही कर्जबाजारी""२५ वर्ष्यांची नवलाई - शिक्षकांना पगार नाही""गाजर नको-पगार द्या"
वगैरे वगैरे स्लोगन्स लिहिलेले होते... आठवलं ना,
हां त्यातलाच मी एक.
![]() |
| आपल्या विविध मनाण्यांसाठी आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे घातले. |
एरवी मी काही ज्यास्त वेळा तुझ्या दारी आलो नाही. शेवटचं आलो होतो तेव्हा सिंहगड मध्ये जॉब मिळाला म्हणून पेढे घेऊन आलो होतो मी. दहावी, बारावी, CET, BE, GATE, M.Tech करून नंतर डेमो, इंटरव्हिव वगैरे किती उचापती केल्यानंतर हा जॉब मला मिळाला होता याची कल्पना तुला असेलच. कारण प्रत्येक परीक्षेवेळी मी तुझी आठवण नक्की काढली होती. तुही बऱ्यापैकी माझे ऐकून घेतोस कि काय कोणास ठाऊक.. कारण आजपर्यंत अपेक्षेएवढे मिळाले नसले तरी माझ्या प्रयत्नांच्या दृष्टीने योग्य तेवढे मिळाले हे मी आजिबात नाकारत नाही.
जॉब बद्दल कुरकुर नाहीये माझी..
शिक्षकच होणे माझे स्वप्न जरी नव्हते तरी आता मला माझे प्रोफेशन आवडते. समाधानही मिळते. महत्वाचे म्हणजे चारित्र चांगले राहते व विद्यार्थ्यांकडून रिस्पेक्ट जो मिळतो त्याचा आनंद तर वेगळाच आहे.
पण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मी शिकविण्याचे बंद केले आहे. कारण तुला माहित असेलच. पण फक्त १६ महिन्यांपासून पगार झाला नाहीये म्हणून शिकवत नाहीये हे साफ खोटे आहे. असं असते तर पाच वर्ष्यापुर्वीच जेव्हा उशिरा पगार करण्याची पद्धत सुरु झाली तेव्हाच बंद केले असते. किंव्हा दोन-तीन वर्ष्यांची प्रोफेशनच बदलले असते. पण मला माझे काम आवडते, शिकवणे आवडते, मग त्यासाठी थोड्या आर्थिक खस्ता खाल्य्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्ह्णून मी शिकवणे चालूच ठेवले.
पण आता परिस्थिती बदलली आहे. शैक्षणिक सेवा करण्याची संधी तू ज्या संस्थाचालकांना दिली होतीस त्यांचा आता हेतूच बदलला आहे. कदाचित संस्था सुरु करताना त्यांचा उद्देश खरंच शिक्षणाला सर्वोच्च स्थानी ठेऊन त्याची सर्वतोपरी सेवा करणे हाच असेल म्ह्णूनच तू त्यांची एवढी साथ दिलीस आणि इतकी मोठी संस्था उभी झाली. आज मात्र त्यांच्यातला सारथी माणूस जागा झाला आहे व ८०००० विद्यार्थ्यांचे भविष्य व ८००० लोकांची घरे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
![]() |
| प्राध्यापकांना आज फुटपाथवर यावे लागले न जानों भविष्यात अजून काय वाडून ठेवले आहे |
आली आहे कसली म्हणतोय..
सकाळपासून फुटपाथवरच बसून होतो.
आमची सहनशक्ती कितीही असेल तरी आमच्या पगाराच्या जीवावर घरातील अजून ४ जणांचे पोट भरतो आम्ही. मागे-पुढे जर कोणीच नसते तर आयुष्यभर सेवा म्हणून शिक्षकी पेशा पत्करला असता.
आणि हो १६ महिने सहन केलेच ना आम्ही, आमच्या घरच्यांनीही सहन केले. आता मात्र सहन होत नाहीये. तुझ्याकडे येण्या आधी आम्ही सगळया सरकारी संस्थांच्या लोकांसमोर आमचे मागणे मांडून आलो आहोत. पण शेवटी तीही माणसेच.. सोयीसुविधा आणि प्रशासनाच्या नावाखाली अशी व्यवस्था त्यांनी उभारली आहे कि मूळ प्रश्न सोडवणे बाजूला राहून एकत्र ते लोक आपली जबाबदारी हटकून देतात किंवा यातून आपला काय स्वार्थ साधता येतो हे पाहतात. म्हणून शेवटी आता तुझ्याकडे आलोय...
सकाळी त्या फुटपाथवर आमच्या सोबत, अगदी जवळच एक भिकारीही होता. अगदी निवांतपणे लोळत होता. त्याला पाहून माझे मन भरून आले. दोघांमध्ये काहीच फरक राहिला आहे असं वाटत नव्हते. फक्त माझे कपडे नीटनेटके होते इतकेच. पण अश्या परिस्थितीतही त्याच्या चेहऱ्यावर भविष्याची काही चिंता वाटत नव्हती. आजचा दिवस तो माझा म्हणून जगत आहे असे वाटत होते. काही खायला मिळाले तर ठीक नाहीतर उपाशी तर तो रोजच असतो. कपडे इमेज वगैरेचे काही देणेघेणे नाही.. मुक्ती सगळ्यांपासून...
आम्ही मात्र आमच्याकडे दयेने कोण पाहत आहे का? कोणी आमचे म्हणणे, आमचे दुःख ऐकून घेण्यासाठी उत्सुखं आहे का हेच आपल्या केविलवाण्या चेहऱ्याने पाहत होतो.
आमच्या बोलण्यात मुकेपणा आला आहे कि काय जे कोणालाच नीट ऐकू जात नाहीये
कि सगळा समाज, सगळ्या संस्था, सर्व लोक जे जबाबदार आहेत त्यांच्या ऐकण्यात बहिरेपणा आला आहे..
आमच्या मागण्या रास्त नाहीयेत कि आता माणसांकडे करुणाच राहिली नाहीये..
आमचे प्रयन्त निष्फळ आहेत कि आमचा प्रश्नच नगण्य आहे..
हे ज्यामुळे कुठेच-कोणालाच-काहीच फरक पडताना दिसत नाहीये..
शेवटी म्हणून आता तुझ्या दारी जावे म्हणून आलो होतो. एवढ्या गर्दीत तुला ऐकू आले कि नाही कोणास ठेवून पण आमच्या प्रार्थनेत आम्ही तू लगेच आमचा सगळा पगार आम्हास मिळवून द्यावा अशी अपेक्षा केली नाही ते तर आमचे संस्थाचालकच करतील. पण आम्ही सर्व लोकांनी प्रार्थना केली कि या सर्व संस्थाचालकांना सद्बुद्धी दे कि जे काही पैसे हे लोक स्वतःच्या सार्थसाठी वापरत आहेत ते पालकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवले आहेत व त्यावर फक्त ८००० लोकांचे पोट नसून ८००० कुटुंबांचे अवलंबून आहे. त्यांनी एवढे कष्ट घेतले त्यामुळे त्यांनी त्याची मलई खावी आत आमचे पाहू म्हणणे नाही पण शिक्षकांच्या आतड्याना कोरड पडे पर्यंत त्यांनी उच्छाद मांडला असेल तर भविष्यातील पिढ्यामध्ये कोणीही शिक्षक होण्यास तयार होणार नाही याची आम्हाला शिक्षक म्हणून भीती वाटते.
तुझ्या समोर ठेवलेल्या दानपेटी मध्ये टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून जाता जाता त्यात आम्ही आतापर्यंत मिळवलेल्या सर्व डिग्री सर्टिफिकेटची कागदे टाकून जात आहे. त्यांची आता गरज उरली नाही. कारण जीवन जगण्यासाठी फक्त एवढी सर्टिफिकेटची हि कागदेच कामाला येतात यावरून आमचा विश्वास उडाला आहे.
संघर्ष मात्र आम्ही शेवटपर्यंत करत राहू...
शिक्षकांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे हेच आमच्या आंदोलनाचे अंतिम धेय्य आहे,
मग ते तुझ्या आशीर्वादांसोबत किंवा त्याच्या शिवाय..
पुन्हा एकदा नमस्कार..!
तुझाच
गुरुवार, १ मार्च, २०१८
#PaytoProfessor : Part-VII "#प्रेसिडेंट सर - आज खुश तो बहोत होगे तुम "
#MurderofTeachingFraternity
आदरणीय प्रेसिडेंट सर,
सस्नेह दंडवत,
(फक्त नमस्कार आपणास कमीपणा वाटला असता म्हणून झोपून दंडवत घालतोय)
थोड्याच वेळापूर्वी होळीच्या भोवतीने बोंबलणाऱ्या लहान पोरांना पाहताना गेल्या तीन महिन्यातील सिंहगडच्या प्राध्यापकांची अवस्था आठवली म्हणून व काल आणि आज आम्ही आपल्या फार्म हाऊसवर आपणास भेटायला होतो पण आपण भेटला नाहीत म्हणून सरळ पत्रच लिहितोय.
खूपच सुरेख बांधलाय हो फार्म हाऊस.. NDA च्या गेटवरच्या आर्मीच्या लोकांना आम्ही चक्क खोटे सांगून आत आलो की आम्ही मातेच्या मंदिरात जाण्यासाठी आलो आहोत ते. नाहीतर उन्हात फिरून काळपटलेल्या चेहऱ्याने त्या गंजक्या स्पेण्डर वरून तुम्हाला भेटण्यासाठी चाललो आहोत असं जर त्या आर्मीवाल्याना सांगितले असते तर तिथेच त्यांनी चोर समजून चोप दिला असता.
आम्ही आलोत तेव्हा तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी गार्डने आपणास बहुदा सांगितले असावेच. पण तुम्ही आत बोलावले नाहीत. कदाचित अचानक येणारे पाहुणे तुम्हाला आवडत नसावेत. त्यामुळे आम्ही बाहेरच उभे राहिलो.
आपल्या फार्म हाऊसच्या भिंती किती उंच आहेत सर. वर चढून पाहता येणे शी शक्य नाही. कॅम्पाऊंट वॉलच्या फटींमधून आम्ही थोडा डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आपला आलिशान बंगला, आलिशान गाड्या, सुंदर गार्डन आणि हो महत्वाचे म्हणजे पेट हाउस ही दिसले. त्या पेट हाऊस मध्ये नक्की कोणता प्राणी तुम्ही पाळला आहे ते काही पाहायला मिळाले नाही मात्र दोन-तीन प्राणी बाहेर हुंदडताना दिसली पण ती माणसांसारखीच वाटत होती. पाठीमागे स्विमिंग पूल आहे असेही कळाले पण पाहता आले नाही. बरे झाले तुम्ही स्विमिंग पूल पुढे बांधला नाही ते नाहीतर माझ्यासारख्याला पोहल्यावाचून राहवले नसते (पगार नाही कमीतकमी एंटरटेनमेंट तरी झाली असती..!)
आर्मी च्या संरक्षणात असतानाही आपण 10-12 बॉडीगार्ड व सेक्युरिटी गार्ड पण कामाला ठेवलेत. त्यात आणखी भर म्हणून कि काय बाहेर पोलिसांची तुकडीही आली होती . आम्ही आता पर्यंत असे समजत होतो की एवढे संरक्षण फक्त राष्ट्रपतींना असते की काय. पण तुमची जहांगीर पाहून उर अभिमानाने भरून आला कि आमचे प्रेसिडेंट देशासाठी किती महत्वाचे आहेत ते पहा. (8000 लोकांची उधारी असेल तेव्हा एवढी सिक्युरीटी लागणारच पण असो)
कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत ही केवढी मोठी संस्था.. जर सिंहगडचे संस्थापक NDA रोड वर फार्म हाऊस बांधू शकतात त्या हिशोबाने तर भाऊराव पाटलांनी तर व्हाईट हाऊस मध्ये राहायला पाहिजे होते असा एक विचार मला मनात येऊन गेला. पण पैश्यांचा योग्य वापर कसा करावा हे मी आपणाकडून शिकलो (भले मग ते पैसे कोणाचेही असोत)
या दोन-तीन महिन्यात आपण आम्हास खूप काही शिकवले...
सर्वात महत्वाचे म्हणजे १६ महिने पगार नसतानाही आपण निस्वार्थ पणे आपल्या कार्याला कसे वाहून घ्यावे हे आपण शिकविले नाहीतर आमच्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच आत्महत्या करून मोकळा झाला असता..
आम्हाला आमचे अधिकारच माहित नव्हते एव्हाना आमच्यावर अन्याय झालाच तर कोणाला दाद मागायची हेही आम्हाला माहित नव्हते. आपण आम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे AICTE, DTE, विद्यापिठ, समाजकल्याण, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन इतकेच काय अगदी मंत्रालयातही जाण्यासाठी मजबूर केले. आणि बरं झालं केलंत ते नाहीतर आम्ही आयुष्यात कधी एवढ्या साऱ्या विभागांना व मंत्र्यांना भेट दिली नसती.
![]() |
| प्राद्यापकांना पोलिसांनी आपल्या गाडीतून पोलीस स्टेशन ला नेले गुन्हा काय? - १६ महिन्याच्या पगारासाठी शांततेत आंदोलन केले. |
![]() |
| पोलीस गाडीतून उतरताना प्राध्यापक |
एवढे मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपण किती खस्ता खाल्ल्यात याचा विचार न करता आपण १६ महिने पगार काय केला नाही तर सगळ्या प्राध्यापकांनी एवढे वैतागण्यासारखे काय आहे त्यात.
२५ वर्षे आपण आपल्या रक्ताचे पाणी करून हे सर्व उभारले मग थोडे रक्त आपल्या प्राध्यापकांचे थोडे विद्यार्थ्यांचे व थोडे पालकांचे रक्त शोषून पिलात तर एवढा कुठे काय तुम्ही गुन्हा केलात. सगळे संस्थाचालक ते हेच करतात काही संस्थाचालक तर तुम्हालाच मार्गदर्शक मानून आपल्या पावलावर पाय टाकत आहेत. वेडे आहेत का ते लोक मग? आणि एवढ्या साऱ्या पैश्यांवर डल्ला मानून विजय मल्ल्या किंवा त्या निरव मोदी सारखे पळून न जाता इथेच सर्वांच्या नाकावर तिवंचून राहण्यासाठीची तल्लख बुद्धी आपल्या कडे आहे व आमच्याकडे नाही त्यात तुमची काय चुकी?
आपण आमची काही काळजी करू नका सर..!
आम्ही आता उपोषण सुरु केले आहे त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च पण वाचलाय. १६ महिने पगार होत नाही हे पाहून लोक दयेने आमच्याकडे पाहतात त्यामुळे घरमालक, दूधवाले, ट्राफिक पोलिसवाले आता आमच्याकडे पैसेही मागत नाहीत. उन्हा-तान्हात फिरून आमची स्किन थोडी टॅन झाली आहे इतकेच (पैसे आल्यानंतर आपण आपल्या फॅमिली ब्युटी पार्लर वाल्याकसून आम्हाला फेशिअल करून द्यावे एवढीच विनंती. तोपर्यंत आम्ही शेविंग देखील करत नाही. तेवढेच पैसे वाचतील.)
बहुतेक वेळा आम्ही तुमच्याकडून ऐकले आहे की आपण सारे एकच फॅमिली आहोत. मग फॅमिली मधील 99 % लोकांनीच का नेहमी त्रास घ्यावा व मोजक्याच लोकांनी ऐषोआराम का करावा हे आमच्या मूर्ख आई-वडिलांना सांगूनही समजत नाही. त्यामुळे मी तर माझ्या घरी जाणेच बंद केले आहे. तीन दिवस सुट्टी आहे म्ह्णून घरी ये म्हणत आहे आई पण मला काम आहे म्हणून मी जायचे टाळले (उगाच पैसे खर्च नको म्ह्णून मी घरी येत नाही एवढी न समजण्याजोगी माझी आई आडाणी नाही तरीही). एवढे सांगूनही ऐकत नाहीत ते. उद्या येणार आहेत म्हणे भेटायला (पाहायला मी जिवंत आहे का ते). आणि उगाचच लहान असल्यासारखे आता गावाकडून भाजीपाला-धान्य आणि बरेच काही घेऊन येतील आता (जणू काही आता मी १६ महिने पगार नसल्याने उपाशी पोटी मारणार आहे कि काय असे त्यांना वाटत असेल)
असो.
आपणाकडून अजून बरेच काही शिकायचे आहे. जितके शिकवलं तितके कमीच आहे.
आपल्या प्राध्यापकाची प्रगती पाहून आपणाला आनंदच होत असेल असेल यात शंका नाही.
ते म्हणतात ना "प्रेसिडेंट सर - आज खुश तो बहोत होगे तुम ".. त्याप्रमाणे
काळजी घ्या. (म्हणून आपल्या दारासमोर GET WELL SOON असे लिहून आलोय)
पुन्हा एकदा नमस्कार,
आपलेच लाडके
सिंहगडचे प्राध्यापक
शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८
#PaytoProfessor-Part VI "हरएक संवेदनशील प्राध्यापकांस आवाहन"
#PaytoProfessor-Part VI
#ProfessorsInTrouble
"प्रत्येक संवेदनशील प्राध्यापकास आवाहन"
#ProfessorsInTrouble
प्रति,
सर्व प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील प्राध्यापकांस,
शिक्षणक्षेत्राशी संबंधित हरएक व्यक्तीस,
सस्नेह नमस्कार,
शिक्षणक्षेत्राशी संबंधित हरएक व्यक्तीस,
सस्नेह नमस्कार,
सिंहगड संस्थेतील प्राध्यापकांनी १८ डिसेंबर पासून सुरु केलेल्या असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी आपण सर्वाना असेलच अशी अपेक्षा करतो. हे आंदोलन सध्या एक निर्णायक टप्प्यावर आले असून या निवेदनाद्वारे आम्ही सिंहगड असहकार आंदोलनातील सर्व प्राध्यापक, महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग सहित सर्व शिक्षण क्षेत्रातील प्राद्यापकांस आमच्या या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहोत.
तत्पूर्वी आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी,
गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित पगाराची परंपरेने आपला कळस गाठल्यानंतर, कधी ना कधी परिस्तिथी सुधारेल या अपेक्षेने ६ वर्ष्यांच्या आर्थिक कुचंबणे नंतरही गेल्या १६ महिन्यांपासून बिनपगारी काम करत राहिले. आता मात्र असंतोषाची सीमा गाठलेल्या प्राध्यापकांनी पगार न झाल्यास १८ डिसेंबर पासून सुरु होण्याऱ्या दुसऱ्या सेमिस्टर च्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय हा निवेदनाद्वारे ५ डिसेंबर रोजी दिला. म्हणजे व्यवस्थापनास १३ दिवसांचा अवधी देण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हि त्यामागील भूमिका. संस्थेने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आंदोलन सुरु राहिले. दरम्यानच्या काळात आम्ही AICTE, DTE व SPPU ची दारे मदतीसाठी ठोठावली. ८ जानेवारीला आंदोलकांनी चार पावले पुढे येऊन संस्थेसोबत करार केला व प्रलंबित पगार ४ हफ्त्यांमध्ये देण्यास सवलत दिली. पहिला हफ्ता देण्याची तारीख २४ जानेवारी असताना संस्थेने आपला शब्द पाळला नाही. व एक रुपयाही हातात न घेता स्थगित केलेल्या असहकार आंदोलनाला पुन्हा सुरवात करण्यात आली.
AICTE, DTE व SPPU या प्रत्येक विभागाने भेट देऊन आपापला रिपोर्ट तयार केला मात्र कोणीही प्रत्यक्ष कारवाई मात्र केली नाही.
आंदोलक दिवसभर थंडी-उन्हात राहिले, मोर्चे काढले, पायऱ्यांवर, फारशींवर बसले आता १९ तारखेपासून आंदोलकांनी प्रत्येक कॅम्पस प्रमाणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच त्यामुळे सिंहगड लोणावळा कॅम्पस मधील विद्यार्थी यांनीही विद्यापीठात उपोषणास सुरवात केली.
संस्थाचालकांनी मात्र समाजकल्याण विभागाकडून न मिळालेले अनुदान व इन्कम टॅक्स विभागाने गोठविलेल्या बँक खात्यांच्या नावाने इकडे तिकडे अंधारात गोळ्या मारण्यास सुरवात केली व प्रश्न वाढतच गेला.
खरे पाहता विद्यार्थ्यांच्या एकूण फी पैकी ६०% फी जे विद्यार्थी सरळ संस्थेच्या खात्यात भरतात ते पैसे एव्हाना प्राध्यापकांचे सर्व पगार करण्यास सक्षम आहेत. मात्र संस्थाचालकांनी त्यांचा विनियोग आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला आहे हे सांगण्यासाठी आता काय ब्रह्मदेवाने पुन्हा जन्म घ्यावा का?
इतका साधा गैरव्यवहार सुरु आहे हे समजण्यासाठी किती समिती येतात, रिपोर्ट बनवितात आणि जातात मात्र परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. कारण येणारी प्रत्येक समिती धृतराष्ट व गांधारी यांच्या वंशातीलच असावेत. पट्टी असते ती फक्त पैश्याची..
एवढी पार्श्वभूमी आपणास सांगायचे कारण कि कोणत्याही सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला यात आर्थिक घोटाळा आहे हे नक्कीच समजेल. मात्र आपणासारख्या प्राध्यापक लोकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच होत नाही. होत नसेल तर लढायचे धाडस होत नाही.. आणि जरी लढायला सुरवात केली तरी लगेच धारातीर्थी पडतो.
देशातील एकूणच सर्व इंजिनिअरिंग संस्थांची अवस्था जवळपास सारखीच आहे. पगार वेळेत न देणे हा तर नित्याचाच भाग पण, स्केल न देणे, शक्य तितक्या कमी पगारात राबवून घेने, PF न भरणे, अतिरिक्त कामकाजाचे लोड देणे, ऍडमिशन साठी दारोदारी फिरणे, AICTE, DTE, NACC, सेक्शन शुल्क विभाग विद्यापीठ इत्यादी संस्थांना खोटी माहिती देऊन Approval मिळवणे या गोष्टी अगदी सहजपणे चालू आहेत. शिक्षण संस्थेच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने एकूणच शिक्षणाचा खालावलेला दर्जा, व प्राध्यापकांना हीनतेची वागणूक देऊन संविधानिक मूल्यांना पायदळी तुडविले जात आहे.
हा एकूणच देशद्रोहाचा भाग नाही का होत मग ?
एक पिढीच्या-पिढी याला बळी पडत आहे.
उच्चंशिक्षित प्राध्यापक अजूनही जीवनाकडे कर्मयोग्याप्रमाणे पाहतात त्यामुळे या हलाकीच्या परिस्थितीतही आत्महत्येसारखे विचार करत नाहीत एवढेच..
आम्ही सिंहगड संस्थेचे प्राध्यापक मिळून परिवर्तन आणण्यास सुरवात केली आहे.. आम्हाला सुरवात करण्यास उशीर झाला हे मान्यच पण आता आम्ही मागे शकत नाही. यासाठी जी काही किंमत चुकवावी लागेल त्याची मनस्वी तयारी केली आहे..
आम्ही आता आमचे बंधू म्हणून आपण सर्व प्राध्यापकांस आमच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. आपण आपल्या शक्य त्या मार्गानी आमची मदत करू शकता. आम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन आमचा आत्मविश्वास वाढवा. आमची बाजू व आंदोलनाचे टप्पे आम्ही रोजच्या रोज सोशल मेडिया वर पाठवीत आहोत त्या तुम्ही शेअर करा. आम्हाला आंदोलनातील नवीन क्लुप्त्या सांगा. आपल्या ओळखीच्या आमदार, खासदार समाजसेवक यांच्याशी आम्हाला संपर्क करता येईल तर त्याप्रकारे आमची मदत करा... सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यावरही संस्थाचालकांकडून अन्याय होत असेल तर आम्हाला मदतीसाठी बोलावा. तुमच्या तर्फे आम्ही तुमच्या प्रश्नांना वाट फोडून देऊ..
सिंहगड हा फक्त एक चेहरा असून यामध्ये तुम्ही सर्वजण स्वतावर होणाऱ्या अन्यायाची झलक आमच्या चेहऱ्यात पाहू शकता. आम्ही सध्या जात्यात आहोत तुम्ही सध्या सुपात आहात एवढाच फरक.. आम्हाला उशीर झाला.. पण तुम्ही उशीर करू नका... वातावरण चांगल्या बदलांच्या दृष्टीने गरम आहे तर तुम्हीही तुमच्या अन्यायावर घाव घाला....
आपण आपल्या संस्थेतील समस्या आमच्या पर्यंत पोहचवा. त्यासाठी खालील दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करा.
फॉर्ममधील आपण आपली वैयक्तिक माहिती देणे अनिवार्य नाही जरी दिल्यास आपली माहितीची गुप्तता सुरक्षितपणे जपली जाईल याची खात्री बाळगावी.
![]() |
| आपल्या विविध मागण्यांकरिता पुणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात |
![]() |
| आपल्या आंदोलनाची भूमिका जेष्ठ समाजसेवक श्री. आण्णा हजारे यांच्या समोर मांडताना |
![]() |
| श्री. शरद पवार यांना निवेदन |
![]() |
| आमदार श्रीमती. मेधा कुलकणी याना निवेदन देताना आंदोलक |
![]() |
| विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ याने याकरिता आंदोलकांनी कॅम्पस मध्ये झाडाखाली लेक्चर घेण्याससुरवात केली आहे |
गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८
#PaytoProfessor-Part V : "Yes, you are guilty...!"
#PaytoProfessor-Part V
"President Sir, Yes you are Guilty...!"
फौजदार मॅम व समन्वय समितीला समर्पित,
बाहुबली चित्रपटातील माझे सगळ्यात आवडते दोन दृश्य,
पहिला म्हणाल तर; सेतुपती-भल्लालदेवचा निष्ठवंत मित्र ज्याला त्याने नंतर महिष्मती साम्राज्याचा सेनापती बनविले. जेव्हा देवसेना मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जात असते तेव्हा सेतुपती स्त्रियांच्या अंगावर - इज्जतीवर हात टाकत असतो. सेनापतीच्या असल्या निर्लज्ज वागण्याने चिडलेल्या देवसेनेला जेव्हा सेतुपती हात लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अत्यंत चपळाईने व हुशारीने देवसेना सर्वांसमक्ष त्याच्या हाताची बोटे कापून टाकते.
आणि दुसरा म्हणजे त्याच्याच पुढचे दृश्य,
राजदरबारामध्ये राजा भल्लालदेव, मंत्रिमंडळ व सर्व प्रजेसमोर जेव्हा सेतुपती देवसेनेवर खोट्या आरोपांचा पाठ वाचत असतो तेव्हा बाहुबली येतो. बाहुबली येताच सेतुपतीची जीभ खोटे बोलताना अडखळू लागते. देवसेनेला देवसेनेकडून वास्तव ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला बाहुबली म्हणतो " गलत किया देवसेना, ओरत पर हात डालनेवाले की उंगलिया नहीं काटते काटते है उसका गला....." सरररररर सप... सेतुपतीचे मुंडके धडापासून अलग होऊं तिथेच पड़ते.
सर्वात महत्वाचे म्हणजे बाहुबलीच्या या कृतीचा जाब भल्लालदेवने विचारले असता त्याने दिलेले उत्तर, "झूट बोला तभी सेतुपतीके शब्द लड़खड़ा गए, निर्दोष है तभी देवसेनाने निडर होकर सब सच कह दिया. सेतुपती दोषी साबित हुवा उसका सर काट गया".
अक्षरश: रोमांच उभे राहते व अंगावर काटा येतो.
![]() |
| आधीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत वाट पहिली, पण नवले सर काही आले नाहीत, |
फौजदार मॅडम व आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मंचावर जाऊन नवले सर व विद्यापिठातील प्रतिनिधींना मिळालेल्या करणे दाखवा नोटिसीचे पत्र दाखवले. एका मिनिटांपूर्वी आपण कोणावरही कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा करणाऱ्या नवले सरांची केविलवाणी धडपड सुरु झाली कि आता काय उत्तर द्यावे.
सर म्हणाले, "जी कोणती कागदपत्रे हे लोक दाखवत आहेत, हे प्रकरण चॅरिटी कमिशनर यांच्याशी संबंधित असून यावर मी कुठेही सही केलेली नाही. कॉलेज कॅम्पस मध्ये शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठीची म्हणून हि एक प्रक्रिया असून त्याकरिता काही नियमांचे निर्बंध लागू करणे आवश्यक असून त्याकरिता चॅरिटी कमिशनर यांनी काढलेली हि नोटीस आहे. हि नोटीस सिंहगड इन्स्टिट्यूट्सने दिली नसून महाविद्यालयात जेव्हा अशी काही आणीबाणीजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटेल त्या-त्या वेळी अश्याप्रकारची काळजीपूर्वक नियोजित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यात कदाचित व्यवस्थापन अथवा संस्थेचे नुकसान जरी झाले नसेल तरी विद्यार्थी - विद्यार्थ्या यांच्या वैयक्तिक अथवा सामूहिक तंट्यांची शक्यता लक्ष्यात घेऊन शांतता टिकविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी प्रशासनाला आंदोलकांपैकी काही प्रतिनिधींना सूचना कराव्या लागतात. आणि हि नोटीस म्हणजे याचाच एक भाग आहे. याचा असहकार आंदोलनाशी काहीही संबंध नाही. त्याकरताच पोलीस प्रशासन येथे आले असून, पोलीस संस्थेच्या सुरक्षिततेसाठी नसून विद्यार्थ्यांच्या साठी आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये व आता डेप्युटी डायरेक्टर पुढे आपल्याला संबोधित करतील."
शंकेखोर-असत्य
यातील प्रत्येक मुद्द्यावर विद्यार्थी हुर्रर्ये उडवू लागले व प्राध्यापकही आश्चर्यचकित झाले. कि हातामध्ये कागद असताना देखील दोन - अडीच हजार विद्यार्थ्यांच्या समोर हि व्यक्ती कशी काय खोटे बोलू शकते. कदाचित नवले सरांना कल्पना नसावी कि कालच्या दिवशीच आंदोलकांना मिळालेल्या नोटिसांच्या प्रति प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी पाहिल्या आहेत. व काल विद्यार्थ्यांच्या भेटीस आलेल्या प्राचार्यानी देखील याची कबुली दिली आहे.
डेप्युटी डायरेक्टर बोलण्यासाठी माईक जवळ आले मात्र आपल्याला पाठवलेल्या नोटिसांची सत्यता विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी आलेल्या प्राध्यापक प्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळू नये म्हणून डेप्युटी डायरेक्टरच्या खांद्यावरून नवले सर गोळी मारत असल्याचे विद्यार्थ्यांच्या तात्काळ लक्ष्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांनी "टीचर .. टीचर ... टीचर... टीचरना बोलू दया" अशी एकच आरडाओरड सुरु केली. एवढ्या मोठ्या जमावाच्या विरोधासमोर निभाव लागणार नाही हे लक्ष्यात घेऊन डेप्युटी डायरेक्टर साहेब मागे सारले व श्रीमती फौजदार मॅडमनी माईकचा ताबा घेतला. सर्वानी एका क्षणात टाळ्यांचा कडकडाट केला. आणि पुढे त्या जे बोलल्या ते त्यांच्याच शब्दांत,
![]() |
| निडर-सत्य फौजदार मॅम नवले सरांच्या खोड्या दाव्यांचा पंचनामा करताना |
" Dear students and colleagues, we are very happy today that you all have come here to support our cause. whatever the our problems are I think, you all are understand better than management. We have taught you for whatever numbers of years you are here, maximum four years. But you understand we have been facing the irregularities in payment of salaries since past six years."
Have we ever let you know that we are being paid irregularly?
समोरून एकच आवाज मोठा आला, "Noooo..."
Has there any time being any occasion where in we have shocked our responsibilities because we are not paid regularly?
पुन्हा समोरून एकच आवाज आला, "Noooooo..."
Have we ever tried to disturb your classes because we have not paid?
पुन्हा समोरून एकच आवाज आला, "Nooooooooo..."मॅमनी हातामध्ये तो नोटिसीचा कागद उचलल्या व बोलल्या
![]() |
| आंदोलकांच्या प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संबंधित प्रस्ताव कोण प्रपोज करत आहे पहा अक्कल नाही काडीची आणि म्हणा सहस्त्रबुद्ध्ये |
(पूर्ण नोटीस PDF मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
"This is a letter given by all principals to the management that we the faculty who are in non-cooperation are trying to disturb classes, pull you out of classes, and try to see that an environment of non coordination is created in the entire campus, are we doing that?"
पुन्हा, "Noooooo...."
"Your teachers have been seating on this CC, have they ever ever tried to damage any property of the institute?"
पुन्हा एकसुरात , "Noooooo...."फौजदार मॅमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत विद्यार्थ्यांचा आवाज आणखीनच चवताळून वाढत होता.
"This is what is written in this"
विद्यार्थ्यांनी एकच नारा सुरु केला, "Shame, Shame, Shame....."
फौजदार मॅमच्या प्रश्नांनी व विद्यार्थ्यांच्या उत्तरांनी भलेही नवले सरांची बोटे कापली गेली नसतील, भलेही ती खोटारडी जीभ झाडून गेली नसेल. मात्र भर सभेत नाक मात्र कापले गेले. सरांच्या लालेलाल झालेल्या नाकाच्या शेंड्यावरून हे मात्र नक्की समजत होते.
![]() |
| आमची फी गेली कुठे? असहकार आंदोलनामुळे विद्यार्थ्यां अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. |
बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८
#PaytoProfessor - Part IV : "सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"
#PaytoProfessor - Part IV
"सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"
सचिन शिंदे सर मी आपल्यात लोकमान्यांना पाहतो
१४ फेब्रुवारी २०१८, सिंहगड कल्चरल सेंटर, पुणे
![]() |
| सिंहगड कल्चरल सेंटर वर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. देशपांडे, डॉ. लोखंडे, डॉ. दीक्षित व इतर |
- आज दुपारी मग्रुरीने माजलेल्या शिक्षणसम्राटांचा सूर्य मावळण्यास सुरवात झाली. हजाराहून अधिक विद्यार्थी व तीनशे-चारशे प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता सिंहगडच्या प्राचार्यांच्या व कॅम्पस डायरेक्टर्स च्या तोंडाला जो फेस आला. त्याला पाहून रेड्यांच्या शर्यतीत चाबकाचे फटके खाऊन-खाऊन पळून पळून थकलेल्या रेड्यांच्या तोंडाला आलेल्या फेसाची आठवण झाली.
- सकाळी १००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी वडगाव कॅम्पस मधून आपल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या सिंहगड व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा काढून आपल्या प्रश्नांना वाचा फोडून दिले. २ महिने उन्हं ताणात आंदोलन करत असलेल्या प्राध्यापकांकडे CC ढुंकूनही पाहत नसलेल्या प्राचार्यांना आज मात्र CC वर येऊन प्रक्षोबीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी यावेच लागले.
- प्राचार्यानी हात जोडून मान्य केले कि मॅनेजमेंटकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांचा पगार करण्यात संथ अपयशी ठरली आहे. विद्यार्थ्यांना दोन - दोन रु राहिलेली फी भरण्यासाठी दिलेल्या त्रासाची आठवण करून अश्या गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांची-विद्यार्थ्यांची झालेली वाताहत पाहताना लाज कशी वाटत नाही याचीही विचारणा विद्यार्थ्यांनी केली.
- एका विद्यार्थीनिने तर डॉ. देशपांडे याना सांगितले कि जर आधीच या प्राध्यापकांना सर्व प्राचार्यानी जर CC येऊन साथ दिली असती तर हि समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाच राहिली नसावी. आणि आताही जर सर्व प्राचार्य , प्राध्यापकांसोबत आले नाहीत तर हि समस्या सोडविली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. एका सेकंड ईयर च्या मुलीने एवढ्या मोठया संस्थेच्या प्राचार्यांना शिकवलेले शहाणपण एवढ्या उच्चं शिक्षित प्राचार्यांना का लक्ष्यात आली नाही याचेच आश्चर्य वाटले.
- शेवटी विद्यार्थांनी ५ सेकंद साठी का होईना पण सर्व प्राचार्यांना आपल्या गुबगुबीत खुर्चीवर बसून मऊ झालेल्या आपल्या बुडांना CC कडक फरश्यांवर बसण्यास भाग पडले आणि सिंहगडाच्या "पुनश्च हरिओम " यास सुरवात झाली.
![]() |
| सिंहगड असंतोषाचे जनक - श्री. सचिन शिंदे |
त्या एका विद्यार्थिनीने ज्या आत्मविश्वासाने आपल्यातील असंतोष प्राचार्यांसमोर मांडताना पाहून तिच्या या अस्मितेला कोणी जागे केलं असेल याचा विचार करू लागलो.. आणि विना शंका समोर एकच नाव आणि चेहरा उभा राहिला तो म्हणजे श्री. सचिन शिंदे.
शिंदे सरांचे नाव मी सिंहगड मध्ये रुजू झाल्यानंतरच ऐकले. तेही एबढेच कि गेल्या वर्षी त्यांना प्रलंबित पगाराची मागणी केल्यामुळे संस्थेतून टर्मिनेट करण्यात आले आहे व या टर्मिनेशन विरुद्ध त्यांनी एवढ्या मोठ्या सिंहगड संस्थेविरुद्ध कायदेशीर लढाईस सुरवात केली आहे. गेल्या वर्षी फक्त त्यांनी एका मिटिंग मध्ये सर्व प्राध्यापकांतर्फे प्राचार्यांना प्रलंबित पगाराबद्दल विचारणा केली व त्या कारणासाठी संस्थेने त्यांना सिंहगड संस्थेच्या विरुद्ध प्राध्यापकांमध्ये असंतोष निर्माण करत असल्याचे आरोप ठेवत त्यांना काढून टाकण्यात आले. साहजिकच हा निर्णय अन्यायकारक होता. पण माझ्यासारखा कोणी दुसरा प्राध्यापक असता तर त्याने दुसरे कॉलेज जॉईन करून आपल्या सुरवात केली असती. पण शिंदे सरानी या विरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले. कोणत्याही प्राध्यापकाला कायद्याच्या जुजबी माहिती आसनेहि शक्य नाही हि बाब दुर्दैवाची तरीही हळू हळू त्यांनी नवीन गोष्टी शिकत शिकत कोणताही नवीन जॉब न जॉईन करता पूर्ण वेळ या लढाईत उतरण्याची तयारी केली व लढलेही.
टर्मिनेशन विरुद्धच्या कायदेशीर लढाईत शिंदे सर जिंकले त्यामुळे संस्थेने पुन्हा शिंदे सरांना जॉईन करून घेणे अनिवार्य होते. रिजॉईन करून घेतल्याच्या चौथ्याच दिवशी त्यांना त्याच कारणासाठी सस्पेंड करण्यात आले. सस्पेन्शन कायदेशीर योग्य ठरविण्यापर्यंत त्यांचा अर्धा पगार मिळत राहील हीच काय असेल ती जमेची बाजू.
एवढी माहिती समजल्यानंतर माझ्या मनात शिंदे सर म्हणजे कोणीतरी अत्यंत राकड व रागीट व्यक्ती असेल तसेच त्याला राजकीय व आर्थिक पाठबळ असेल त्याच मुले एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध ते उभे राहिले असतील अशी प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली.
मात्र या असहकार आंदोलनाच्या पहिल्या मिटिंग मध्ये मी त्यांना प्रत्यक्ष पहिले आणि थक्क झालो. ना चेहरा रागीट ना बोलण्यात आवेश, ना शब्दांना कटू धार. अत्यंत सध्या आणि सोप्या भाषेत टिपिकल प्राध्यापकांच्या गोड भाषेत आमच्याशी संवाद साधला.
त्या नंतरच्या त्याच्या प्रत्येक भेटी मध्ये त्याच्यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचा असतो तास त्यांचा साधा संसार पती पत्नी आणि एक मुलगा इतकेच. पण एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाले याचे उत्तर काही मला सापडले नाही. एवढे मात्र समजले कि एकदा का सामान्य माणसाची सटकली कि तो मोठ्यातल्या मोठ्या सत्तेला देखील वठणीवर आणू शकतो. त्याचाच परिणाम म्ह्णून आज सिंहगडचा सर्व कॅम्पस मधील १५०० प्राध्यापकांनी सुरु केलेले हे असहकार आंदोलन होय.
एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करण्यासाठी आधी प्राध्यापकांचा सपोर्ट मिळवणे साहजिकच आवश्यक होते. त्यासाठी सर्व प्राध्यापकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्यात असंतोष निर्माण करणे आवश्यक होते. तेच काम लीलया पार पाडले ते शिंदे सरानी याच साठी मी त्यांना सिंहगड असंतोषाचे जनक म्हणेन.
लहानपणी लोकमान्य टिळकांविषयी भाषण करताना मी लोकमान्यांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता. तेव्हा जरी काही त्याचा अर्थ समाजाला नसला तरी त्याचा अर्थ आता समजला तो शिंदे सरांच्या रूपाने. ३० कोटी भारतीय गुलामगिरीत वागवत असताना त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली ती लोकमान्यांनी. आणि स्वातंत्र्यानंतर ती जाणीव झाली ती सरांमुळे.
बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यातून शिंदे सरानी प्राध्यापकांनमधील निर्भयता वाढविली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था आपले शोषण करत आहे कारण याला आपला प्रत्येक अन्याय निमूटपणे सहन करण्याची सवय आहे याची जाणीव देखील करून दिली. त्यांच्या या गुणांमुळे मी त्यांना दैवत्व नक्कीच देणार नाही मात्र एक सामान्य माणूसही असामान्य काम करून दैवत्व प्राप्त करू शकतो असे मात्र नक्की म्हणेन.
त्या नंतरच्या त्याच्या प्रत्येक भेटी मध्ये त्याच्यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचा असतो तास त्यांचा साधा संसार पती पत्नी आणि एक मुलगा इतकेच. पण एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाले याचे उत्तर काही मला सापडले नाही. एवढे मात्र समजले कि एकदा का सामान्य माणसाची सटकली कि तो मोठ्यातल्या मोठ्या सत्तेला देखील वठणीवर आणू शकतो. त्याचाच परिणाम म्ह्णून आज सिंहगडचा सर्व कॅम्पस मधील १५०० प्राध्यापकांनी सुरु केलेले हे असहकार आंदोलन होय.
एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करण्यासाठी आधी प्राध्यापकांचा सपोर्ट मिळवणे साहजिकच आवश्यक होते. त्यासाठी सर्व प्राध्यापकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्यात असंतोष निर्माण करणे आवश्यक होते. तेच काम लीलया पार पाडले ते शिंदे सरानी याच साठी मी त्यांना सिंहगड असंतोषाचे जनक म्हणेन.
![]() |
| भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक. |
बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यातून शिंदे सरानी प्राध्यापकांनमधील निर्भयता वाढविली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था आपले शोषण करत आहे कारण याला आपला प्रत्येक अन्याय निमूटपणे सहन करण्याची सवय आहे याची जाणीव देखील करून दिली. त्यांच्या या गुणांमुळे मी त्यांना दैवत्व नक्कीच देणार नाही मात्र एक सामान्य माणूसही असामान्य काम करून दैवत्व प्राप्त करू शकतो असे मात्र नक्की म्हणेन.
गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८
#PaytoProfessor-Part III "प्राध्यापकांचे आवाहन"
#PaytoProfessor-Part III
"विद्यार्थी - पालक यांस आवाहन" - "शिक्षणसम्राटांना निर्वाणीचा इशारा" - "शोषित प्राध्यापकांस प्रेरणा"
सिंहगड इन्स्टिट्यूटस चे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक,
पुणे विद्यापीठातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
यांस,
१८ डिसेंबर २०१७ पासून सिंहगड इन्स्टिट्यूटस पुणे येथील प्राध्यापकांच्या पुकारलेल्या असहकार आंदोलनाची कारणे, मागण्या आणि परिणाम यामधील सत्यता आणि सध्यस्थिती आपणास माहिती असणे आवश्यक आहे कारण १६ महिन्यांपासून (ऑक्टोंबर २०१६ ते जानेवारी २०१८) प्रलंबित असलेल्या पगाराची पूर्तता करण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटसचे व्यवस्थापन असमर्थ ठरल्याने आठ हजार प्राध्यापक रस्त्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली असून लाखभर विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वप्नांची आणि विश्वासाची लक्तरे भविष्याच्या वेशीवर टांगण्यात आली आहेत.
आंदोलनाची पार्श्वभूमी: गेल्या ५ वर्ष्यापासून अनियमित पगार देण्याच्या परंपरेचा या वर्षी (२०१७-१८)ला मात्र कळस झाला आहे. साधारणत: विद्यार्थ्यांची फी सप्टेंबर अखेरीस जमा होऊन दिवाळी पूर्वी आधीच्या सर्व पगारांची पूर्तता करण्यात येईल या अपेक्षेने सलग १२ महिने बिन पगारी काम करत असलेल्या प्राध्यापकांना दिवाळीला देखील पगार न करत प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. नोव्हेंबर अखेरीस बहुतेक सर्व प्राध्यापकांच्या संयमाचा अंत होत आला होता व व्यवस्थापनाकडून मात्र विद्यार्थ्यांची फी व समाज कल्याण विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारण दाखवून पगाराला हुलकावणी देण्यात आली. आता जून २०१८ पर्यंत पगार होणार नाही या भीतिने प्राध्यापकांच्या पायाखालची वाळू सरकली. सणवार साजरे करण्यासाठी पैसे नाहीत, आधीची उधारी परत करण्यासाठी लोक तगादा लावत असताना नवीन उधारी मागण्याची सोय राहिली नाही, होम लोन किंवा खोली भाडे भरण्यासाठी पैसे नाहीत, मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाहीत; अश्या अवस्थेमध्ये फक्त रोजचा दिवस जिवंतपणे कसातरी ढकण्यावाचून पर्याय नव्हता. आणि जून २०१८ पर्यंत पगार होण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती त्यामुळे सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ५ डिसेंबर रोजी आपापल्या प्राचार्यांना पत्र लिहून त्वरित पगार करण्यात यावा यासाठी विनंती केली अन्यथा १८ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सेमिस्टरच्या कामकाजामध्ये प्राध्यापक भाग घेणार नाहीत अशी सूचना करण्यात आली.
![]() |
| सिंहगड एरंडावणे ऑफिस येथे प्राध्यापकांचा गाजर मोर्चा |
- ५ डिसेंबर ते १८ डिसेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये व्यवस्थापनाने फक्त एक परिपत्रक काढून कळविले कि विद्यार्थ्यांची फी व समाज कल्याण विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारणामुळे पगार करण्यात विलंब होत असल्याचे कारण सांगण्यात आले व लवकरात लवकर पगार करण्यात येईल देण्यात आली. १५ डिसेंबर पर्यंत एक साधा रुपयाही न मिळाल्याने प्राध्यापकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत होता. या गोष्टीची कुणकुण लक्ष्यात घेऊन दोन (बेसिक+ AGP) १८ तारखेपर्यंत होईल असे सांगून प्राध्यापकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून आमच्या भावनाची क्रूर चेष्टा करण्यात आली.
- (Basic + AGP) म्हणजे आपल्या एकूण पगाराचा फक्त 40% भाग. म्हणजे साधारणत: २१००० रु. ज्यामध्ये फक्त तुमच्या बेसिक गरज पूर्ण होतील आणि तुम्ही फक्त जिवंत शकता बाकी काही करू शकत नाही. गेल्या १४ महिन्यांच्या पूर्ण पगाराची मागणी करत असताना फक्त दोन (Basic + AGP) देऊन व्यवस्थापनाने प्राध्यापकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. आणि त्यामुळे १८ तारखेपासून असहकार आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
![]() |
| आंदोलनादरम्यान विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पार्किंग मधे लेक्चर घेताना प्रा. मिनियर सर (सिंहगड फार्मेसी कॉलेज नर्हे ) |
- १८ तारीख ठरविण्याची मुख्य करणे म्हणजे २ आठवड्यांची मुदत दिल्यानंतर नवीन सेमिस्टर सुरु होण्या आधी थोडातरी पगार हाती आल्यास गेल्या १४ महिन्यापासून बिनपगारी काम केल्याने आलेली मरगळ घालवून नवीन जोमाने कामाला सुरवात करण्यात येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे १८ तारखेला पगार न झाल्यास ज्यास्तीत ज्यात पुढच्या १० दिवसात तरी पगार करण्यात येईल अशी अपेक्षा होती. आणि पहिल्या १० दिवसांमध्ये विद्यार्थी संख्या खूप कमी असते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सर्व विद्यार्थी १ जानेवारी पासून नियमित लेक्चर साठी येऊ लागतील व तोपर्यंत थोडाफार पगार मिळाला तरी कामकाजाला सुरवात करण्यात येईल अशी माफक अपेक्षा होती.
- सिंहगड व्यवस्थापनाने मात्र पगार न करता उलट आंदोलना मध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांची यादी बनविण्यास सुरवात केली. व अश्या प्राध्यापकांवर नंतर कारवाई करण्यात येईल अश्या प्रकारे आंदोलन मोडीत काढण्यासाठीचे दबावतंत्र वापरण्यास सुरवात केली. तसेच आंबेगाव, नर्हे व कुसगाव येथील महाविद्यालयांना परिपत्रक काढून तेथील आंदोलकांकडून शहरी भत्यांची पात्रता नसताना वाढीव भत्ते दिल्याचे सांगून पाठीमागील सर्व भत्यांची वसुली करण्यात यावी असे सांगण्यात आले. व सत्ता आणि समृद्धीच्या लालसेपोटी आंधळ्या झालेल्या धृतराष्टाच्या मानसिकतेची झलक आम्हाला दाखविण्यात आली. व्यवस्थापनाच्या प्रत्येक दबावतंत्राने मनोमनी आधीच मेलेल्या प्राध्यापकांवर साहजिकच काहीच फरक पडला नाही उलट पगारासाठी सुरु झालेल्या या आंदोलनाला भीतीपोटी लाचार झालेल्या प्राध्यापकांची अस्मिता पुन्हा जागृत झाली. व नोकरी वरून काढून टाकले तरी चालेल पण पूर्ण पगार घेऊनच आंदोलन थांबविले जाईल अशी प्रतिज्ञा अप्रत्यक्षपणे प्रत्येक आंदोलकाने घेतली
- मध्यांतर: २६ ते २८ डिसेंबर २०१७, या दरम्यान AICTE व् DTE च्या समित्यांनी प्रत्येक महाविद्यालयला भेट देऊन पगारची वस्तुस्थिति जाणून घेतली. प्रत्येक महाविद्यालातील प्रध्यापकांनी समित्यांसमोर अक्षरशः आपल्या अश्रुना वाट करून दिली. लोणावळा कॅम्पस मधील प्राध्यापकाने तर सर्वांसमक्ष लोटांगण घालून आमचा पगार लवकरात लवकर करावा आणि त्यासाठी जी काही कारवाई AICTE करू शकते ती लवकरात लवकर करावी अशी त्यांना भिकच मागण्यात आली.
- AICTE समितीच्या पायाशी लोटांगण घालण्यापर्यंतच्या थराला जाण्याचे कारण म्हणजे दरवर्षी AICTE , DTE व विद्यापीठाच्या समित्या चौकशी साठी येतात. काजू, बिस्कीट, खारीक मटण / चिकन हादडून एक भरलेले पाकीट घेऊन जातात व पुढच्या वर्षीच्या परवानग्या देऊन टाकतात हा प्रकार काही आता नवीन राहिला नव्हता. पण आता आम्ही बुडालो आहोत, आमच्या अपेक्षा, स्वप्नाचा चुराडा झाला आहे आहे फक्त जिवंत राहण्यासाठी तरी माणुसकीच्या नात्याने तुमच्यामध्ये जर काही माणुसकी शिल्लक राहिली असेल आणि तिला जागी करण्यासाठी आम्हाला तुमच्यासमोर लोटांगण घालावे लागत असेल तर तेही आम्ही करू असा संदेश त्यांना मिळाला.
- वातावरण खूपच तापलेले आहे हे पासून १ जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांनी स्वतः:सर्व कॅम्पस मध्ये मिटिंग घेऊन एक वेळापत्रक दिले कि ज्यामध्ये २५ जानेवारी २०१८ पासून २५ जून २०१८ पर्यंत सर्व पगाराची रक्कम ६ टप्यांमध्ये करण्यात येईल असे संबोधित केले. त्यांची प्रत्येक मिटिंग हि एकतर्फीच झाली. प्राध्यापकांच्या साध्या भावनाही ऐकून न घेण्याची निर्दयता दाखवून कोण कितीही मोठा माणूस कोणत्याही चांगल्या अथवा वाईट क्षेत्रात काम करून कितीही मोठे साम्राज्य उभे केले असले तरी पैश्याची व सत्तेची झापडे एकदा का डोळ्यावर आली कि समोरचा प्रत्येक माणूस हा त्याचा गुलाम आहे या राक्षसी प्रवृत्तीचे दर्शन आम्हाला दिले.
- आता फक्त शब्दांवर/परिपत्रकांवर विश्वास राहिला नसल्याने आंदोलन तसेच पुढे चालू ठेवण्यात आले. ज्या काही प्राध्यापकांना नवले सरांच्या शब्दांवर विश्वास होता त्यांनी आंदोलनातून माघार घेतली. FE व SE च्या ऑनलाईन परीक्षा जवळ असल्याने आंदोलकांवर तसेच व्यवस्थापनावर दबाव वाढत होता. दोन्ही पक्षांनी एक-एक पाऊल पुढे येऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे ठरले. त्यासाठी आंदोलनांमधून प्रत्येक महाविद्यालयांमधून एक अश्या प्रकारे चौदा जणांची समन्वय समिती बनविण्यात आली. त्यामध्ये TAFNAP (Teachers Association For Non Aided Polytechnics) या संघटनेचे श्री. श्रीधर वैद्य यांची महत्वाची निमंत्रिकाची भूमिका बजावली. श्री. श्रीधर वैद्य यांना महत्वाचे स्थान देण्यात आले कारण आंदोलकांच्या तीव्र असल्या तरी आंदोलनाही दिशा कशी असायला हवी याबद्दलची माहिती असणारा अनुभवी प्राध्यापक आमच्यमध्ये कोणीही नव्हता. याउलट श्रीधर वैद्य यांनी स्वतःहून आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत मूलभूत मार्गदर्शन केले. सिंहगड च्या व्यवस्थापनाकडून सहा जणांची समिती बनविण्यात आली. ज्यामध्ये श्री. सहानी (संचालक ), श्री. देशपांडे (प्राचार्य, SKNCOE Vadgaon), श्री. लोखंडे (प्राचार्य, SCOE Vadgaon), श्री. काळकर (प्राचार्य, SIOM Vadgaon), श्री. दीक्षित (उप प्राचार्य, SCOE Vadgaon) व श्री. गायकवाड (प्राचार्य, SIT Lonawala) यांचा समावेश होता. खरे पाहता सिंहगड च्या व्यवस्थापनाकडून सर्वेसर्वा नवले सर यांनी सामोपचारासाठी पुढाकार घेऊन प्रतिनिधित्व करणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र चर्चेचे सर्वाधिकार वरील सहा लोकांना दिले आहेत असे सांगून संस्थाचालकांध्ये असणारा मग्रूरपणा त्यांनी दाखवून दिला कि, मी त्या फालतू, गुलाम आणि माझ्या संस्थेत लाचारीने काम करणाऱ्या प्राध्यापकासोबत चर्चा करणे त्यांच्या आन - बाण - शान ला पटणारे नसेल.
- 8 जानेवारीला सिंहगड व्यवस्थापन समिती व आंदोलकांमध्ये झालेंल्या जवळपास १० तासांच्या चर्चेमध्ये तीन फेऱ्यांच्या दरम्यान जवळपास सर्व मागण्या करण्यात आल्या. सर्वात महत्वाची मागणी प्रलंबित पगाराबद्दल, तर प्रलंबित पगार हा एप्रिल २०१८ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला चार टप्प्यांमध्ये देऊन पूर्ण केला जाईल. प्रत्यक्ष हातात या सामंजस्य करार व्यतिरिक एक रुपयाही मिळाला नाही तरीही परीक्षा जवळ आल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे या हेतूने आंदोलन सत्यजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या करारामुळे तरी २४ तारखेला पगार करावा लागेल या विश्वासाने पुन्हा कामाला सुरवात झाली.
- २४ जानेवारीला पहिला हप्ता मिळणे अपेक्षित असताना नवले फक्त एक परिपत्रक पाठवून सांगितले कि इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट ने बँक खाती सील केल्यामुळे पैश्याची व्यवस्था झाली असतांनाही पगार करण्यात अडचणी येत आहेत व लवकरात लवकर पगार करण्यात येईल. या परिपत्रकात नक्की लवकरात लवकर म्हणजे कधी होणार पगार याचा उल्लेख हि केला गेला नाही.
- आंदोलकांनाही पुन्हा अधिक तीव्रतेने २५ तारखेपासून आंदोलनाला सुरवात केली. व्यवस्थापनाकडून २ फेब्रुवारी, ५ फेब्रुवारी अश्या नवनवीन तारखा मिळू लागल्या. पण असंतोष भडकलेल्या आंदोलकांनी आता त्या सहा लोकांनी प्राध्यापकांची फसवणूक केली असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सहाच्या सहा लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरु केली. नैतिकतेची चिरफाड करणारे लोक राजीनामे देतील ते कसले. उलट प्रयत्न चालू आहेत आमच्या हातात काहीच नाही असे सांगून हात वर केले. आपण करारावर सही करून तो पाळला नाही याच्या पश्चातापाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसल्याने आंदोलकांनी आता सरळ त्यांच्या केबिन मध्ये ठाण मांडून बसण्यास सुरवात केली. पण त्यामधील एकही तारीख पाळली गेली नाही. प्राचार्यही आता मूग गिळून गप्प बसले होते. प्राचार्यानीच हात वर केल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यासमोर आमचे रडगाणे गावुन वेळ घालवणे म्हणजे आमचाच मूर्खपणा ठरला असता.
- आंदोलकांनी मोर्चा आता सरळ सिंहगडच्या एरंडवणे ऑफिस कडे. ३१ जानेवारीला ७००-८०० प्राध्यापकांनी एरंडवणे ऑफिस वरती हातात गाजर घेऊन मोर्चा काढला. आम्हाला आता आश्वासने नकोत पगार करा असे निक्षून सांगण्यात आले.

आता आणखी आश्वासने नकोत, पगार दया.
पायरीवर आणि रस्त्यावर बसलेले उच्च शिक्षित प्राध्यापक
- त्यानंतर लगेच आम्ही पुण्याच्या विभागीय DTE ऑफिस वर मोर्चा काढला. DTE च्या समितीने डिसेंबर महिन्यात आंदोलनाबाबत दिलेल्या व्हिजिट चा अहवाल आम्ही मागून घेतला.
- ५ फेब्रुवारीला संस्थेचे उपाध्यक्ष व मारुती नवले यांचे सुपुत्र रोहित नवले संस्थेच्या वडगाव कॅम्पस मध्ये आपल्या आलिशान ऑडी गाडीतून फिरताना दिसण्यावर प्राध्यापकांचा राग अनावर झाला गेले ३० - ४० दिवस प्राध्यापक उन्हातानातून आंदोलन करत असताना, १६ महिने बिन पगारी काम करत असताना अपाध्याक्ष्यांच्या शानशौकती मध्ये काडी मात्र फरक पडला नव्हता. जवळपास ३००-४०० आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे काय झाले हे विचारण्यासाठी त्यांच्या केबिन बाहेर २ तास धरणे धरले. रोहित नवले मात्र आंदोलकांशी दोन मिनिट बोलाण्यासही तयार झाले नाहीत. आपल्या एका सहकाऱ्याला त्यांनी सांगितले कि पगाराबाबतीत आपल्याला काहीएक माहिती नसून आंदोलकांनी मारुती नवले यांच्याशी संपर्क करावा. संस्थेच्या उपाध्यक्षांचे हे उत्तर ऐकून आंदोलकांचा संताप अनावर झाला व रोहित नवले यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरु झाला. आंदोलकांसमोर येऊन उत्तर देण्याऐवजी रोहित नवले यांनी सर्व सिक्युरिटी गार्डस ना बोलावून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी सिक्युरिटी गार्डस ना दाद दिली नाही. त्यानंतर दोन पिस्तुलधारी पोलिसांना बोलावण्यात आले. तसेच SIOM चे प्राचार्य काळकर सर यांनी येऊन त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आपल्या शब्दांना जुमानत नाहीत हे पाहून काळकर सर यांनी सुरु केली व एकेकाला पाहून घेण्याची धमकी दिली. १५-२० पोलिसांची फौज आल्यानंतर आंदोलक निघून गेले. व रोहित यांची सुटका करण्यात आली.
![]() |
| प्राध्यापकांच्या असंतोष्याचे सीमोलंघन, SCOE प्राचार्यांच्या केबिन मध्ये धरने आंदोलन |
- ६ फेब्रुवारीला प्राध्यापकांनी पुन्हा एरंडवणे ऑफिस ला धडक मारली. नेहमी प्रमाणे आमचे प्रयत्न चालू आहेत असेच उत्तर मिळाले. पण आता अजून एखादी पुढची तारीख सांगण्याचे धाडस करणे मात्र त्यांना शक्य झाले नाही. नक्की तारीख फक्त नवले सर्च सांगू शकतील त्यांनी दाखवून गेले कि सर्व प्राचार्य व संचालकही आता हतबल झाले असून कोणीही पुढे होऊन जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्राचार्यानी हात वर केल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व प्राचार्यानी राजीनामे द्यावेत कारण महाविद्यालय प्रमुख म्हणून काम करताना त्यांच्या अनावस्थेमुळे प्राध्यापकांची ससेपालट होत आहे अशी मागणी जोर धरू लागली. आंदोलकांनी आता आम्हाला प्राचार्यांसोबत काहीही चर्चा करायची नसून नवले सरांसोबत मिटिंग घडवून द्यावी अशी मागणी केली त्यानुसार ७ फेब्रुवारीला प्राध्यापकांची नवले सरांसोबत मिटिंग ठरली.
- ७ फेब्रुवारीची मिटिंग आंदोलकांसाठी खूप महत्वाची होती. कारण सर्व कॅम्पस मधील प्राध्यापक एरंडवणेच्या ऑफिस मध्ये जमणार होते. लोणावळ्याहूनही २ बसेस भरून प्राध्यापक आले. नवले सरानी नेहमी प्रमाणे संस्थेच्या रडगाण्यापासून सुरवात केली. प्राध्यापक काही ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. आता आणखीन पुढची तारीख नको आजच्या आज पगार करावा अशी मागणी आंदोलक करू लागले. नवले सरांच्या प्रत्येक दाव्याला लोक तिथेच खोडून काढू लागले. करार करूनही तो पाळला गेल्या नसल्याबद्लचा जाब विचारला असता त्या करारामध्ये कोणत्या बाबी लिहिल्या आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर लोकांनी डोक्यावर हात मारून घेतला कि किती धडधडीतपणे हा माणूस खोटा बोलत आहे. कराराच्या प्रत्येक बाबी या फोनवरून नवले सरांशी बोलूनच फायनल केल्यानंतर सिँहगडची व्यवस्थापन समिती पुढे सरकत असताना आपल्याला या करारातील बाबीच माहित नसल्याचा आव आणून नवले सरानी आंदोलकांच्या विश्वासाला तडा दिला. आज पर्यंत देव म्हणून लोक ज्याला देव्हाऱ्यात ठेवण्याची स्वप्ने पाहत असत त्यांना आता या माणसातील रावणाच्या दहा तोंडाची रूपे दिसू लागली. सगळ्यात मोठी हद्द केली नवले सरानी हे सांगून कि जर प्राध्यापकांच्या जागी ते असते आणि १६ महिन्यांचा पगार झाला नसता तर त्यांनी कधीच आत्महत्या केली असती. आणि अजूनही आम्ही जिवंत आहोत यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पगारासाठी अजून १० दिवसांची मुदत त्यांनी मागून घेतली. आमच्या भावनांच्या व स्वप्नांच्या चिंधड्या करण्याऱ्या रावणाविरुद्ध लढण्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिला नव्हता. कारण त्यांचा शब्द म्हणजे उद्या सूर्य पश्चिमेला उगवेल इतका खोटा त्यांनी स्वतःच आपल्या पराक्रमातून दाखवून दिला होता.

समाजकल्याणच्या नावाचे तुणतुणे किती दिवस वाजवणार आहेत सर ?
विद्यार्थ्यांच्या जमा झालेल्या फी चा हिशेब का नाही देत तुम्ही ?
- ८ फेब्रुवारीला AICTE ने सिंहगड संस्थेच्या २२ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे १६ महिन्याचे पगार प्रलंबित असल्याबद्दल २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी प्रवेशावर बंदी आणली व सर्वत्र एकच खळबळ उडाली. संस्था बुडाली व विद्याथी - प्राध्यापक यांचे भविष्य अंधारात आल्याची चर्चा सुरु झाली. पण शांत बसतील ते संथाचालक नवले कसले. त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच AICTE च्या आदेशावर स्थागितीमिळविली.
- १२ फेब्रुवारी ला प्राध्यापकांनी सिंहगड च्या व्यवस्थापन समिती मधील सहा लोक व नवले सर यांच्याविरुद्ध असहकार आंदोलनातील समन्वय करार न पाळून प्राध्यापकांची फसवणूक केल्याने पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. उमराणी सर यांची झाडाझडती घेतली. दोन महिने होत आले तरीही विद्यापीठाने कोणतीही कारवाई सिंहगड व्यवस्थापनावर का केली नाही याचा जाब विचारला. तर असे उत्तर देण्यात आले कि सिंहग व्यवस्थापनातील दोन व्यक्तींनी येऊन विद्यापीठात भेट दिली आहे व लवकरात लवकर पगार करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. काही वेळातच विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही उमराणी सरांना जाब विचारला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यापीठाने १४ तारखेला एक समिती सिंहगड महाविद्यालयात भेट देऊन प्रकरणाची सत्यता पडताळून कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
![]() |
| संध्याकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी नवले सरांची वाट पाहिली पण सर आले नाहीत (एवढे बिझी जगात फक्त ट्रम्प, मोदी किंवा नवले सर हे तिघेच) |
- १३ फेब्रवारीला ला हजारभर विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात मोर्चा काढला. एकदा का विद्यार्थी आपल्या विरोधात गेले तर खूप जड जाईल या भीतीने सर्व प्राचार्यांची फौज CC वर आली. दोन महिन्यांपासून प्राध्यापक CC वर असताना यातला एकही माईका लाल CC वर फिरकालाही नव्हता. विद्यार्थ्यांची समजूत काढता काढता प्राचार्यांच्या तोंडाला फेस आला. पण नेहमीप्रमाणे समाजकल्याण व इतर ठरलेले कीर्तन ऐकविण्यास सुरवात केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नवले यांनाच भेटण्यासाठी बोलाविण्याची विनंती केली. प्राचार्यानी हात जोडून मान्य केले कि मॅनेजमेंटकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांचा पगार करण्यात संथ अपयशी ठरली आहे. विद्यार्थ्यांना दोन - दोन रु राहिलेली फी भरण्यासाठी दिलेल्या त्रासाची आठवण करून अश्या गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांची-विद्यार्थ्यांची झालेली वाताहत पाहताना लाज कशी वाटत नाही याचीही विचारणा विद्यार्थ्यांनी केली. एका विद्यार्थीनिने तर डॉ. देशपांडे याना सांगितले कि जर आधीच या प्राध्यापकांना सर्व प्राचार्यानी जर CC येऊन साथ दिली असती तर हि समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाच राहिली नसावी. आणि आताही जर सर्व प्राचार्य , प्राध्यापकांसोबत आले नाहीत तर हि समस्या सोडविली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. एका सेकंड ईयर च्या मुलीने एवढ्या मोठया संस्थेच्या प्राचार्यांना शिकवलेले शहाणपण एवढ्या उच्चं शिक्षित प्राचार्यांना का लक्ष्यात आली नाही याचेच आश्चर्य वाटले. शेवटी विद्यार्थांनी ५ सेकंद साठी का होईना पण सर्व प्राचार्यांना आपल्या गुबगुबीत खुर्चीवर बसून मऊ झालेल्या आपल्या बुडांना CC कडक फरश्यांवर बसण्यास भाग पडले आणि सिंहगडाच्या "पुनश्च हरिओम " यास सुरवात झाली. संध्याकाळी ७ वाजता नवले सर येतील भेटायला असे सांगण्यात आले. आपल्या दिलेल्या शब्दांना न पाळण्याची परंपरा नवले सरानी इथेही पाळली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्राचार्यानी येऊन सनीतले कि नवले सर सध्या येऊ शकत नाहीत ते उद्या उद्या दुपारी १.३० वाजता भेटतील.
![]() |
| विद्यार्थ्यांनी फि दिली, शासनाने अनुदान दिले, पण ना संस्थेकडे पैसे आहेत ना प्रध्यापकाना पगार आहे, मग पैसे गेले तरी कुठे नक्की. (व्हाट्सअप ग्रुप मधून फिरनारा एक मेसेज ) |
================================================================================================================================================
आंदोलनाबाबतच्या शंकाचे निरसन:
१) आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
१) आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
उत्तर :
२) समाजकल्याण विभागाकडून मिळणारे अनुदान व विद्यार्थ्यांची फी मिळाले नसल्याने पगार करण्यास उशीर होत असल्याच्या श्री. मारुती नवले यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे?
उत्तर:
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी
All India Council for Technical Education (AICTE),
Directorate of Technical Education, Maharashtra
Savitribai Phule Pune University,
समाज कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य
चॅरिटी कमिशनर , पुणे
या सर्वांची आहे. वरील संस्थांनी आपले काम योग्य प्रकारे न केल्यामुळे, व संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारांवर वेळोवेळी कानाडोळा कडून आपले खिसे भरून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्राध्यापकांच्या आर्थिक नुकसानीस व मानसिक छळास जबाबदार आहेत.
४) सदर आंदोलनातुन बाहेर येण्याचा मार्ग कोणता ?
उत्तर: प्राध्यापकांचे पगार लवकरात लवकर करून आधी शैक्षणिक कामकाज सुरु होण्यासाठी वरील संस्थांनी प्रयत्न करावेत. व संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषी असल्यात संस्थेचे ट्रस्ट बरखास्त करून प्रशासक नेमून संस्था प्राध्यापकांना चालविण्यास द्यावी.
======================================================================================================================================
सिंहगड असहकार आंदोलनाचे दूरगामी परिणाम:
शिक्षणसम्राटांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मांडलेला बाजार त्यातून एकूणच उच्च शिक्षणातील खालावलेली परिस्थिती पाहता एकूणच विद्यार्थी व प्राध्यापक यांचे भविष्य व अस्मिता धोक्यात आली आहे.
सिंहगड हा फक्त या रावणाचा चेहरा.. देशातील खाजगी महाविद्यालय याचे बाकीचे चेहरे...
अनियंत्रीत व्यवहारांना लवकरात लवकर आला घालण्याची आवश्यकता असून असे न झाल्यास एकूणच शिक्षण व्यवस्था रसातळाला जाण्याची श्यक्यता आहे.
सिंहगडच्या प्राध्यापकांनी या रावणाला दहन करण्यास सुरवात केली असून देशातील प्रत्येक शिक्षण संस्थेतील व्यक्तींनी याचाआदर्श घेऊन या रावणदहनात सहभागी व्हावे. व देशातील शिक्षण व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सहभागी व्हावे.
या आंदोलनातून प्रशासनाने धडा घेऊन एकूणच देशातील खाजगी शिक्षण संस्थांना ताळ्यावर आणल्यास २००० प्राध्यापकानी सुरु केलेल्या या निर्मल विद्या यज्ञाचे फलित मिळाले असे समजण्यात यावे.
बातमीपत्र:
- ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०१८ पर्यंतचा १६ महिन्यांचा सर्व प्रलंबित पगार एकरकमी मिळावा.
- पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावा व
- इथून पुढचे पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत जमा करावा
२) समाजकल्याण विभागाकडून मिळणारे अनुदान व विद्यार्थ्यांची फी मिळाले नसल्याने पगार करण्यास उशीर होत असल्याच्या श्री. मारुती नवले यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे?
उत्तर:
- श्री. मारुती नवले यांच्या म्हणण्यानुसार समाजकल्याण विभागाकडून मिळणारे या शैक्षणिक वर्ष्याचे (२०१७-१८) अनुदान (१३८ कोटी ), विद्यार्थ्यांची फी (२० कोटी) व गेल्या वर्षीच्या (२०१६-१७) अनुदान (१८ कोटी), एकूण जवळपास १७५ कोटी रुपये मिळाले नसल्याने पगार करण्यास उशीर होत आहे.
- उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास समजा,
- प्रथम वर्ष १००० विद्यार्थी प्रवेश संख्या असणाऱ्या इंजिनिअररिंग महाविद्यालयातील ४ वर्ष्यांची एकूण विद्यार्थी संख्या = ४०००
- शैक्षणिक फी: १ लाख प्रती विद्यार्थी (अंदाजे)
- महाविद्यालयात जमा होणारी एकूण फी = ४००० * १ लाख = ४० कोटी
- विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष महाविद्यालयात जमा होणारी फी = एकूण फी च्या ६० % = २४ कोटी
- समाज कल्याण विभागाकडून मिळणारे अनुदान = एकूण फी च्या ४० % = १६ कोटी
- एकूण जमा होणाऱ्या फी मधील पगारासाठीचा वाटा (५०%) = २० कोटी
- महाविद्यालयातील इतर वार्षिक खर्चासाठी रक्कम (५०%) = २० कोटी
वरील तपशिलानुसार असे दिसून येते कि विद्यार्थी फी जरी जमा केली तरी संपूर्ण पगार करता येणे शक्य आहे. अथवा समाज कल्याण विभागाकडून अनुदान जरी मार्च-एप्रिल मध्ये मिळत असते तरी त्या मिळणाऱ्या अनुदानातून फक्त शेवटच्या ४ महिन्यांचा पगार त्यातून करता येतो. उर्वरित ८ महिन्यांच्या पगाराची सोय संस्था मुलांच्या फी मधून करू शकते.
- नवले सरांच्या दाव्यानुसार सन २०१६-१७ मधील १८ कोटी रु. अनुदान मिळणे बाकी आहे. मात्र पगार बाकी आहे तो ऑक्टोंबर २०१६ पासून चा मे २०१७ पर्यंत ८ महिन्याचा ६०% पगार. याची एकूण रक्कम पाहिली असता हि रक्कम १८ कोटी पेक्षा कितीतरी ज्यास्त आहे. याचा अर्थ २०१६-१७ मधील १८ कोटी रक्कम मिळाली तरी संस्था एक किंवा २ महिन्याचा पगार सुद्धा करू शकणार नाही त्यामुळे हा दावा फोल आहे.
- नवले सरांच्या दाव्यानुसार सन २०१७-१८ मधील एकून १५० कोटी समाज कल्याण विभागाकडून येणे बाकी आहे. मात्र सिंहगड संस्थेतील प्रती महिना पगाराची एकूण रक्कम जवळपास ५० कोटी आहे. याचा अर्थ १५० कोटी मिळाले तरी संस्था फक्त शेवटच्या ३ महिन्याचा पगार करू शकते. म्हणजेच आधीच्या ९ महिन्यांच्या पगाराची रक्कम संस्थेकडे जमा झाली आहे.
- वरील दोन तपशिलांवरून आपण असे समजू शकतो कि, अनुदान नाही म्हणून पगार केला नाही हा दावा साफ खोटा आहे. उलट आता पर्यंतच्या जमा झालेल्या फी बद्दल चाकर शब्द न काढता फी मधून जमा केलेल्या पैश्याचा गैरव्यवहार संस्थेने केला असण्याच्या शक्यतेला दाबून ठेवण्यात येत आहे.
![]() |
| घ्या पुरावा: सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट पुणे चा गेल्या ३ वर्षांची फी कलेक्शन |
![]() |
| घ्या पुरावा: श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणेचा गेल्या ३ वर्ष्यांची फी कलेक्शन |
![]() |
घ्या पुरावा: सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स पुणेचा गेल्या ३ वर्ष्यांची फी कलेक्शन
|
३) सदर आंदोलनामुळे झालेल्या विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण?
उत्तर:
५ डिसेंबर २०१७ रोजी व्यवस्थापनाला रीतसर पत्र देऊन १८ डिसेंबर पर्यंत पगार न केल्यास असहकार आंदोलन सुरु करणार असल्याची पूर्व सूचना जवळपास १३ दिवस आधीच संस्थेला दिली होती. तरी संस्थेने पगार केला नाही. तसेच संस्थेचा शैक्षणिक व आर्थिक कारभार योग्य प्रकारे चालू आहे कि नाही हे तपासून पाहण्याची जबाबदारी,सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी
All India Council for Technical Education (AICTE),
Directorate of Technical Education, Maharashtra
Savitribai Phule Pune University,
समाज कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य
चॅरिटी कमिशनर , पुणे
या सर्वांची आहे. वरील संस्थांनी आपले काम योग्य प्रकारे न केल्यामुळे, व संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारांवर वेळोवेळी कानाडोळा कडून आपले खिसे भरून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्राध्यापकांच्या आर्थिक नुकसानीस व मानसिक छळास जबाबदार आहेत.
४) सदर आंदोलनातुन बाहेर येण्याचा मार्ग कोणता ?
उत्तर: प्राध्यापकांचे पगार लवकरात लवकर करून आधी शैक्षणिक कामकाज सुरु होण्यासाठी वरील संस्थांनी प्रयत्न करावेत. व संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषी असल्यात संस्थेचे ट्रस्ट बरखास्त करून प्रशासक नेमून संस्था प्राध्यापकांना चालविण्यास द्यावी.
======================================================================================================================================
सिंहगड असहकार आंदोलनाचे दूरगामी परिणाम:
शिक्षणसम्राटांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मांडलेला बाजार त्यातून एकूणच उच्च शिक्षणातील खालावलेली परिस्थिती पाहता एकूणच विद्यार्थी व प्राध्यापक यांचे भविष्य व अस्मिता धोक्यात आली आहे.
सिंहगड हा फक्त या रावणाचा चेहरा.. देशातील खाजगी महाविद्यालय याचे बाकीचे चेहरे...
अनियंत्रीत व्यवहारांना लवकरात लवकर आला घालण्याची आवश्यकता असून असे न झाल्यास एकूणच शिक्षण व्यवस्था रसातळाला जाण्याची श्यक्यता आहे.
सिंहगडच्या प्राध्यापकांनी या रावणाला दहन करण्यास सुरवात केली असून देशातील प्रत्येक शिक्षण संस्थेतील व्यक्तींनी याचाआदर्श घेऊन या रावणदहनात सहभागी व्हावे. व देशातील शिक्षण व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सहभागी व्हावे.
या आंदोलनातून प्रशासनाने धडा घेऊन एकूणच देशातील खाजगी शिक्षण संस्थांना ताळ्यावर आणल्यास २००० प्राध्यापकानी सुरु केलेल्या या निर्मल विद्या यज्ञाचे फलित मिळाले असे समजण्यात यावे.
बातमीपत्र:
- सिंहगड महाविद्यालयातील प्राध्यापकांचे १४ महिने प्रलंबित पगारासाठी बेमुदत असहकार आंदोलन सुरु : साम टीव्ही (१९/१२/२०१७)
- सिंहगड संस्थेच्या प्राध्यापकांच १४ महिने पगार न मिळाल्याने धरणं आंदोलन: न्यूज १८ लोकमत (१९/०२/२०१७)
- सिंहगड संस्थेत प्राध्यापकांचे बेमुदत असहकार आंदोलन: जनवार्ता न्यूज (२०/१२/२०१७)
- सिंहगड संस्थेचे प्राध्यापक रस्त्यावर: झी २४ तास (३१/०१/२०१८)
- सिंहगड इन्स्टिट्यूट्स च्या एरंडवणे ऑफिस वर प्राध्यापकांचा गाजर मोर्चा
- सिंहगड इन्स्टिट्यूट्स च्या २१ महाविद्यालयांना AICTE चा प्रथम वर्ष प्रवेश बंदीचा दणका: NEWS 18 लोकमत
- सिंहगड इन्स्टिट्यूट्स च्या २१ महाविद्यालयांना AICTE चा प्रथम वर्ष प्रवेश बंदीचा दणका: ZEE 24 तास
- सिंहगड कॉलेजच्या व्यवस्थापन आणि शिक्षकांमधील वादाने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान: सी २४ तास (०३/०२/२०१८)
- सिंहगड इन्स्टिट्यूट्स चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल: झी २४ तास (१२/०२/२०१८)
इतर बातम्या:
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



























