शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor-Part VI "हरएक संवेदनशील प्राध्यापकांस आवाहन"

#PaytoProfessor-Part VI
#ProfessorsInTrouble 
"प्रत्येक संवेदनशील प्राध्यापकास आवाहन"

प्रति,
सर्व प्रायव्हेट इंजिनिअरिंग  कॉलेजेस मधील प्राध्यापकांस,
शिक्षणक्षेत्राशी संबंधित हरएक व्यक्तीस,
सस्नेह नमस्कार,


सिंहगड संस्थेतील प्राध्यापकांनी १८ डिसेंबर पासून सुरु केलेल्या असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी आपण सर्वाना असेलच अशी अपेक्षा करतो. हे आंदोलन सध्या एक निर्णायक टप्प्यावर आले असून या निवेदनाद्वारे आम्ही सिंहगड असहकार आंदोलनातील सर्व प्राध्यापक, महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग सहित सर्व शिक्षण क्षेत्रातील प्राद्यापकांस आमच्या या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहोत.

तत्पूर्वी आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी,
गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित पगाराची परंपरेने आपला कळस गाठल्यानंतर, कधी ना कधी परिस्तिथी सुधारेल या अपेक्षेने ६ वर्ष्यांच्या आर्थिक कुचंबणे नंतरही गेल्या १६ महिन्यांपासून बिनपगारी काम करत राहिले. आता मात्र असंतोषाची सीमा गाठलेल्या प्राध्यापकांनी पगार न झाल्यास १८ डिसेंबर पासून सुरु होण्याऱ्या दुसऱ्या सेमिस्टर च्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय हा निवेदनाद्वारे ५ डिसेंबर रोजी दिला. म्हणजे व्यवस्थापनास १३ दिवसांचा अवधी देण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हि त्यामागील भूमिका. संस्थेने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आंदोलन सुरु राहिले. दरम्यानच्या काळात आम्ही  AICTE, DTE व SPPU ची दारे मदतीसाठी ठोठावली. ८ जानेवारीला आंदोलकांनी चार पावले पुढे येऊन संस्थेसोबत करार केला व प्रलंबित पगार ४ हफ्त्यांमध्ये देण्यास सवलत दिली. पहिला हफ्ता देण्याची तारीख २४ जानेवारी असताना संस्थेने आपला शब्द पाळला नाही. व एक रुपयाही हातात न घेता स्थगित केलेल्या असहकार  आंदोलनाला पुन्हा सुरवात करण्यात आली.

AICTE, DTE व SPPU या प्रत्येक विभागाने भेट देऊन आपापला रिपोर्ट तयार केला मात्र कोणीही प्रत्यक्ष कारवाई मात्र केली नाही.

आंदोलक दिवसभर थंडी-उन्हात राहिले, मोर्चे काढले, पायऱ्यांवर, फारशींवर बसले आता १९ तारखेपासून आंदोलकांनी प्रत्येक कॅम्पस प्रमाणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच त्यामुळे सिंहगड लोणावळा कॅम्पस मधील विद्यार्थी यांनीही विद्यापीठात उपोषणास सुरवात केली.

संस्थाचालकांनी मात्र समाजकल्याण विभागाकडून न मिळालेले अनुदान व इन्कम टॅक्स विभागाने गोठविलेल्या बँक खात्यांच्या नावाने इकडे तिकडे अंधारात गोळ्या मारण्यास सुरवात केली व प्रश्न वाढतच गेला.

खरे पाहता विद्यार्थ्यांच्या एकूण फी पैकी ६०% फी जे विद्यार्थी सरळ संस्थेच्या खात्यात भरतात ते पैसे एव्हाना प्राध्यापकांचे सर्व पगार करण्यास सक्षम आहेत. मात्र संस्थाचालकांनी त्यांचा विनियोग आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला आहे हे सांगण्यासाठी आता काय ब्रह्मदेवाने पुन्हा जन्म घ्यावा का?

इतका साधा गैरव्यवहार सुरु आहे हे समजण्यासाठी किती समिती येतात, रिपोर्ट बनवितात आणि जातात मात्र परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. कारण येणारी प्रत्येक समिती धृतराष्ट व गांधारी यांच्या वंशातीलच असावेत. पट्टी असते ती फक्त पैश्याची..

एवढी पार्श्वभूमी आपणास सांगायचे कारण कि कोणत्याही सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला यात आर्थिक घोटाळा आहे हे नक्कीच समजेल. मात्र आपणासारख्या प्राध्यापक लोकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच होत नाही. होत नसेल तर लढायचे धाडस होत नाही.. आणि जरी लढायला सुरवात केली तरी लगेच धारातीर्थी पडतो.

देशातील एकूणच सर्व इंजिनिअरिंग संस्थांची अवस्था जवळपास सारखीच आहे. पगार वेळेत न देणे हा तर नित्याचाच भाग पण, स्केल न देणे, शक्य तितक्या कमी पगारात राबवून घेने, PF न भरणे, अतिरिक्त कामकाजाचे लोड देणे, ऍडमिशन साठी दारोदारी फिरणे, AICTE, DTE, NACC, सेक्शन शुल्क विभाग विद्यापीठ इत्यादी संस्थांना खोटी माहिती देऊन Approval मिळवणे या गोष्टी अगदी सहजपणे चालू आहेत. शिक्षण संस्थेच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने एकूणच शिक्षणाचा खालावलेला दर्जा, व प्राध्यापकांना हीनतेची वागणूक देऊन संविधानिक मूल्यांना पायदळी तुडविले जात आहे.
हा एकूणच देशद्रोहाचा भाग नाही का होत मग ?
एक पिढीच्या-पिढी याला बळी पडत आहे.

उच्चंशिक्षित प्राध्यापक अजूनही जीवनाकडे कर्मयोग्याप्रमाणे पाहतात त्यामुळे या हलाकीच्या परिस्थितीतही आत्महत्येसारखे विचार करत नाहीत एवढेच..

आम्ही सिंहगड संस्थेचे प्राध्यापक मिळून परिवर्तन आणण्यास सुरवात केली आहे..  आम्हाला सुरवात करण्यास उशीर झाला हे मान्यच पण आता आम्ही मागे  शकत नाही. यासाठी जी काही किंमत चुकवावी लागेल त्याची मनस्वी तयारी केली आहे..

आम्ही आता आमचे बंधू म्हणून आपण सर्व प्राध्यापकांस आमच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. आपण आपल्या शक्य त्या मार्गानी आमची मदत करू शकता. आम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन आमचा आत्मविश्वास वाढवा. आमची बाजू व आंदोलनाचे टप्पे आम्ही रोजच्या रोज सोशल मेडिया वर पाठवीत आहोत त्या तुम्ही शेअर करा. आम्हाला आंदोलनातील नवीन क्लुप्त्या सांगा. आपल्या ओळखीच्या आमदार, खासदार समाजसेवक यांच्याशी आम्हाला संपर्क करता येईल तर त्याप्रकारे आमची मदत करा...  सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यावरही संस्थाचालकांकडून अन्याय होत असेल तर आम्हाला मदतीसाठी बोलावा. तुमच्या तर्फे आम्ही तुमच्या प्रश्नांना वाट फोडून देऊ..

सिंहगड हा फक्त एक चेहरा असून यामध्ये तुम्ही सर्वजण स्वतावर होणाऱ्या अन्यायाची झलक आमच्या चेहऱ्यात पाहू शकता.  आम्ही सध्या जात्यात आहोत तुम्ही सध्या सुपात आहात एवढाच फरक..  आम्हाला उशीर झाला.. पण तुम्ही उशीर करू नका... वातावरण चांगल्या बदलांच्या दृष्टीने गरम आहे तर तुम्हीही तुमच्या अन्यायावर घाव घाला....

आपण आपल्या संस्थेतील समस्या आमच्या पर्यंत पोहचवा. त्यासाठी खालील दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करा.


फॉर्ममधील आपण आपली वैयक्तिक माहिती देणे अनिवार्य नाही जरी दिल्यास आपली माहितीची गुप्तता सुरक्षितपणे  जपली जाईल याची खात्री बाळगावी.

आपल्या विविध मागण्यांकरिता पुणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात 

आपल्या आंदोलनाची भूमिका जेष्ठ समाजसेवक श्री. आण्णा हजारे यांच्या समोर मांडताना  
श्री. शरद पवार यांना निवेदन 

आमदार श्रीमती. मेधा कुलकणी याना निवेदन देताना आंदोलक 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ याने याकरिता आंदोलकांनी
कॅम्पस मध्ये झाडाखाली लेक्चर घेण्याससुरवात  केली आहे 




 






          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा