बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor - Part IV : "सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"

#PaytoProfessor - Part IV

"सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"

सचिन शिंदे सर मी आपल्यात लोकमान्यांना पाहतो 

१४ फेब्रुवारी २०१८, सिंहगड कल्चरल सेंटर, पुणे
सिंहगड कल्चरल सेंटर वर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना
डॉ. देशपांडे, डॉ. लोखंडे, डॉ. दीक्षित व इतर
                 
  • आज दुपारी  मग्रुरीने माजलेल्या शिक्षणसम्राटांचा सूर्य मावळण्यास सुरवात झाली. हजाराहून अधिक विद्यार्थी व तीनशे-चारशे प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता सिंहगडच्या प्राचार्यांच्या व कॅम्पस डायरेक्टर्स च्या तोंडाला जो फेस आला. त्याला पाहून रेड्यांच्या शर्यतीत चाबकाचे फटके खाऊन-खाऊन पळून पळून थकलेल्या रेड्यांच्या तोंडाला आलेल्या फेसाची आठवण झाली. 
  • सकाळी १००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी वडगाव कॅम्पस मधून आपल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या सिंहगड व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा काढून आपल्या प्रश्नांना वाचा फोडून दिले. २ महिने उन्हं ताणात आंदोलन करत असलेल्या प्राध्यापकांकडे CC  ढुंकूनही पाहत नसलेल्या प्राचार्यांना आज मात्र CC  वर येऊन प्रक्षोबीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी यावेच लागले. 
  • प्राचार्यानी हात जोडून मान्य  केले कि मॅनेजमेंटकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे  प्राध्यापकांचा पगार करण्यात संथ अपयशी ठरली आहे. विद्यार्थ्यांना दोन - दोन रु राहिलेली फी  भरण्यासाठी दिलेल्या त्रासाची आठवण करून अश्या गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांची-विद्यार्थ्यांची झालेली वाताहत पाहताना लाज कशी वाटत नाही याचीही विचारणा विद्यार्थ्यांनी केली. 
  • एका विद्यार्थीनिने तर डॉ. देशपांडे याना सांगितले कि जर आधीच या प्राध्यापकांना सर्व प्राचार्यानी जर CC येऊन साथ दिली असती तर हि समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाच राहिली नसावी. आणि आताही जर सर्व प्राचार्य  , प्राध्यापकांसोबत आले नाहीत तर हि समस्या सोडविली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. एका सेकंड ईयर  च्या मुलीने एवढ्या मोठया संस्थेच्या प्राचार्यांना शिकवलेले शहाणपण एवढ्या उच्चं शिक्षित प्राचार्यांना का लक्ष्यात आली नाही याचेच आश्चर्य  वाटले. 
  • शेवटी विद्यार्थांनी ५ सेकंद साठी का होईना पण सर्व प्राचार्यांना आपल्या गुबगुबीत खुर्चीवर बसून मऊ झालेल्या आपल्या बुडांना CC  कडक फरश्यांवर बसण्यास भाग पडले आणि सिंहगडाच्या "पुनश्च हरिओम " यास सुरवात झाली.        


सिंहगड असंतोषाचे जनक - श्री. सचिन शिंदे 
त्या एका विद्यार्थिनीने ज्या आत्मविश्वासाने आपल्यातील असंतोष प्राचार्यांसमोर मांडताना पाहून तिच्या या अस्मितेला कोणी जागे केलं असेल याचा विचार करू लागलो..  आणि विना शंका समोर एकच नाव आणि चेहरा उभा राहिला तो म्हणजे श्री. सचिन शिंदे. 

शिंदे सरांचे नाव मी सिंहगड मध्ये रुजू झाल्यानंतरच ऐकले. तेही एबढेच कि गेल्या वर्षी त्यांना प्रलंबित पगाराची मागणी केल्यामुळे  संस्थेतून टर्मिनेट  करण्यात आले आहे व या टर्मिनेशन विरुद्ध त्यांनी एवढ्या मोठ्या सिंहगड संस्थेविरुद्ध कायदेशीर लढाईस सुरवात केली आहे. गेल्या वर्षी फक्त त्यांनी एका मिटिंग मध्ये सर्व प्राध्यापकांतर्फे प्राचार्यांना प्रलंबित पगाराबद्दल विचारणा केली व त्या कारणासाठी संस्थेने त्यांना सिंहगड संस्थेच्या विरुद्ध प्राध्यापकांमध्ये  असंतोष निर्माण करत असल्याचे आरोप ठेवत त्यांना काढून टाकण्यात आले. साहजिकच हा निर्णय अन्यायकारक होता. पण माझ्यासारखा कोणी दुसरा प्राध्यापक असता तर त्याने दुसरे कॉलेज जॉईन करून आपल्या  सुरवात केली असती. पण शिंदे सरानी या विरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले. कोणत्याही प्राध्यापकाला कायद्याच्या जुजबी माहिती आसनेहि शक्य नाही हि बाब दुर्दैवाची तरीही हळू हळू त्यांनी नवीन गोष्टी शिकत शिकत कोणताही नवीन जॉब न जॉईन करता पूर्ण वेळ या लढाईत उतरण्याची तयारी केली व लढलेही.  

टर्मिनेशन विरुद्धच्या कायदेशीर लढाईत शिंदे सर जिंकले त्यामुळे संस्थेने पुन्हा शिंदे सरांना जॉईन करून घेणे अनिवार्य होते. रिजॉईन करून घेतल्याच्या चौथ्याच दिवशी त्यांना त्याच कारणासाठी सस्पेंड करण्यात आले. सस्पेन्शन कायदेशीर योग्य ठरविण्यापर्यंत त्यांचा अर्धा पगार मिळत राहील हीच काय असेल ती जमेची बाजू. 

एवढी माहिती समजल्यानंतर माझ्या मनात शिंदे सर म्हणजे कोणीतरी अत्यंत राकड  व रागीट व्यक्ती असेल तसेच त्याला राजकीय व आर्थिक पाठबळ असेल त्याच मुले एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध ते उभे राहिले असतील अशी प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली. 

मात्र या असहकार आंदोलनाच्या पहिल्या मिटिंग मध्ये मी त्यांना प्रत्यक्ष पहिले आणि थक्क झालो. ना चेहरा रागीट ना बोलण्यात आवेश, ना शब्दांना कटू धार.  अत्यंत सध्या आणि सोप्या भाषेत टिपिकल प्राध्यापकांच्या गोड  भाषेत  आमच्याशी संवाद साधला.

त्या नंतरच्या त्याच्या प्रत्येक भेटी मध्ये त्याच्यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचा असतो तास त्यांचा साधा संसार पती पत्नी आणि एक मुलगा इतकेच. पण एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाले याचे उत्तर काही मला सापडले नाही. एवढे मात्र समजले कि एकदा का सामान्य माणसाची सटकली कि तो मोठ्यातल्या मोठ्या सत्तेला देखील वठणीवर आणू शकतो. त्याचाच परिणाम म्ह्णून आज सिंहगडचा सर्व कॅम्पस मधील १५०० प्राध्यापकांनी सुरु केलेले हे असहकार आंदोलन होय.

एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करण्यासाठी आधी प्राध्यापकांचा सपोर्ट मिळवणे साहजिकच आवश्यक होते. त्यासाठी सर्व प्राध्यापकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्यात असंतोष निर्माण करणे आवश्यक होते. तेच काम लीलया पार पाडले ते शिंदे सरानी याच साठी मी त्यांना सिंहगड असंतोषाचे जनक म्हणेन. 


भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक. 
लहानपणी लोकमान्य टिळकांविषयी भाषण करताना मी लोकमान्यांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता. तेव्हा जरी काही त्याचा अर्थ समाजाला नसला तरी त्याचा अर्थ आता समजला तो शिंदे सरांच्या रूपाने. ३० कोटी भारतीय गुलामगिरीत वागवत असताना त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली ती लोकमान्यांनी. आणि स्वातंत्र्यानंतर ती जाणीव झाली ती सरांमुळे.
बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यातून शिंदे सरानी प्राध्यापकांनमधील निर्भयता वाढविली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था आपले शोषण करत आहे कारण याला आपला प्रत्येक अन्याय निमूटपणे सहन करण्याची सवय आहे याची जाणीव देखील करून दिली. त्यांच्या या गुणांमुळे मी त्यांना दैवत्व नक्कीच देणार नाही मात्र एक सामान्य माणूसही असामान्य काम करून दैवत्व प्राप्त करू शकतो असे मात्र नक्की म्हणेन.   
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा