शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor-Part VI "हरएक संवेदनशील प्राध्यापकांस आवाहन"

#PaytoProfessor-Part VI
#ProfessorsInTrouble 
"प्रत्येक संवेदनशील प्राध्यापकास आवाहन"

प्रति,
सर्व प्रायव्हेट इंजिनिअरिंग  कॉलेजेस मधील प्राध्यापकांस,
शिक्षणक्षेत्राशी संबंधित हरएक व्यक्तीस,
सस्नेह नमस्कार,


सिंहगड संस्थेतील प्राध्यापकांनी १८ डिसेंबर पासून सुरु केलेल्या असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी आपण सर्वाना असेलच अशी अपेक्षा करतो. हे आंदोलन सध्या एक निर्णायक टप्प्यावर आले असून या निवेदनाद्वारे आम्ही सिंहगड असहकार आंदोलनातील सर्व प्राध्यापक, महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग सहित सर्व शिक्षण क्षेत्रातील प्राद्यापकांस आमच्या या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहोत.

तत्पूर्वी आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी,
गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित पगाराची परंपरेने आपला कळस गाठल्यानंतर, कधी ना कधी परिस्तिथी सुधारेल या अपेक्षेने ६ वर्ष्यांच्या आर्थिक कुचंबणे नंतरही गेल्या १६ महिन्यांपासून बिनपगारी काम करत राहिले. आता मात्र असंतोषाची सीमा गाठलेल्या प्राध्यापकांनी पगार न झाल्यास १८ डिसेंबर पासून सुरु होण्याऱ्या दुसऱ्या सेमिस्टर च्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय हा निवेदनाद्वारे ५ डिसेंबर रोजी दिला. म्हणजे व्यवस्थापनास १३ दिवसांचा अवधी देण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हि त्यामागील भूमिका. संस्थेने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आंदोलन सुरु राहिले. दरम्यानच्या काळात आम्ही  AICTE, DTE व SPPU ची दारे मदतीसाठी ठोठावली. ८ जानेवारीला आंदोलकांनी चार पावले पुढे येऊन संस्थेसोबत करार केला व प्रलंबित पगार ४ हफ्त्यांमध्ये देण्यास सवलत दिली. पहिला हफ्ता देण्याची तारीख २४ जानेवारी असताना संस्थेने आपला शब्द पाळला नाही. व एक रुपयाही हातात न घेता स्थगित केलेल्या असहकार  आंदोलनाला पुन्हा सुरवात करण्यात आली.

AICTE, DTE व SPPU या प्रत्येक विभागाने भेट देऊन आपापला रिपोर्ट तयार केला मात्र कोणीही प्रत्यक्ष कारवाई मात्र केली नाही.

आंदोलक दिवसभर थंडी-उन्हात राहिले, मोर्चे काढले, पायऱ्यांवर, फारशींवर बसले आता १९ तारखेपासून आंदोलकांनी प्रत्येक कॅम्पस प्रमाणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच त्यामुळे सिंहगड लोणावळा कॅम्पस मधील विद्यार्थी यांनीही विद्यापीठात उपोषणास सुरवात केली.

संस्थाचालकांनी मात्र समाजकल्याण विभागाकडून न मिळालेले अनुदान व इन्कम टॅक्स विभागाने गोठविलेल्या बँक खात्यांच्या नावाने इकडे तिकडे अंधारात गोळ्या मारण्यास सुरवात केली व प्रश्न वाढतच गेला.

खरे पाहता विद्यार्थ्यांच्या एकूण फी पैकी ६०% फी जे विद्यार्थी सरळ संस्थेच्या खात्यात भरतात ते पैसे एव्हाना प्राध्यापकांचे सर्व पगार करण्यास सक्षम आहेत. मात्र संस्थाचालकांनी त्यांचा विनियोग आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला आहे हे सांगण्यासाठी आता काय ब्रह्मदेवाने पुन्हा जन्म घ्यावा का?

इतका साधा गैरव्यवहार सुरु आहे हे समजण्यासाठी किती समिती येतात, रिपोर्ट बनवितात आणि जातात मात्र परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. कारण येणारी प्रत्येक समिती धृतराष्ट व गांधारी यांच्या वंशातीलच असावेत. पट्टी असते ती फक्त पैश्याची..

एवढी पार्श्वभूमी आपणास सांगायचे कारण कि कोणत्याही सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला यात आर्थिक घोटाळा आहे हे नक्कीच समजेल. मात्र आपणासारख्या प्राध्यापक लोकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच होत नाही. होत नसेल तर लढायचे धाडस होत नाही.. आणि जरी लढायला सुरवात केली तरी लगेच धारातीर्थी पडतो.

देशातील एकूणच सर्व इंजिनिअरिंग संस्थांची अवस्था जवळपास सारखीच आहे. पगार वेळेत न देणे हा तर नित्याचाच भाग पण, स्केल न देणे, शक्य तितक्या कमी पगारात राबवून घेने, PF न भरणे, अतिरिक्त कामकाजाचे लोड देणे, ऍडमिशन साठी दारोदारी फिरणे, AICTE, DTE, NACC, सेक्शन शुल्क विभाग विद्यापीठ इत्यादी संस्थांना खोटी माहिती देऊन Approval मिळवणे या गोष्टी अगदी सहजपणे चालू आहेत. शिक्षण संस्थेच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने एकूणच शिक्षणाचा खालावलेला दर्जा, व प्राध्यापकांना हीनतेची वागणूक देऊन संविधानिक मूल्यांना पायदळी तुडविले जात आहे.
हा एकूणच देशद्रोहाचा भाग नाही का होत मग ?
एक पिढीच्या-पिढी याला बळी पडत आहे.

उच्चंशिक्षित प्राध्यापक अजूनही जीवनाकडे कर्मयोग्याप्रमाणे पाहतात त्यामुळे या हलाकीच्या परिस्थितीतही आत्महत्येसारखे विचार करत नाहीत एवढेच..

आम्ही सिंहगड संस्थेचे प्राध्यापक मिळून परिवर्तन आणण्यास सुरवात केली आहे..  आम्हाला सुरवात करण्यास उशीर झाला हे मान्यच पण आता आम्ही मागे  शकत नाही. यासाठी जी काही किंमत चुकवावी लागेल त्याची मनस्वी तयारी केली आहे..

आम्ही आता आमचे बंधू म्हणून आपण सर्व प्राध्यापकांस आमच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. आपण आपल्या शक्य त्या मार्गानी आमची मदत करू शकता. आम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन आमचा आत्मविश्वास वाढवा. आमची बाजू व आंदोलनाचे टप्पे आम्ही रोजच्या रोज सोशल मेडिया वर पाठवीत आहोत त्या तुम्ही शेअर करा. आम्हाला आंदोलनातील नवीन क्लुप्त्या सांगा. आपल्या ओळखीच्या आमदार, खासदार समाजसेवक यांच्याशी आम्हाला संपर्क करता येईल तर त्याप्रकारे आमची मदत करा...  सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यावरही संस्थाचालकांकडून अन्याय होत असेल तर आम्हाला मदतीसाठी बोलावा. तुमच्या तर्फे आम्ही तुमच्या प्रश्नांना वाट फोडून देऊ..

सिंहगड हा फक्त एक चेहरा असून यामध्ये तुम्ही सर्वजण स्वतावर होणाऱ्या अन्यायाची झलक आमच्या चेहऱ्यात पाहू शकता.  आम्ही सध्या जात्यात आहोत तुम्ही सध्या सुपात आहात एवढाच फरक..  आम्हाला उशीर झाला.. पण तुम्ही उशीर करू नका... वातावरण चांगल्या बदलांच्या दृष्टीने गरम आहे तर तुम्हीही तुमच्या अन्यायावर घाव घाला....

आपण आपल्या संस्थेतील समस्या आमच्या पर्यंत पोहचवा. त्यासाठी खालील दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करा.


फॉर्ममधील आपण आपली वैयक्तिक माहिती देणे अनिवार्य नाही जरी दिल्यास आपली माहितीची गुप्तता सुरक्षितपणे  जपली जाईल याची खात्री बाळगावी.

आपल्या विविध मागण्यांकरिता पुणे विद्यापीठात साखळी उपोषणास सुरवात 

आपल्या आंदोलनाची भूमिका जेष्ठ समाजसेवक श्री. आण्णा हजारे यांच्या समोर मांडताना  
श्री. शरद पवार यांना निवेदन 

आमदार श्रीमती. मेधा कुलकणी याना निवेदन देताना आंदोलक 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ याने याकरिता आंदोलकांनी
कॅम्पस मध्ये झाडाखाली लेक्चर घेण्याससुरवात  केली आहे 




 






          

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor-Part V : "Yes, you are guilty...!"

#PaytoProfessor-Part V

"President Sir, Yes you are Guilty...!"

फौजदार मॅम व समन्वय समितीला समर्पित, 
बाहुबली चित्रपटातील माझे सगळ्यात आवडते दोन दृश्य, 
पहिला म्हणाल तर; सेतुपती-भल्लालदेवचा निष्ठवंत मित्र ज्याला त्याने नंतर महिष्मती साम्राज्याचा सेनापती बनविले. जेव्हा देवसेना मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जात असते तेव्हा सेतुपती स्त्रियांच्या अंगावर - इज्जतीवर हात टाकत असतो. सेनापतीच्या असल्या निर्लज्ज वागण्याने चिडलेल्या देवसेनेला जेव्हा सेतुपती हात लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अत्यंत चपळाईने व हुशारीने देवसेना सर्वांसमक्ष त्याच्या हाताची बोटे कापून टाकते.
आणि दुसरा म्हणजे  त्याच्याच पुढचे दृश्य,
राजदरबारामध्ये राजा भल्लालदेव, मंत्रिमंडळ व सर्व प्रजेसमोर जेव्हा सेतुपती देवसेनेवर खोट्या आरोपांचा पाठ वाचत असतो तेव्हा बाहुबली येतो. बाहुबली येताच सेतुपतीची जीभ खोटे बोलताना अडखळू लागते. देवसेनेला देवसेनेकडून वास्तव ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला बाहुबली म्हणतो " गलत किया देवसेना, ओरत पर हात डालनेवाले की उंगलिया नहीं काटते काटते है उसका गला....." सरररररर सप... सेतुपतीचे मुंडके धडापासून अलग होऊं तिथेच पड़ते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे बाहुबलीच्या या कृतीचा जाब भल्लालदेवने विचारले असता त्याने दिलेले उत्तर, "झूट बोला तभी सेतुपतीके  शब्द लड़खड़ा गए, निर्दोष है तभी देवसेनाने निडर होकर सब सच कह दिया. सेतुपती दोषी साबित हुवा उसका सर काट गया". 
अक्षरश: रोमांच उभे राहते व अंगावर काटा येतो. 

आधीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत वाट पहिली,
पण नवले सर काही आले नाहीत, 
कोणत्याही ठोस उत्तरांशिवाय, विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी आलेल्या प्रेसिडेंट नवले सरांना जेव्हा विद्यार्थ्यांनीविचारले कि आपल्या सोळा महिन्याच्या पगारांसाठी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांच्या प्रतिनिधींना तुम्ही कारणे दाखवा नोटीस कश्या काय पाठवू शकता. त्यावेळी सरउत्तरादाखल सांगतात कि कोणत्याही आंदोलकांना अशी नोटीस पाठविण्यात आलेली नाही दोन-अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर चक्क खोटे बोलत आहेत हे पाहून आमची देवसेना (फौजदार मॅडम, सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व इतर) मंचावर जातात व त्यांना मिळालेल्या कारणे दाखवा नोटिसीचे पत्र विद्यार्थाना वाचून दाखवतात व त्यातल्या प्रत्येक आरोपाला उत्तर हेसमोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवाजाच्या गजरातच त्या बहिऱ्या कानांना ऐकवतात.  

फौजदार मॅडम व आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मंचावर जाऊन नवले सर व विद्यापिठातील प्रतिनिधींना मिळालेल्या करणे दाखवा नोटिसीचे पत्र दाखवले. एका मिनिटांपूर्वी आपण कोणावरही कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा करणाऱ्या नवले सरांची केविलवाणी धडपड सुरु झाली कि आता काय उत्तर द्यावे.

शंकेखोर-असत्य 
सर म्हणाले, "जी कोणती कागदपत्रे हे लोक दाखवत आहेत, हे प्रकरण चॅरिटी कमिशनर यांच्याशी संबंधित असून यावर मी कुठेही सही केलेली नाही. कॉलेज कॅम्पस मध्ये शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठीची म्हणून हि एक प्रक्रिया असून त्याकरिता काही नियमांचे निर्बंध लागू करणे आवश्यक असून त्याकरिता चॅरिटी कमिशनर यांनी काढलेली हि नोटीस आहे. हि नोटीस सिंहगड इन्स्टिट्यूट्सने दिली नसून महाविद्यालयात जेव्हा अशी काही आणीबाणीजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटेल त्या-त्या वेळी अश्याप्रकारची काळजीपूर्वक नियोजित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यात कदाचित व्यवस्थापन अथवा संस्थेचे नुकसान जरी झाले नसेल तरी विद्यार्थी - विद्यार्थ्या यांच्या वैयक्तिक अथवा सामूहिक तंट्यांची शक्यता लक्ष्यात घेऊन शांतता टिकविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी प्रशासनाला आंदोलकांपैकी काही प्रतिनिधींना सूचना कराव्या लागतात. आणि हि नोटीस म्हणजे याचाच एक भाग आहे. याचा असहकार आंदोलनाशी काहीही संबंध नाही. त्याकरताच पोलीस प्रशासन येथे आले असून, पोलीस संस्थेच्या सुरक्षिततेसाठी नसून विद्यार्थ्यांच्या साठी आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये व आता डेप्युटी डायरेक्टर पुढे आपल्याला संबोधित करतील."

यातील प्रत्येक मुद्द्यावर विद्यार्थी हुर्रर्ये उडवू लागले व प्राध्यापकही आश्चर्यचकित झाले. कि हातामध्ये कागद असताना देखील दोन - अडीच हजार विद्यार्थ्यांच्या समोर हि व्यक्ती कशी काय खोटे बोलू शकते. कदाचित नवले सरांना कल्पना नसावी कि कालच्या दिवशीच आंदोलकांना मिळालेल्या नोटिसांच्या प्रति प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी पाहिल्या आहेत. व काल विद्यार्थ्यांच्या भेटीस आलेल्या प्राचार्यानी देखील याची कबुली दिली आहे. 

डेप्युटी डायरेक्टर बोलण्यासाठी माईक जवळ आले मात्र आपल्याला पाठवलेल्या नोटिसांची सत्यता विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी आलेल्या प्राध्यापक प्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळू नये म्हणून डेप्युटी डायरेक्टरच्या खांद्यावरून नवले सर गोळी मारत असल्याचे विद्यार्थ्यांच्या तात्काळ लक्ष्यात आले. व  सर्व विद्यार्थ्यांनी "टीचर .. टीचर ... टीचर...  टीचरना बोलू दया" अशी एकच आरडाओरड सुरु केली. एवढ्या मोठ्या जमावाच्या विरोधासमोर निभाव लागणार नाही हे लक्ष्यात घेऊन डेप्युटी डायरेक्टर साहेब मागे सारले व श्रीमती फौजदार मॅडमनी माईकचा ताबा घेतला. सर्वानी एका क्षणात टाळ्यांचा कडकडाट केला. आणि पुढे त्या जे बोलल्या ते त्यांच्याच शब्दांत,

निडर-सत्य 
फौजदार मॅम नवले सरांच्या खोड्या दाव्यांचा पंचनामा करताना   

" Dear students and colleagues, we are very happy today that you all have come here to support our cause. whatever the our problems are I think, you all are understand better than management. We have taught you for whatever numbers of years you are here, maximum four years. But you understand we have been facing the irregularities in payment of salaries since past six years."
Have we ever let you know that we are being paid irregularly? 
समोरून एकच आवाज  मोठा आला, "Noooo..."
Has there any time being any occasion where in we have shocked our responsibilities because we are not paid regularly?  
पुन्हा समोरून एकच आवाज आला, "Noooooo..."
Have we ever tried to disturb your classes because we have not paid? 
पुन्हा समोरून एकच आवाज आला, "Nooooooooo..."
मॅमनी हातामध्ये तो नोटिसीचा कागद उचलल्या व बोलल्या
आंदोलकांच्या प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
या संबंधित  प्रस्ताव कोण प्रपोज करत आहे पहा
अक्कल नाही काडीची आणि म्हणा सहस्त्रबुद्ध्ये
 

(पूर्ण नोटीस PDF मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


"This is a letter given by all principals to the management that we the faculty who are in non-cooperation are trying to disturb classes, pull you out of classes, and try to see that an environment of non coordination is created in the entire campus, are we doing that?" 
पुन्हा,  "Noooooo...."
"Your teachers have been seating on this CC, have they ever ever tried to damage any property of the institute?"  
पुन्हा एकसुरात ,  "Noooooo...."
 फौजदार मॅमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत विद्यार्थ्यांचा आवाज आणखीनच चवताळून वाढत होता.
"This is what is written in this"
विद्यार्थ्यांनी एकच नारा सुरु केला, "Shame, Shame, Shame....."
फौजदार मॅमच्या प्रश्नांनी व विद्यार्थ्यांच्या उत्तरांनी भलेही नवले सरांची बोटे कापली गेली नसतील, भलेही ती खोटारडी जीभ झाडून गेली नसेल. मात्र भर सभेत नाक मात्र कापले गेले. सरांच्या लालेलाल झालेल्या नाकाच्या शेंड्यावरून हे मात्र नक्की समजत होते.  
  


आमची फी गेली कुठे?
असहकार आंदोलनामुळे विद्यार्थ्यां अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. 

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor - Part IV : "सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"

#PaytoProfessor - Part IV

"सचिन शिंदे - सिंहगड असंतोषाचे जनक"

सचिन शिंदे सर मी आपल्यात लोकमान्यांना पाहतो 

१४ फेब्रुवारी २०१८, सिंहगड कल्चरल सेंटर, पुणे
सिंहगड कल्चरल सेंटर वर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना
डॉ. देशपांडे, डॉ. लोखंडे, डॉ. दीक्षित व इतर
                 
  • आज दुपारी  मग्रुरीने माजलेल्या शिक्षणसम्राटांचा सूर्य मावळण्यास सुरवात झाली. हजाराहून अधिक विद्यार्थी व तीनशे-चारशे प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता सिंहगडच्या प्राचार्यांच्या व कॅम्पस डायरेक्टर्स च्या तोंडाला जो फेस आला. त्याला पाहून रेड्यांच्या शर्यतीत चाबकाचे फटके खाऊन-खाऊन पळून पळून थकलेल्या रेड्यांच्या तोंडाला आलेल्या फेसाची आठवण झाली. 
  • सकाळी १००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी वडगाव कॅम्पस मधून आपल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या सिंहगड व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा काढून आपल्या प्रश्नांना वाचा फोडून दिले. २ महिने उन्हं ताणात आंदोलन करत असलेल्या प्राध्यापकांकडे CC  ढुंकूनही पाहत नसलेल्या प्राचार्यांना आज मात्र CC  वर येऊन प्रक्षोबीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी यावेच लागले. 
  • प्राचार्यानी हात जोडून मान्य  केले कि मॅनेजमेंटकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे  प्राध्यापकांचा पगार करण्यात संथ अपयशी ठरली आहे. विद्यार्थ्यांना दोन - दोन रु राहिलेली फी  भरण्यासाठी दिलेल्या त्रासाची आठवण करून अश्या गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांची-विद्यार्थ्यांची झालेली वाताहत पाहताना लाज कशी वाटत नाही याचीही विचारणा विद्यार्थ्यांनी केली. 
  • एका विद्यार्थीनिने तर डॉ. देशपांडे याना सांगितले कि जर आधीच या प्राध्यापकांना सर्व प्राचार्यानी जर CC येऊन साथ दिली असती तर हि समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाच राहिली नसावी. आणि आताही जर सर्व प्राचार्य  , प्राध्यापकांसोबत आले नाहीत तर हि समस्या सोडविली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. एका सेकंड ईयर  च्या मुलीने एवढ्या मोठया संस्थेच्या प्राचार्यांना शिकवलेले शहाणपण एवढ्या उच्चं शिक्षित प्राचार्यांना का लक्ष्यात आली नाही याचेच आश्चर्य  वाटले. 
  • शेवटी विद्यार्थांनी ५ सेकंद साठी का होईना पण सर्व प्राचार्यांना आपल्या गुबगुबीत खुर्चीवर बसून मऊ झालेल्या आपल्या बुडांना CC  कडक फरश्यांवर बसण्यास भाग पडले आणि सिंहगडाच्या "पुनश्च हरिओम " यास सुरवात झाली.        


सिंहगड असंतोषाचे जनक - श्री. सचिन शिंदे 
त्या एका विद्यार्थिनीने ज्या आत्मविश्वासाने आपल्यातील असंतोष प्राचार्यांसमोर मांडताना पाहून तिच्या या अस्मितेला कोणी जागे केलं असेल याचा विचार करू लागलो..  आणि विना शंका समोर एकच नाव आणि चेहरा उभा राहिला तो म्हणजे श्री. सचिन शिंदे. 

शिंदे सरांचे नाव मी सिंहगड मध्ये रुजू झाल्यानंतरच ऐकले. तेही एबढेच कि गेल्या वर्षी त्यांना प्रलंबित पगाराची मागणी केल्यामुळे  संस्थेतून टर्मिनेट  करण्यात आले आहे व या टर्मिनेशन विरुद्ध त्यांनी एवढ्या मोठ्या सिंहगड संस्थेविरुद्ध कायदेशीर लढाईस सुरवात केली आहे. गेल्या वर्षी फक्त त्यांनी एका मिटिंग मध्ये सर्व प्राध्यापकांतर्फे प्राचार्यांना प्रलंबित पगाराबद्दल विचारणा केली व त्या कारणासाठी संस्थेने त्यांना सिंहगड संस्थेच्या विरुद्ध प्राध्यापकांमध्ये  असंतोष निर्माण करत असल्याचे आरोप ठेवत त्यांना काढून टाकण्यात आले. साहजिकच हा निर्णय अन्यायकारक होता. पण माझ्यासारखा कोणी दुसरा प्राध्यापक असता तर त्याने दुसरे कॉलेज जॉईन करून आपल्या  सुरवात केली असती. पण शिंदे सरानी या विरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले. कोणत्याही प्राध्यापकाला कायद्याच्या जुजबी माहिती आसनेहि शक्य नाही हि बाब दुर्दैवाची तरीही हळू हळू त्यांनी नवीन गोष्टी शिकत शिकत कोणताही नवीन जॉब न जॉईन करता पूर्ण वेळ या लढाईत उतरण्याची तयारी केली व लढलेही.  

टर्मिनेशन विरुद्धच्या कायदेशीर लढाईत शिंदे सर जिंकले त्यामुळे संस्थेने पुन्हा शिंदे सरांना जॉईन करून घेणे अनिवार्य होते. रिजॉईन करून घेतल्याच्या चौथ्याच दिवशी त्यांना त्याच कारणासाठी सस्पेंड करण्यात आले. सस्पेन्शन कायदेशीर योग्य ठरविण्यापर्यंत त्यांचा अर्धा पगार मिळत राहील हीच काय असेल ती जमेची बाजू. 

एवढी माहिती समजल्यानंतर माझ्या मनात शिंदे सर म्हणजे कोणीतरी अत्यंत राकड  व रागीट व्यक्ती असेल तसेच त्याला राजकीय व आर्थिक पाठबळ असेल त्याच मुले एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध ते उभे राहिले असतील अशी प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली. 

मात्र या असहकार आंदोलनाच्या पहिल्या मिटिंग मध्ये मी त्यांना प्रत्यक्ष पहिले आणि थक्क झालो. ना चेहरा रागीट ना बोलण्यात आवेश, ना शब्दांना कटू धार.  अत्यंत सध्या आणि सोप्या भाषेत टिपिकल प्राध्यापकांच्या गोड  भाषेत  आमच्याशी संवाद साधला.

त्या नंतरच्या त्याच्या प्रत्येक भेटी मध्ये त्याच्यांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचा असतो तास त्यांचा साधा संसार पती पत्नी आणि एक मुलगा इतकेच. पण एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाले याचे उत्तर काही मला सापडले नाही. एवढे मात्र समजले कि एकदा का सामान्य माणसाची सटकली कि तो मोठ्यातल्या मोठ्या सत्तेला देखील वठणीवर आणू शकतो. त्याचाच परिणाम म्ह्णून आज सिंहगडचा सर्व कॅम्पस मधील १५०० प्राध्यापकांनी सुरु केलेले हे असहकार आंदोलन होय.

एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करण्यासाठी आधी प्राध्यापकांचा सपोर्ट मिळवणे साहजिकच आवश्यक होते. त्यासाठी सर्व प्राध्यापकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्यात असंतोष निर्माण करणे आवश्यक होते. तेच काम लीलया पार पाडले ते शिंदे सरानी याच साठी मी त्यांना सिंहगड असंतोषाचे जनक म्हणेन. 


भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक. 
लहानपणी लोकमान्य टिळकांविषयी भाषण करताना मी लोकमान्यांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता. तेव्हा जरी काही त्याचा अर्थ समाजाला नसला तरी त्याचा अर्थ आता समजला तो शिंदे सरांच्या रूपाने. ३० कोटी भारतीय गुलामगिरीत वागवत असताना त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली ती लोकमान्यांनी. आणि स्वातंत्र्यानंतर ती जाणीव झाली ती सरांमुळे.
बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यातून शिंदे सरानी प्राध्यापकांनमधील निर्भयता वाढविली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था आपले शोषण करत आहे कारण याला आपला प्रत्येक अन्याय निमूटपणे सहन करण्याची सवय आहे याची जाणीव देखील करून दिली. त्यांच्या या गुणांमुळे मी त्यांना दैवत्व नक्कीच देणार नाही मात्र एक सामान्य माणूसही असामान्य काम करून दैवत्व प्राप्त करू शकतो असे मात्र नक्की म्हणेन.   
 
 

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor-Part III "प्राध्यापकांचे आवाहन"

#PaytoProfessor-Part III

"विद्यार्थी - पालक यांस आवाहन""शिक्षणसम्राटांना निर्वाणीचा इशारा" - "शोषित प्राध्यापकांस प्रेरणा"


सिंहगड इन्स्टिट्यूटस चे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक,
पुणे विद्यापीठातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
यांस,

१८ डिसेंबर २०१७ पासून सिंहगड  इन्स्टिट्यूटस पुणे येथील प्राध्यापकांच्या पुकारलेल्या असहकार आंदोलनाची कारणे, मागण्या आणि परिणाम यामधील सत्यता आणि सध्यस्थिती आपणास माहिती असणे आवश्यक आहे कारण १६ महिन्यांपासून (ऑक्टोंबर २०१६ ते जानेवारी २०१८) प्रलंबित असलेल्या पगाराची पूर्तता करण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटसचे व्यवस्थापन असमर्थ ठरल्याने आठ हजार प्राध्यापक रस्त्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली असून लाखभर विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वप्नांची आणि विश्वासाची लक्तरे भविष्याच्या वेशीवर टांगण्यात आली आहेत.

सिंहगड एरंडावणे ऑफिस येथे प्राध्यापकांचा गाजर मोर्चा  
आंदोलनाची पार्श्वभूमी: गेल्या ५ वर्ष्यापासून अनियमित पगार देण्याच्या परंपरेचा या वर्षी (२०१७-१८)ला मात्र कळस झाला आहे. साधारणत: विद्यार्थ्यांची फी सप्टेंबर अखेरीस जमा होऊन दिवाळी पूर्वी आधीच्या सर्व पगारांची पूर्तता करण्यात येईल या अपेक्षेने सलग १२ महिने बिन पगारी काम करत असलेल्या प्राध्यापकांना दिवाळीला देखील पगार न करत प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली.   नोव्हेंबर अखेरीस बहुतेक सर्व प्राध्यापकांच्या संयमाचा अंत होत आला होता व व्यवस्थापनाकडून मात्र  विद्यार्थ्यांची फी व समाज कल्याण विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारण दाखवून पगाराला हुलकावणी देण्यात आली. आता जून २०१८ पर्यंत पगार होणार नाही या भीतिने प्राध्यापकांच्या पायाखालची वाळू सरकली. सणवार साजरे करण्यासाठी पैसे नाहीत, आधीची उधारी परत करण्यासाठी लोक तगादा लावत असताना नवीन उधारी मागण्याची सोय राहिली नाही, होम  लोन किंवा खोली भाडे भरण्यासाठी पैसे नाहीत, मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाहीत; अश्या अवस्थेमध्ये फक्त रोजचा दिवस जिवंतपणे कसातरी ढकण्यावाचून पर्याय नव्हता. आणि जून २०१८ पर्यंत पगार होण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती त्यामुळे सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ५ डिसेंबर रोजी आपापल्या प्राचार्यांना पत्र लिहून त्वरित पगार करण्यात यावा यासाठी विनंती केली अन्यथा १८ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सेमिस्टरच्या कामकाजामध्ये प्राध्यापक भाग घेणार नाहीत अशी सूचना करण्यात आली.
  • ५ डिसेंबर ते १८ डिसेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये व्यवस्थापनाने फक्त एक परिपत्रक काढून कळविले कि विद्यार्थ्यांची फी व समाज कल्याण विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याचे कारणामुळे पगार करण्यात विलंब होत असल्याचे कारण सांगण्यात आले व लवकरात लवकर पगार करण्यात येईल  देण्यात आली. १५ डिसेंबर पर्यंत एक साधा रुपयाही न मिळाल्याने प्राध्यापकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत होता.  या गोष्टीची कुणकुण लक्ष्यात  घेऊन दोन (बेसिक+ AGP) १८ तारखेपर्यंत होईल असे सांगून प्राध्यापकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून आमच्या भावनाची क्रूर चेष्टा करण्यात आली.
  • (Basic + AGP) म्हणजे आपल्या एकूण पगाराचा फक्त 40% भाग. म्हणजे साधारणत: २१००० रु. ज्यामध्ये फक्त तुमच्या बेसिक गरज पूर्ण होतील आणि तुम्ही फक्त जिवंत  शकता बाकी काही करू शकत नाही. गेल्या १४ महिन्यांच्या पूर्ण पगाराची मागणी करत असताना फक्त दोन (Basic + AGP) देऊन व्यवस्थापनाने प्राध्यापकांच्या जखमेवर  मीठ चोळण्याचे काम केले. आणि त्यामुळे १८ तारखेपासून असहकार आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 
आंदोलनादरम्यान  विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
म्हणून पार्किंग मधे लेक्चर घेताना
प्रा. मिनियर सर (सिंहगड फार्मेसी कॉलेज नर्हे )
  • १८ तारीख ठरविण्याची मुख्य करणे म्हणजे २ आठवड्यांची मुदत दिल्यानंतर नवीन सेमिस्टर सुरु होण्या आधी थोडातरी पगार हाती आल्यास गेल्या १४ महिन्यापासून बिनपगारी काम केल्याने आलेली मरगळ  घालवून नवीन जोमाने कामाला सुरवात करण्यात येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे १८ तारखेला पगार न झाल्यास ज्यास्तीत ज्यात पुढच्या १० दिवसात तरी पगार करण्यात येईल अशी अपेक्षा होती. आणि पहिल्या १० दिवसांमध्ये विद्यार्थी संख्या खूप कमी असते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सर्व विद्यार्थी १ जानेवारी पासून नियमित लेक्चर साठी येऊ लागतील व तोपर्यंत थोडाफार पगार मिळाला तरी कामकाजाला सुरवात करण्यात येईल अशी माफक अपेक्षा होती.
  • सिंहगड व्यवस्थापनाने मात्र पगार न करता उलट आंदोलना मध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांची यादी बनविण्यास सुरवात केली.  व अश्या प्राध्यापकांवर नंतर कारवाई करण्यात येईल अश्या प्रकारे आंदोलन मोडीत काढण्यासाठीचे दबावतंत्र वापरण्यास सुरवात केली. तसेच आंबेगाव, नर्हे व कुसगाव येथील महाविद्यालयांना परिपत्रक काढून तेथील आंदोलकांकडून शहरी  भत्यांची पात्रता नसताना वाढीव भत्ते दिल्याचे सांगून पाठीमागील सर्व भत्यांची वसुली करण्यात यावी असे सांगण्यात आले.  व सत्ता आणि समृद्धीच्या लालसेपोटी आंधळ्या झालेल्या धृतराष्टाच्या मानसिकतेची झलक आम्हाला दाखविण्यात आली.  व्यवस्थापनाच्या प्रत्येक दबावतंत्राने मनोमनी आधीच मेलेल्या प्राध्यापकांवर साहजिकच काहीच फरक पडला नाही उलट पगारासाठी सुरु झालेल्या या आंदोलनाला भीतीपोटी लाचार झालेल्या प्राध्यापकांची अस्मिता पुन्हा जागृत झाली. व नोकरी वरून काढून टाकले तरी चालेल पण पूर्ण पगार घेऊनच आंदोलन थांबविले जाईल अशी प्रतिज्ञा अप्रत्यक्षपणे  प्रत्येक आंदोलकाने घेतली

  • मध्यांतर: २६ ते २८ डिसेंबर २०१७, या दरम्यान   AICTE व्  DTE च्या समित्यांनी  प्रत्येक महाविद्यालयला भेट देऊन पगारची वस्तुस्थिति  जाणून  घेतली.  प्रत्येक महाविद्यालातील प्रध्यापकांनी  समित्यांसमोर अक्षरशः  आपल्या अश्रुना  वाट करून दिली. लोणावळा  कॅम्पस  मधील प्राध्यापकाने तर सर्वांसमक्ष लोटांगण घालून आमचा पगार लवकरात लवकर करावा आणि त्यासाठी जी काही कारवाई  AICTE करू शकते ती लवकरात लवकर करावी अशी त्यांना भिकच मागण्यात आली. 
  • AICTE समितीच्या पायाशी लोटांगण घालण्यापर्यंतच्या थराला  जाण्याचे कारण म्हणजे दरवर्षी AICTE , DTE व विद्यापीठाच्या समित्या चौकशी साठी येतात. काजू, बिस्कीट, खारीक मटण  / चिकन  हादडून एक भरलेले पाकीट घेऊन जातात व पुढच्या वर्षीच्या परवानग्या देऊन टाकतात हा प्रकार काही आता नवीन राहिला नव्हता. पण आता आम्ही बुडालो आहोत, आमच्या अपेक्षा, स्वप्नाचा चुराडा झाला आहे आहे फक्त जिवंत राहण्यासाठी तरी माणुसकीच्या नात्याने तुमच्यामध्ये जर काही माणुसकी शिल्लक राहिली असेल आणि तिला जागी करण्यासाठी आम्हाला तुमच्यासमोर लोटांगण घालावे लागत असेल तर तेही आम्ही करू असा संदेश त्यांना मिळाला.
  • वातावरण खूपच तापलेले आहे हे पासून जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांनी स्वतः:सर्व कॅम्पस मध्ये मिटिंग घेऊन एक वेळापत्रक दिले कि ज्यामध्ये २५ जानेवारी २०१८ पासून २५ जून २०१८ पर्यंत सर्व  पगाराची रक्कम ६ टप्यांमध्ये करण्यात येईल असे संबोधित केले. त्यांची प्रत्येक मिटिंग हि एकतर्फीच झाली. प्राध्यापकांच्या साध्या  भावनाही ऐकून न घेण्याची निर्दयता दाखवून कोण कितीही मोठा माणूस कोणत्याही चांगल्या अथवा वाईट क्षेत्रात काम करून कितीही मोठे साम्राज्य उभे केले असले तरी पैश्याची व सत्तेची झापडे एकदा का डोळ्यावर आली कि समोरचा प्रत्येक माणूस हा त्याचा गुलाम आहे या राक्षसी प्रवृत्तीचे दर्शन आम्हाला दिले. 
  • आता फक्त शब्दांवर/परिपत्रकांवर  विश्वास राहिला नसल्याने आंदोलन तसेच पुढे चालू ठेवण्यात आले.  ज्या काही प्राध्यापकांना नवले सरांच्या शब्दांवर विश्वास  होता त्यांनी आंदोलनातून माघार घेतली. FE  व SE च्या ऑनलाईन  परीक्षा जवळ  असल्याने आंदोलकांवर  तसेच व्यवस्थापनावर दबाव वाढत होता. दोन्ही पक्षांनी एक-एक पाऊल पुढे येऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे ठरले. त्यासाठी आंदोलनांमधून प्रत्येक  महाविद्यालयांमधून एक अश्या प्रकारे चौदा जणांची समन्वय समिती बनविण्यात आली. त्यामध्ये TAFNAP (Teachers Association For Non Aided Polytechnics) या संघटनेचे श्री. श्रीधर वैद्य  यांची महत्वाची निमंत्रिकाची भूमिका बजावली.  श्री. श्रीधर वैद्य यांना महत्वाचे स्थान देण्यात आले कारण आंदोलकांच्या  तीव्र असल्या तरी आंदोलनाही दिशा कशी असायला हवी याबद्दलची माहिती असणारा अनुभवी प्राध्यापक आमच्यमध्ये कोणीही नव्हता. याउलट श्रीधर वैद्य यांनी स्वतःहून आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत मूलभूत मार्गदर्शन  केले. सिंहगड च्या व्यवस्थापनाकडून   सहा जणांची समिती बनविण्यात आली. ज्यामध्ये श्री. सहानी (संचालक ), श्री. देशपांडे (प्राचार्य, SKNCOE Vadgaon),  श्री. लोखंडे (प्राचार्य, SCOE Vadgaon),  श्री. काळकर (प्राचार्य, SIOM Vadgaon),  श्री. दीक्षित (उप प्राचार्य, SCOE Vadgaon) व श्री. गायकवाड (प्राचार्य, SIT Lonawala) यांचा समावेश होता. खरे पाहता सिंहगड च्या व्यवस्थापनाकडून सर्वेसर्वा नवले सर यांनी सामोपचारासाठी पुढाकार घेऊन प्रतिनिधित्व करणे अपेक्षित असताना  त्यांनी मात्र  चर्चेचे सर्वाधिकार वरील सहा लोकांना दिले आहेत असे सांगून संस्थाचालकांध्ये असणारा मग्रूरपणा त्यांनी दाखवून दिला  कि, मी त्या फालतू, गुलाम आणि माझ्या संस्थेत लाचारीने काम करणाऱ्या प्राध्यापकासोबत चर्चा करणे त्यांच्या आन - बाण - शान  ला पटणारे नसेल. 
  • 8 जानेवारीला सिंहगड व्यवस्थापन समिती व आंदोलकांमध्ये झालेंल्या जवळपास १० तासांच्या चर्चेमध्ये तीन फेऱ्यांच्या दरम्यान जवळपास सर्व मागण्या करण्यात आल्या. सर्वात महत्वाची मागणी प्रलंबित पगाराबद्दल, तर प्रलंबित पगार हा एप्रिल २०१८ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला चार टप्प्यांमध्ये देऊन पूर्ण केला जाईल. प्रत्यक्ष हातात या सामंजस्य करार व्यतिरिक एक रुपयाही  मिळाला  नाही तरीही परीक्षा जवळ आल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे या हेतूने आंदोलन सत्यजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या करारामुळे तरी २४ तारखेला पगार करावा लागेल या विश्वासाने पुन्हा कामाला सुरवात झाली.
  • २४ जानेवारीला पहिला हप्ता मिळणे अपेक्षित असताना नवले  फक्त एक परिपत्रक पाठवून सांगितले कि इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट ने बँक  खाती सील केल्यामुळे पैश्याची व्यवस्था झाली असतांनाही  पगार करण्यात अडचणी येत आहेत व लवकरात लवकर पगार करण्यात येईल. या परिपत्रकात नक्की लवकरात लवकर म्हणजे कधी होणार पगार याचा उल्लेख हि केला गेला नाही. 
  • आंदोलकांनाही पुन्हा अधिक तीव्रतेने २५ तारखेपासून आंदोलनाला सुरवात केली. व्यवस्थापनाकडून २ फेब्रुवारी, ५ फेब्रुवारी अश्या नवनवीन तारखा मिळू लागल्या. पण असंतोष भडकलेल्या आंदोलकांनी आता त्या सहा लोकांनी प्राध्यापकांची फसवणूक केली असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सहाच्या सहा लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरु केली. नैतिकतेची चिरफाड करणारे लोक राजीनामे देतील ते कसले. उलट प्रयत्न चालू आहेत आमच्या हातात काहीच नाही असे सांगून हात वर केले. आपण करारावर सही करून तो पाळला नाही याच्या पश्चातापाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसल्याने आंदोलकांनी आता सरळ त्यांच्या केबिन मध्ये ठाण  मांडून बसण्यास सुरवात केली. पण त्यामधील एकही तारीख पाळली गेली नाही. प्राचार्यही  आता मूग गिळून गप्प बसले होते. प्राचार्यानीच हात वर केल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यासमोर आमचे रडगाणे गावुन वेळ घालवणे म्हणजे आमचाच मूर्खपणा ठरला असता.
  • आंदोलकांनी मोर्चा आता सरळ सिंहगडच्या  एरंडवणे ऑफिस कडे. ३१ जानेवारीला ७००-८०० प्राध्यापकांनी एरंडवणे ऑफिस वरती हातात गाजर घेऊन मोर्चा काढला. आम्हाला आता आश्वासने नकोत पगार करा असे निक्षून सांगण्यात आले.
    आता आणखी आश्वासने नकोत, पगार दया.
    पायरीवर आणि रस्त्यावर बसलेले उच्च शिक्षित प्राध्यापक  
     
  • त्यानंतर लगेच आम्ही पुण्याच्या विभागीय DTE ऑफिस वर मोर्चा काढला.  DTE च्या समितीने डिसेंबर महिन्यात आंदोलनाबाबत दिलेल्या व्हिजिट चा अहवाल आम्ही मागून घेतला.

  • ५ फेब्रुवारीला संस्थेचे उपाध्यक्ष व मारुती नवले यांचे सुपुत्र रोहित नवले संस्थेच्या वडगाव कॅम्पस मध्ये आपल्या आलिशान ऑडी गाडीतून फिरताना दिसण्यावर प्राध्यापकांचा राग अनावर झाला गेले ३० - ४० दिवस प्राध्यापक उन्हातानातून आंदोलन करत असताना, १६ महिने बिन पगारी काम करत असताना अपाध्याक्ष्यांच्या शानशौकती मध्ये काडी मात्र फरक पडला नव्हता. जवळपास ३००-४०० आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे काय झाले हे विचारण्यासाठी त्यांच्या केबिन बाहेर २ तास धरणे धरले. रोहित नवले मात्र आंदोलकांशी दोन मिनिट बोलाण्यासही तयार झाले नाहीत. आपल्या एका सहकाऱ्याला त्यांनी सांगितले कि पगाराबाबतीत आपल्याला काहीएक माहिती नसून आंदोलकांनी मारुती नवले यांच्याशी संपर्क करावा. संस्थेच्या उपाध्यक्षांचे हे उत्तर ऐकून आंदोलकांचा संताप अनावर झाला व रोहित नवले यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरु झाला. आंदोलकांसमोर येऊन उत्तर देण्याऐवजी रोहित नवले यांनी सर्व सिक्युरिटी गार्डस ना बोलावून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी सिक्युरिटी गार्डस ना दाद दिली नाही. त्यानंतर दोन पिस्तुलधारी पोलिसांना बोलावण्यात आले. तसेच SIOM चे प्राचार्य काळकर सर यांनी येऊन त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आपल्या शब्दांना जुमानत नाहीत हे पाहून काळकर  सर यांनी  सुरु केली व एकेकाला पाहून घेण्याची धमकी दिली. १५-२० पोलिसांची फौज आल्यानंतर आंदोलक निघून गेले. व रोहित यांची सुटका करण्यात आली.   
प्राध्यापकांच्या असंतोष्याचे सीमोलंघन,
SCOE प्राचार्यांच्या केबिन मध्ये धरने आंदोलन  
  • ६ फेब्रुवारीला प्राध्यापकांनी पुन्हा एरंडवणे ऑफिस ला धडक मारली. नेहमी प्रमाणे आमचे प्रयत्न चालू आहेत असेच उत्तर मिळाले. पण आता अजून एखादी पुढची तारीख सांगण्याचे धाडस करणे मात्र त्यांना शक्य झाले नाही. नक्की तारीख फक्त नवले सर्च सांगू शकतील  त्यांनी दाखवून गेले कि सर्व प्राचार्य व संचालकही आता हतबल झाले असून कोणीही पुढे होऊन जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्राचार्यानी हात वर केल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व प्राचार्यानी राजीनामे द्यावेत कारण महाविद्यालय प्रमुख म्हणून काम करताना त्यांच्या अनावस्थेमुळे प्राध्यापकांची ससेपालट होत आहे अशी मागणी जोर धरू लागली. आंदोलकांनी आता आम्हाला प्राचार्यांसोबत काहीही चर्चा करायची नसून नवले सरांसोबत मिटिंग घडवून द्यावी अशी मागणी केली त्यानुसार ७ फेब्रुवारीला प्राध्यापकांची नवले सरांसोबत मिटिंग ठरली. 
  • ७  फेब्रुवारीची मिटिंग आंदोलकांसाठी खूप महत्वाची होती. कारण सर्व कॅम्पस मधील प्राध्यापक एरंडवणेच्या ऑफिस मध्ये जमणार होते. लोणावळ्याहूनही २ बसेस भरून प्राध्यापक आले. नवले सरानी नेहमी प्रमाणे संस्थेच्या रडगाण्यापासून सुरवात केली. प्राध्यापक काही ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. आता आणखीन पुढची तारीख नको आजच्या आज पगार करावा अशी मागणी आंदोलक करू लागले. नवले सरांच्या प्रत्येक दाव्याला लोक तिथेच खोडून काढू लागले. करार करूनही तो पाळला गेल्या नसल्याबद्लचा जाब विचारला असता त्या करारामध्ये कोणत्या बाबी लिहिल्या आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर  लोकांनी डोक्यावर हात मारून घेतला कि किती धडधडीतपणे हा माणूस  खोटा बोलत आहे. कराराच्या प्रत्येक बाबी या फोनवरून नवले सरांशी बोलूनच फायनल केल्यानंतर सिँहगडची व्यवस्थापन समिती पुढे सरकत असताना आपल्याला या करारातील बाबीच माहित नसल्याचा आव आणून नवले सरानी आंदोलकांच्या विश्वासाला तडा दिला. आज पर्यंत देव म्हणून लोक ज्याला देव्हाऱ्यात ठेवण्याची स्वप्ने पाहत असत त्यांना आता या माणसातील रावणाच्या दहा तोंडाची रूपे दिसू लागली. सगळ्यात मोठी हद्द केली नवले सरानी  हे सांगून कि जर प्राध्यापकांच्या जागी ते असते आणि १६ महिन्यांचा पगार झाला नसता तर त्यांनी कधीच आत्महत्या केली असती. आणि अजूनही आम्ही जिवंत आहोत यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पगारासाठी अजून १० दिवसांची मुदत त्यांनी मागून घेतली. आमच्या भावनांच्या व स्वप्नांच्या चिंधड्या करण्याऱ्या रावणाविरुद्ध लढण्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिला नव्हता. कारण त्यांचा शब्द म्हणजे उद्या सूर्य पश्चिमेला उगवेल इतका खोटा त्यांनी स्वतःच आपल्या पराक्रमातून दाखवून दिला होता.
    समाजकल्याणच्या नावाचे तुणतुणे किती दिवस वाजवणार आहेत सर ?
    विद्यार्थ्यांच्या जमा झालेल्या फी चा हिशेब का नाही देत तुम्ही ?
     
  • ८ फेब्रुवारीला AICTE ने सिंहगड संस्थेच्या २२ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे १६ महिन्याचे पगार प्रलंबित असल्याबद्दल २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी प्रवेशावर बंदी आणली व सर्वत्र एकच खळबळ उडाली. संस्था बुडाली व विद्याथी - प्राध्यापक यांचे भविष्य अंधारात आल्याची चर्चा सुरु झाली. पण शांत बसतील ते  संथाचालक  नवले कसले. त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच AICTE च्या आदेशावर स्थागितीमिळविली.  
  • १२ फेब्रुवारी ला प्राध्यापकांनी सिंहगड च्या व्यवस्थापन समिती मधील सहा लोक व नवले सर यांच्याविरुद्ध असहकार आंदोलनातील समन्वय करार न पाळून प्राध्यापकांची फसवणूक केल्याने पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे  उप कुलगुरू डॉ. उमराणी सर यांची झाडाझडती घेतली. दोन महिने होत आले तरीही विद्यापीठाने कोणतीही कारवाई सिंहगड व्यवस्थापनावर का केली नाही याचा जाब विचारला. तर असे उत्तर देण्यात आले कि सिंहग व्यवस्थापनातील दोन व्यक्तींनी येऊन विद्यापीठात भेट दिली आहे व लवकरात लवकर पगार करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. काही वेळातच विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही उमराणी सरांना जाब विचारला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यापीठाने १४ तारखेला एक समिती सिंहगड  महाविद्यालयात भेट देऊन प्रकरणाची सत्यता पडताळून कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
संध्याकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी
नवले सरांची वाट पाहिली पण सर आले नाहीत
(एवढे बिझी जगात फक्त ट्रम्प, मोदी किंवा नवले सर हे तिघेच)
  • १३ फेब्रवारीला ला हजारभर विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात मोर्चा काढला. एकदा का विद्यार्थी आपल्या विरोधात गेले तर खूप जड जाईल या भीतीने सर्व प्राचार्यांची फौज CC वर आली. दोन महिन्यांपासून प्राध्यापक CC वर  असताना यातला एकही माईका लाल CC वर फिरकालाही नव्हता. विद्यार्थ्यांची समजूत काढता काढता प्राचार्यांच्या तोंडाला फेस आला. पण नेहमीप्रमाणे समाजकल्याण व इतर ठरलेले कीर्तन ऐकविण्यास सुरवात केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नवले यांनाच भेटण्यासाठी बोलाविण्याची विनंती केली. प्राचार्यानी हात जोडून मान्य  केले कि मॅनेजमेंटकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे  प्राध्यापकांचा पगार करण्यात संथ अपयशी ठरली आहे. विद्यार्थ्यांना दोन - दोन रु राहिलेली फी  भरण्यासाठी दिलेल्या त्रासाची आठवण करून अश्या गैरव्यवहारांमुळे प्राध्यापकांची-विद्यार्थ्यांची झालेली वाताहत पाहताना लाज कशी वाटत नाही याचीही विचारणा विद्यार्थ्यांनी केली. एका विद्यार्थीनिने तर डॉ. देशपांडे याना सांगितले कि जर आधीच या प्राध्यापकांना सर्व प्राचार्यानी जर CC येऊन साथ दिली असती तर हि समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाच राहिली नसावी. आणि आताही जर सर्व प्राचार्य  , प्राध्यापकांसोबत आले नाहीत तर हि समस्या सोडविली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. एका सेकंड ईयर  च्या मुलीने एवढ्या मोठया संस्थेच्या प्राचार्यांना शिकवलेले शहाणपण एवढ्या उच्चं शिक्षित प्राचार्यांना का लक्ष्यात आली नाही याचेच आश्चर्य  वाटले. शेवटी विद्यार्थांनी ५ सेकंद साठी का होईना पण सर्व प्राचार्यांना आपल्या गुबगुबीत खुर्चीवर बसून मऊ झालेल्या आपल्या बुडांना CC  कडक फरश्यांवर बसण्यास भाग पडले आणि सिंहगडाच्या "पुनश्च हरिओम " यास सुरवात झाली. संध्याकाळी ७ वाजता नवले सर येतील भेटायला असे सांगण्यात आले. आपल्या दिलेल्या शब्दांना न पाळण्याची परंपरा नवले सरानी इथेही पाळली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्राचार्यानी येऊन सनीतले कि नवले सर सध्या येऊ शकत नाहीत ते उद्या उद्या दुपारी १.३० वाजता भेटतील.         

विद्यार्थ्यांनी फि दिली, शासनाने अनुदान दिले, पण ना संस्थेकडे पैसे आहेत
ना प्रध्यापकाना पगार आहे, मग पैसे गेले तरी कुठे नक्की.
(व्हाट्सअप ग्रुप मधून फिरनारा एक मेसेज )
================================================================================================================================================
आंदोलनाबाबतच्या शंकाचे निरसन: 
१) आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? 
उत्तर : 

  1. ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०१८ पर्यंतचा १६ महिन्यांचा सर्व प्रलंबित  पगार एकरकमी मिळावा. 
  2. पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावा व 
  3. इथून पुढचे पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत जमा करावा

२) समाजकल्याण विभागाकडून मिळणारे अनुदान व  विद्यार्थ्यांची फी मिळाले नसल्याने पगार करण्यास उशीर होत असल्याच्या श्री. मारुती नवले यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे?
उत्तर: 
  1. श्री. मारुती नवले यांच्या म्हणण्यानुसार  समाजकल्याण विभागाकडून मिळणारे या शैक्षणिक वर्ष्याचे (२०१७-१८) अनुदान (१३८ कोटी ), विद्यार्थ्यांची फी (२० कोटी) व गेल्या वर्षीच्या (२०१६-१७)  अनुदान (१८ कोटी), एकूण जवळपास १७५ कोटी रुपये मिळाले नसल्याने पगार करण्यास उशीर होत आहे. 
  2. उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास समजा,  
  • प्रथम वर्ष १००० विद्यार्थी प्रवेश संख्या असणाऱ्या इंजिनिअररिंग महाविद्यालयातील ४ वर्ष्यांची एकूण  विद्यार्थी संख्या = ४०००
  • शैक्षणिक फी: १ लाख प्रती विद्यार्थी (अंदाजे)
  • महाविद्यालयात जमा होणारी एकूण फी = ४००० * १ लाख = ४० कोटी
  • विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष महाविद्यालयात जमा होणारी फी = एकूण फी च्या ६० % = २४ कोटी
  • समाज कल्याण विभागाकडून मिळणारे अनुदान = एकूण फी च्या ४० % = १६  कोटी
  • एकूण जमा होणाऱ्या फी मधील पगारासाठीचा वाटा (५०%) = २० कोटी
  • महाविद्यालयातील इतर वार्षिक खर्चासाठी रक्कम (५०%) = २० कोटी 
वरील तपशिलानुसार असे दिसून येते कि विद्यार्थी फी जरी जमा केली तरी संपूर्ण पगार करता येणे शक्य आहे. अथवा समाज कल्याण विभागाकडून अनुदान जरी मार्च-एप्रिल मध्ये मिळत असते तरी त्या मिळणाऱ्या अनुदानातून फक्त शेवटच्या ४ महिन्यांचा पगार त्यातून करता येतो. उर्वरित ८ महिन्यांच्या पगाराची सोय संस्था मुलांच्या फी मधून करू शकते.
  • नवले सरांच्या दाव्यानुसार सन २०१६-१७ मधील १८ कोटी रु. अनुदान मिळणे बाकी आहे. मात्र पगार बाकी आहे तो ऑक्टोंबर २०१६ पासून चा मे २०१७ पर्यंत ८ महिन्याचा ६०% पगार. याची एकूण रक्कम पाहिली असता हि रक्कम १८ कोटी पेक्षा कितीतरी ज्यास्त आहे. याचा अर्थ २०१६-१७ मधील १८ कोटी रक्कम मिळाली तरी संस्था एक किंवा २ महिन्याचा पगार सुद्धा करू शकणार नाही त्यामुळे हा दावा फोल आहे.
  •    नवले सरांच्या दाव्यानुसार सन २०१७-१८ मधील एकून १५० कोटी समाज कल्याण विभागाकडून येणे बाकी आहे. मात्र सिंहगड संस्थेतील प्रती महिना पगाराची एकूण रक्कम जवळपास ५० कोटी आहे.  याचा अर्थ १५० कोटी मिळाले तरी संस्था फक्त शेवटच्या ३ महिन्याचा पगार करू शकते. म्हणजेच आधीच्या ९ महिन्यांच्या पगाराची रक्कम संस्थेकडे जमा झाली आहे.
  • वरील दोन तपशिलांवरून आपण असे समजू शकतो कि, अनुदान नाही म्हणून पगार केला नाही हा दावा साफ खोटा आहे. उलट आता पर्यंतच्या जमा झालेल्या फी बद्दल चाकर शब्द न काढता फी मधून जमा केलेल्या पैश्याचा गैरव्यवहार संस्थेने केला असण्याच्या शक्यतेला दाबून ठेवण्यात येत आहे.
घ्या पुरावा: सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट पुणे चा गेल्या ३ वर्षांची फी कलेक्शन  
घ्या पुरावा: श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणेचा गेल्या ३ वर्ष्यांची फी कलेक्शन    


घ्या पुरावा: सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स  पुणेचा गेल्या ३ वर्ष्यांची फी कलेक्शन
  • सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने धर्मादाय आयुक्त यांना जमा केलेला वार्षिक अहवाल

  1. अहवाल वर्ष २०१५-१६ 
  2. अहवाल वर्ष २०१६-१७
३) सदर आंदोलनामुळे झालेल्या विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण?
उत्तर:
५ डिसेंबर २०१७ रोजी व्यवस्थापनाला रीतसर पत्र देऊन १८ डिसेंबर पर्यंत पगार न केल्यास असहकार आंदोलन सुरु करणार असल्याची पूर्व सूचना जवळपास १३ दिवस आधीच संस्थेला दिली होती. तरी संस्थेने पगार केला नाही. तसेच संस्थेचा शैक्षणिक व आर्थिक कारभार योग्य प्रकारे चालू आहे कि नाही हे तपासून पाहण्याची जबाबदारी,
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी 
All India Council for Technical Education   (AICTE),
Directorate of Technical Education, Maharashtra
Savitribai Phule Pune University, 
समाज कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य 
चॅरिटी कमिशनर , पुणे 
या सर्वांची आहे. वरील संस्थांनी आपले काम योग्य प्रकारे न केल्यामुळे, व संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारांवर वेळोवेळी कानाडोळा कडून आपले खिसे भरून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्राध्यापकांच्या आर्थिक नुकसानीस व मानसिक छळास  जबाबदार आहेत.   

 
४) सदर आंदोलनातुन बाहेर येण्याचा मार्ग कोणता ?
उत्तर: प्राध्यापकांचे पगार लवकरात लवकर करून आधी शैक्षणिक कामकाज सुरु होण्यासाठी वरील संस्थांनी प्रयत्न करावेत. व संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषी असल्यात संस्थेचे ट्रस्ट  बरखास्त करून प्रशासक नेमून संस्था प्राध्यापकांना चालविण्यास द्यावी.
======================================================================================================================================
सिंहगड असहकार आंदोलनाचे दूरगामी परिणाम:
शिक्षणसम्राटांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मांडलेला बाजार त्यातून एकूणच उच्च शिक्षणातील खालावलेली परिस्थिती पाहता एकूणच विद्यार्थी व प्राध्यापक यांचे भविष्य व अस्मिता धोक्यात आली आहे.

सिंहगड हा फक्त या रावणाचा चेहरा.. देशातील खाजगी महाविद्यालय याचे बाकीचे चेहरे...
अनियंत्रीत व्यवहारांना लवकरात लवकर आला घालण्याची आवश्यकता असून असे न झाल्यास एकूणच शिक्षण व्यवस्था रसातळाला जाण्याची श्यक्यता आहे.

सिंहगडच्या प्राध्यापकांनी या रावणाला दहन करण्यास सुरवात केली असून देशातील प्रत्येक शिक्षण संस्थेतील व्यक्तींनी याचाआदर्श घेऊन या रावणदहनात  सहभागी व्हावे. व देशातील शिक्षण व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सहभागी व्हावे.

या आंदोलनातून  प्रशासनाने धडा घेऊन एकूणच देशातील खाजगी शिक्षण संस्थांना ताळ्यावर आणल्यास २००० प्राध्यापकानी सुरु केलेल्या या निर्मल विद्या यज्ञाचे फलित मिळाले असे समजण्यात यावे.     


बातमीपत्र:
इतर बातम्या:

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

#PaytoProfessor-Part II "गरजे पासून गर्जने पर्यंत .... गर्जने पासून गाजरांपर्यंत."

#PaytoProfessor-Part II
गरजे पासून गर्जने पर्यंत .... गर्जने पासून गाजरांपर्यंत..

सिंहगड व्यवस्थापनातील सहा उच्चपदस्थ व्यक्तींनी आंदोलकांच्या समन्वय समितीसोबतचा करारातील पहिलीच गोष्ट २४ जानेवारी २०१८ चा पहिला हफ्ता न दिल्याने विश्वासघात झाल्याची भावना लक्ष्यात घेऊन प्राध्यापकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  


१८ डिसेंबर २०१७ पासून सुरु झालेल्या असहकार आंदोलनाचा आज ३१ जानेवारी २०१८ चा २९ वा दिवस..
                   ५ डिसेंबरला रीतसरपणे निवेदन देऊन मॅनेजमेंटला गेल्या १४ महिन्यांच्या पगाराची मागणी करण्यात आली होती . अन्यथा १८ तारखेपासून असहकार आंदोलनाला सुरवात करण्यात येईल व सर्व प्राध्यापक कॉलेजच्या कोणत्याही कामकाजामध्ये भाग घेणार नाहीत याचे सूतोवाच करण्यात आले.
                    बारा महिन्यांचा ६०% पगार आणि दोन महिन्यांचा पूर्ण पगार प्रलंबित असताना १४ महिने आंम्ही कसे काढलेत ते आमचे आम्हालाच ठाऊक.
                        पगार होणे म्हणजे आमच्या साठी एक प्रकारे जोकच झाला होता. कारण सिंहगडचा पगार कधी होणार, किती होणार याची माहित खुद्द ब्रह्मदेवाला जरी विचारले  तरी त्याला देखील सांगता येणार नाही. त्यात आमची आनंद को. ऑपरेटिव्ह  बँक म्हणजे एक अजूबाच आहे म्हणा...  कारण विचार करा सन  २०१८ मध्ये सुद्धा या बँकेकडे ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशी कोणतीही सुविधा नाही. गणपती मंडळाचे वर्गणी पुस्तक असावे त्याप्रमाणे असणारे चेकबुक, त्यावरील  अकाउंट  नंबर  सुद्धा शिक्के मारून छापलेले. RBI ला अशी कोणती बँक भारतात अस्तित्वात आहे याची कल्पना आहे कि नाही कोणास ठाऊक. बरं.. एकदा पगार जमा झाला  आहे आणि चेक डिपॉजिट  करायला सांगितल्यावर देखील पगार होईल याचीही काही खात्री नाही कारण लवकर चेक जमा केला नाही की लेट  चेक  जमा केलेल्या लोकांचा पगार नाही झाला असे समजावे. जगातील हि एकमेव बँक असावी ज्यामध्ये अजूनही लँडलाईन  बँकिंग सुरु आहे तुम्हाला जर तुमच्या खात्यावरील रक्कम जाणून घ्यायची असेल तर त्या  बंकरच्या लँडलाईन  नंबर वर फोन करून विचारावे (तुमचे नशीब चांगले असेल तर बँकवाले फोन उचलतीलही ).
                               नियमित पगार होणाऱ्या कॉलेज मधील लोकांसाठी आम्ही सिंहगड वाले म्हणजे  चेष्टेचा विषय.. आणि ५ - ६ महिने पगाराचा एक छदाम हि न देणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाला आम्ही म्हणजे त्यांच्या कॉलेज  मध्ये उशिरा पगार करण्यासाठी एक उदाहरण झालो होतो कि हे पहा सिंहगड कॉलेज ची एवढे सगळे ऍडमिशन फुल्ल असून देखील वर्षभर पगार होत नाहीत, आणि येथील प्राध्यापक देखील काही न बोलता सहन करतात अश्या प्रकारे...
(बाकीच्या संस्थांची पण कमालच आहे... ३०० इनटेक वरून सुरु झालेल्या सिंहगड संस्थेला आता जवळपास FE चा ७००० चा इनटेक आहे.. With Full Admission... सर्व कॉलेजेस NACC मुल्यांकन प्राप्त.. सिंहगड कडून शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत पण बाकीच्या संस्थांनी आदर्श घेतला तो फक्त पगाराचा.. विशेषतः उशिरा पगार करणारे भिकारी कॉलेजेस..... असो...)
                   १८ तारखेपूर्वीच एखादी मोठी रक्कम देऊन हे आंदोलन आधीच दडपता आले असते पण सिंहगड व्यवस्थापनाने पुन्हा २ BASIC + AGP चा तुकडा आमच्या समोर टाकला... आम्ही उचाशिक्षित कुत्री आहोत याची पहिली जाणीव झाली ती  इथेच... जवळपास १००० प्राध्यापकांनी दिलेल्या १४ महिन्याच्या प्रलंबित पगाराच्या निवेदनाला .... वर ठेऊन उडवण्यात आले...
           शेवटी आम्ही मूर्ख (उच्चशिक्षित पढीत मूर्ख) प्राध्यापक लोक करणार तरी काय होतो. १८ डिसेंबरला असहकार आंदोलनाची सुरवात झाली. आता कोणाच्या बापाला माहित कि नक्की आंदोलन करायचे म्हणजे तरी काय करायचे ते. फक्त काम न करता आपापल्या कॉलेज मधील ठराविक एका ठिकाणी बसून राहायचे, म्हणजेच असहकार आंदोलन करायचे आणि जोपर्यंत पगार करत नाहीत तोपर्यंत उठायचे नाही असे समजून आम्ही उतरलो मैदानात उतरलो. आंदोलन किती दिवस चालेल, कुठ पर्यंत जाईल, परिणाम काय होतील याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती.
           बर, या आंदोलनाला सिंहगड मधील सर्व प्राध्यापकांचा पाठींबा होता का? तर तसेही नाही. सर्व HOD, बहुतेक सिनियर स्टाफ आणि नवीन जॉईन झालेले स्टाफ यांचा पाठींबा मिळाला नाही (कदाचित भीतीमुळे किंवा फाटल्यामुळे असेल)
                  पहिल्याच दिवशी न्यूज वाल्यांनी आमची दाखल घेतली त्यातून थोडा हुरूप आला. पण दुसरीकडे आमच्या मॅनेजमेंटने पहिले काम काय केले असेल तर ते म्हणजे लिस्ट बनविण्यास सुरवात केली कि कोण आंदोलनात आहे आणि कोण नाही. हळूहळू दबावाच्या तंत्रांना सुरवात झाली. या आंदोलना जे कोणी आहेत त्यांच्यावर नंतर कारवाई करण्यात येईल काढून टाकण्यात येईल वगेरे वगेरे वगेरे...
                      आमचे नशीब चांगले म्हणा किंवा देवाला आमची थोडीफार दया आली असावी की पहिल्या २ - ३ दिवसांमधेच TAFNAP (Teachers Association For Non Aided Polytechnics) संघटनेचे श्रीधर वैद्य यांनी आमच्या आंदोलकांना भेट दिली. पहिल्या वाक्यातच त्यांनी आमच्या सारख्या उच्च शिक्षित पढीक मूर्खाना जागा दाखवून दिली कि 'You are exploited because you deserve to be exploited.' म्हणून. ५ वर्षे सहन कारण करून आता तुम्हीच स्वताचा स्वाभिमान गहाण ठेऊन काम करण्याची सवय लावून दिली आहे. त्यानंतर त्यांनी अत्यंत योग्य रितेने आंदोलनाची दिशा दाखवून दिली. या आंदोलनाचे होणारे परिणाम त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचे मार्गही समजले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी हे ही सांगितले की, Its a psychological war हे एक मानसिक युद्ध आहे जिथे ज्या पक्षाचा आत्मविश्वास आधीढळेल त्याचा पराभव निश्चित होईल याची जाणीव करून दिली. आणि सर्व प्राध्यापकांनी शेवट पर्यंत अशीच एकी ठेवली तर कोणालाही काहीही न होता या युध्दात आपण विजयी होवू याची खात्री दिली.

                दरम्यानच्या काळात आम्ही AICTE, DTE आणि SPPU ची दारे ठोठावली. एवढ्या मोठ्या जमावाचा प्रक्षोभ बघून AICTE प्रत्येक कॉलेज ला कमिटी पाठवून वस्तुस्थिती जाणून घेतली. कमिटी समोर प्राध्यापकांनी अक्षरशः लोटांगण घालून आमच्या पगाराचा प्रश्न सोडविण्याची भिक मागितली. आम्ही विद्यापीठातही मोर्चा काढला व कुलगुरूंना निवेदन देऊन या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती वजा सूचना केली.  
                    इकडे कॉलेज मध्ये आम्ही आंदोलनकर्ते प्राध्यापक म्हणजे चूxxx आहोत असेही काही लोकांचे म्हणणे होते. मॅनेजमेंट म्हणजे पंधरा हत्ती आहे त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जसे पाहिजेल तसेच तो पगार करणार यातून काही निष्फन्न होणार नाही उलट जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावर वर्षअखेरीस  कारवाई होऊन काढून टाकण्यात येईल अशी चर्चा होत असे. लोक खिडकी मधून बघत असत आमच्याकडे पाहून हसत असत. आणि या आंदोलनातून जर काही पगार केलेच लवकर तर आपण आत राहूनही पगार लवकर मिळेल व आपला जॉब मात्र सुरक्षित राहील अश्या भावनेने लोक मनोमन खुश होते. ज्यांनी ६ महिने कधी वर्गाचे तोंडही बघितले नाही असे लोक देखील लेक्चर घेऊ लागले. आणि आंदोलनकर्त्या लोकांशिवायहि आपण आपल्या डिपार्टमेंट चे कामकाज चालू ठेऊ शकतो हे मॅनेजमेंटला दाखवून तिथेही आपल्याच सोबत बिनपगारी काम करुन मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रयत्न करत होते. याचा आंदोलन कर्त्यांना जरी काही फरक पडत नसला तरी मॅनेजमेंट वर जेवढा दबाव यायला हवा होता तेवढा येत नव्हता.
१५ दिवसांनी प्रिन्सिपलनि सर्व HOD सोबत आंदोलकांची मिटिंग घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला कि प्रेसिडेंट पगार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत लवकरच पगार होतील. आम्हाला हि राग येण्याचीच घटना होती कि मिडिया, AICTE, DTE आणि SPPU चे लोक येवून भेटून गेले तरी ज्यांची सगळ्यात पहिली जबाबदार आहे ते लोक मात्र १५ दिवसांनी आले. त्यांच्या कडून कॉलेज चे नेहमीचे रडगाणे ऐकून घेण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे त्या मिटिंग मधून काही निष्पन्न झाले नाही. 
त्यानंतर १ जानेवारीला प्रेसिडेंट नि स्वत मिटिंग घेतली. तोरा आणि कीर्तन मात्र नेहमीचेच होते. फक्त यावेळी त्यांनी पुढील ६ महिन्यामध्ये पाठीमागचे थकीत वेतन कसे देण्यात येईल याचे एक सर्क्युलर दिले. याच्या आधी अश्या प्रकारच्या कागदांचे गाजर बघून बघून वैतागलेल्या आंदोलनकर्त्या लोकांना यात नवीन काही दिसले नाही. त्यानुळे आंदोलन पुढे चालूच राहिले. मात्र आम्ही चर्चेला तयारी दाखवली.
आमच्या पैकी बरेचसे आंदोलकानी  मात्र प्रेसिडेंट नि दिलेला कागद प्रमाण मानुन आंदोलनातून माघार घेतली. इथे आमचा थोडा आत्मविश्वास डळमळीत होतो आहे कि काय असे वाटू लागले. कारण ज्या लोकांना पाहून दुसरे लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तेही लोक बिथरले व माघार घेऊ लागले.
मॅनेजमेंटने ३ तारखेला चर्चे साठी आमच्या प्रतिनिधीना आमंत्रण दिले. मात्र अचानक २ तारखेला रात्री चर्चा मॅनेजमेंट कडून रद्दबादल करण्यात आली. कारण काहीही नाही. ९ तारखेला पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण आले. आमचे १४ प्रतिनिधी व मॅनेजमेंट कडून ६ प्रतिनिधी उपस्थित  राहिले. स्वत: प्रेसिडेंट मात्र आले नाहीत. कळली ११ वाजता सुरु झालेली चर्चा ३ टप्यांमध्ये घेण्यात आली. एकमेकांवर हरएक प्रकारे दबाव टाकण्यात आला. जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या मुख्य मागणी म्हणजे एकरकमी रक्कम मिळावी याला मात्र ४ महिन्यांच्या कालावधी मध्ये ४ हप्त्यात करण्याचा करार करण्यात आला.
खरे म्हणजे हातात आमच्या काहीच मिळाले नव्हते पण कदाचित आमचाच अजून संयम राहिला नसता वर अजून FE SE PHASE I च्या परीखेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची भीती होती त्यामुळे याला बहुमताने मान्यता देण्यात आणि. सर्वांच्या मनामध्ये मात्र एकच शंका होती कि मॅनेजमेंट हा करार किती पाळेल याचा. 
पहिल्या हप्त्याची तारीख होती २४ जानेवारी. त्यामुळे २४ तारखे पर्यंत वाट पाहण्याशिंवाय गत्यंतर नव्हते. २ आठवड्याच्या या कालावधी मध्ये आम्ही बराच अभासक्रम शिकवून पूर्ण केला. २४ तारखेपर्यंत आमच्या खात्यात एक केळहि जमा करण्यात आले नाही.  उलट एक पुन्हा नवीन पत्रक काढून पैसे आहेत पण आयकर विभागाने कॉलेजची बँक खाती गोठवली असल्यामुळे पगार करण्यात अडचणी येत आहेत असे नवीन कारण देण्यात आले. आणि पुढची तारीख ३१ जानेवारी देण्यात आली.
पुन्हा पदरी निराशाच..
"आता विश्वास संपला " - निराशेच्या गर्देतील  उच्चशिक्षित प्राध्यापक  
पुन्हा २५ पासून आंदोलनाला सुरवात झाली. जोपर्यंत आमच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत तो पर्यंत कामाला सुरवात करायची नाही असा पवित्रा घेण्यात आला. साहजिकच ३१ ला काही पगार झाला नाही. आता मात्र हद्द झाली होती. कोणाच्या शब्दांना, कागदाला किंमत राहिली नव्हती. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार AICTE, DTE, SPPU, सिहगड संस्था म्हणजे केवळ आमची चेष्टा करण्यासाठी आहेत कि काय असा आम्हाला पडू लागला. आता भिक मागायची तरी कोणाकडे. फक्त पोकळ बोलने आणि कागदाशिवाय पदरात काहीच पडत नव्हते. असंतोष वाढत होता. जे लोक आर्ध्यातून परत गेले होते त्यांची निराशा झाली त्यामुळे तेही सामील झाले... काही नवीन लोकही सामील झाले...

६००-७०० प्राध्यापकांनी हातामध्ये गाजर घेऊन सिंहगडच्या ऑफिस वर मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली... करार मोडल्याची जबाबदारी घेऊन सर्व प्रिन्सिपलचे राजीनामे मागण्यात आले....
तारीख पे तारीख... तारीख पे तारीख..आम्ही झालो बारीक... तुम्ही खा खारीक..तुम्ही खा पोळी .. आम्हाला दया केळी 
२ फेब्रुवारीला आंदोलनात नसलेल्या प्रत्येकाला आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आले. मग त्यात  कोणी सिनियर स्टाफ असो कि HOD असो... आपली खुर्ची सांभाळायची असेल तर आपली खुर्ची, नेमप्लेट LAPTOP जे काही असेल ते घेउन आंदोलनांत सहभागी होण्यास सांगण्यात आले... कारण उद्यापासून आंदोलनाचा उद्रेक होणार होता.. टाळे लावण्याचीहि तयारी करण्यात आली..

सध्या आम्ही या वळणावर आहोत... 

दरम्यानच्या काळात बरेच दुसर्या कॉलेजचे लोक आम्हाला विचारात असत कि आंदोलन कुठपर्यंत आले आहे वगेरे.. ज्यांचे पगार रेगुलर होत आहेत ते लोक हसत असत आमच्यावर आणि शहाणे  असाल तर हे कॉलेज सोडून दुसरे कॉलेज जॉईन करण्याचे पण उपदेश देत होते...
पण अस किती दिवस चालणार आहे...
९९.९९ % प्रायव्हेट कॉलेजेस नि सरकार आणि नियमन करणाऱ्या संस्थांना धाब्याव्रर बसवले आहे... फक्त एक पाकीट देऊन प्रयेक कॉलेज ने आपली आपली प्रकारने दाबून ठेवली आहेत... 
KJ सारख्या प्रलंबित पगार ठेवणाऱ्या कॉलेज चे NACC मुल्यांकन झाले..
JSPM सारख्या आम्ही म्हणेल तो पगार.. बाही 6th पे वरेगे सगळ्यांना.... लावला आहे..
झील कॉलेज जिथे व्यक्तीनुसार DA बदलण्याची प्रथा आहे.. डी. वाय. पाटील ग्रुप, भारती विद्यापीठ ग्रुप, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, नवसह्याद्री, युनिव्हर्सल, सिद्धांत, सगळेच्या सगळे एका माळेचे मनी....फक्त फरक एवढाच कि त्यांची शोषण करण्याची पद्धत वेगळी आहे.. तिथल्या प्राध्यापकांना कश्या प्रकारे त्यांची मारतात याची कदाचित जाणीव असेल... आम्हाला तरी कुठे होती म्हणा... पण आंम्ही सगळेच उच्च शिक्षित चू... आहोत हे मात्र नक्की...

देशाचे भविष्य अश्या प्रकारच्या कॉलेजेस च्या धोरणामुळे धोक्यात आहे याची जाणीव कोणालाच नसावी... निराशेत बुडालेल्या प्राध्यापाकांमुळे त्यांच्या शिकवण्यावर होणारा परिणाम.. त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि एकूणच देशातील इंजिनिअरिंग ची खालावलेली परिस्तिथी... याचे मोजमाप करण्याचे परिमाण काहीच नसल्यामुळे सरकारचे, शिक्षण नियामक मंडळांचे मुद्दामून होणारे दुर्लक्ष म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच होत नाही का... की भारत महासत्ता बनण्यात इंजिनिअरिंगचा  मोठा वाटा असेल हे म्हणजे शिक्षण सम्राटांनी पैसे कमविण्यासाठी सरकारला  आणि जनतेला दाखवलेले सगळ्यात मोठे गाजरच नाही का म्हणायचे..... 

   
कुठे ते कर्मवीर  भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून शिक्षणगंगा खेड्यापाड्यात पोहचविली. आणि कुठे आमचे शिक्षणसम्राट नवले सर ज्यांनी आम्हा शिक्षकांना हातात गाजरे घेऊन दारोदारी - रस्तोरस्ती फिरवले.