सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

# आम्ही नव्याण्णव नटरंग

# आम्ही नव्याण्णव नटरंग


'आम्ही' म्हणजे नेमाडेंनी म्हंटल्याप्रमाणे शंभरातील आम्ही नव्याण्णव जण, जे त्या शंभरातील एकटयासमोर टाळ्या वाजवत बसणारे.

आमच्या इच्छा आणि मिळकती यात काडीमात्र संबंध नाही.
आमचा जन्म कोणामुळे झाला एवढाच आम्हाला माहित.. कश्यासाठी जन्माला आलोत, कसे वागायचे, कसे राहायचे, काय खायचे, काय प्यायचे या आमच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच ठरवत नाही. 

आम्ही जन्मालाच येतो दोन चेहरे घेऊन.. एक आतला आमचा स्वत:चा आणि एक बाकीच्यांना दाखवायचा..
सहसा आम्ही आमची आई वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी वर अवतार घेतो. 
लहान पणा पासूनच आमच्या आजूबाजूचे लोक आमच्या समोर टाळ्या वाजवून आमचे मनोरंजन करतात जेणेकरून मोठे झाल्यावर आम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू...

आम्ही काय शिकावं ते आम्ही कधीच ठरवत नाही. ते सगळे दुसरेच ठरवतात.. मग आमच्यातलाच कोणीतरी एखादा म्हणजे शंभरातील तो एकटा जेव्हा शाळेच्या स्नेहसंमेलनात स्टेजवर जावून सुंदर गाणे म्हणतो तेव्हा आम्ही त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवतो. जेव्हा तो एकटा भाषण करतो तेव्हा देखील आम्ही समोर बसू टाळ्या वाजवतो. आम्हालाही आमच्या आतमधल्या चेहऱ्याला समोर आणून आमच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवाव्यात अस नेहमी वाटत असते पण आम्ही कधी धाडस करत नाही. 

त्याने आपली स्वताची वाट शोधलेली असते. आम्ही आमच्या बाकीच्या टोळीसोबतची वाट पकडतो. कारण आम्हाला एकटे वेगळ्या वाटेने गेलोत तर हरवण्याची खूप भीती असते भलेही तो रस्ता आमच्या स्वप्नांकडे जाणार असेल.. आम्ही गर्दीचाच रस्ता पकडतो मग भलेही हा रस्ता कुठे जातो याचे आम्हाला भान नसेल तरी हरकत नाही. कारण आम्हाला गर्दीत राहण्याच एक वेगळच समाधान वाटत असते कि जर रस्ता चुकलाच तर सगळ्यांचा चुकेल, खड्ड्यात पडलो तर सगळेच पडतील.. मग तो पूर्ण रस्ता आम्ही देवावर भरंवसा ठेवून चालत राहतो.. तेही टाळ्या वाजवतच..!

आम्हाला आम्ही गेल्या २१ वर्षांमधे काय शिकलो आणि कश्यासाठी शिकलो ते समजत नाही. डिग्री झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो तो म्हणजे डिग्री झाल्यानंतर काय करायचं???
'त्या' एकट्याने अस काय वेगळ केल याचा विचार तेव्हा आम्ही करू लागतो, ते समजल तर ठीक. नाही समजत तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आणि समजल असत तरी त्याने ज्या वळणावर आपला रस्ता बदलला तिथे जाऊन परत सुरवात करण्याची रिस्क आम्ही घेत नाही. त्याने निवडलेल्या वेगळ्या रस्त्याच्या निर्णयाला आम्ही मग फक्त टाळ्या वाजवून तो श्रेष्ठ असल्याची कबुली देतो.


इथून पुढे मग टाळ्याच-टाळ्या,
कोणत्या तरी खाजगी कंपनीत आम्ही कसे बसे चिकटून जातो. याच कामासाठी आपण एवढा रस्ता चालत आलो का याच अवलोकन आम्ही करत नाही. कारण आम्हाला त्याचा त्रास होतो. आणि अवलोकन करून तरी काय उपयोग होणार म्हणून आम्ही देवाचा प्रसाद म्हणून त्याला कबूल करतो. तिथेही आमच खास काही चालत नाही.  कारण आमच्या डोक्यात या २१ वर्ष्यात जो काही कचरा भरून घेऊन आलोत आम्ही त्याचा इथे काही उपयोग नसतो. इथे फक्त बॉसने  वाक म्हंटल कि वाकायचं, धु म्हंटल कि धुवायच.. वाजव म्हंटल कि वाजवायच.. टाळ्या वाजवण्यात मग आम्ही कमी पडत नाही कारण आतापर्यंत त्याची खूप प्रक्टिस झालेली असते. 

आम्हाला त्याच्या समोर, त्याच्या साठी टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता आम्हाला एकट्याने राहणे जमत नाही.. जोडीदार हवा.. पण जोडीदाराच्या बापासमोर फक्त टाळी वाजवून चालत नाही. आमच्या स्वत:चा फ्लॅट हवा असतो. इथून मग आमच्या टाळ्यांची रांगच सुरु होते. आधी बँकेसमोर टाळ्या..
मग पगार वाढवण्यासाठी बॉस समोर टाळ्या (नियमित होत असेल तर), नसेल तर आधी पगार नियमित होण्यासाठी टाळ्या.. तरीही जमल नाही तरी जॉब बदलून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टाळ्या.. आधीच्या बॉस समोर मग तुंबलेला पगार देण्यासाठी टाळ्या.. उभारून टाळ्या.. नंतर वाकून टाळ्या.. शेवटी झोपून टाळ्या..

एवढ्या टाळ्या वाजवल्यावर काय काय फरक पडतो कि लोक आम्हाला काय म्हणतात ते,
शेवटी ते आम्हाला हेच म्हणणार ना "आम्ही नटरंग"
ज्यांनी जिंदगी जगण्याच्या चढाओढीत आपल पुरुष्यत्व विसरलो ते... आम्ही सगळे नव्याण्णव जन "नटरंग"

आमच्या जगण्या - मरण्याची कुठे काही गिणती नाही.. आम्ही रोज मरतो रोज नवीन जन्म घेतो..
आम्हाला कुठे वेगळी आयडेनटीटी गरजेचे नाही.. आम्ही सगळे एकसारखेच.. मग ते कोणत्याही लिंगाचे, धर्माचे, वयाचे वजनाचे असोत..

आमच्या आयुष्यात कोणताही मोठा सस्पेन्स नाही.. कधी आम्ही मृत्युच्या दाढेतून बाहेर आलो आहोत अस झाल नाही.. किंवा कोणी आम्हाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले असाही नाही. पुढे जाऊन म्हणाल तर आम्हीही कोणाला तशी मदत केली नाही.

आमची जिंदगी गेली ती टाळ्या वाजवण्यात.. म्हणजे थोडक्यात जुगाड करण्य्यात... कोणावर कधी मनापासून राग काढता आला नाही मग तो सरकारचा असो कि शेजारच्याचा असो.. चुकी आमची असो किवा नसो... आमचा राग आम्ही मरेपर्यंत सांभाळून ठेवला. कधी कोणावर मनापासून प्रेम केल नाही. केल तरी तीच किवा तोच मिळाला पाहिजे याचा अट्टाहास केला नाही.. मिळाली तर मिळाली नाही मिळाली तरी तिला कोण ना कोण तरी मिळेलच मलाही कोण ना कोण तरी मिळेलच.. नाहीच मिळाले तर हात कश्याला फक्त धुवायला दिलेत का..

आम्ही या जगात कधी येतो , कधी जातो कोणाला काही थांगपत्ता लागत नाही..
कोणी आमची आठवत काढत राहावी अस आम्ह काही पाठीमागे ठेवून जात नाही...
फक्त एकच गोष्ट आम्ही ठेवून जातो ती म्हणजे आमची दुसऱ्यांसमोर टाळ्या वाजवण्याची विरासत..

# असे आम्ही नव्याण्णव नटरंग..




  


    

अस इथे चालत नाही

अस इथे चालत नाही
Dear X,
                खूप दिवसांनी पत्र लिहितोय तुला.  कदाचित १२ वर्षांनी. तू सध्या काय करत असशील याची उत्स्तुकता मला नाहीये पण सकाळी त्या चहाच्या टपरीवर चहा पिताना हातातून ग्लास निसटला आणि तुझी आठवण झाली. तसही बरच काही हातातून निसटल अस वाटतंय... आधी करियर निसटल.. नंतर तू नंतर मी स्वत:च, स्वतापासून निसटलो.
       सध्या माझ बर चाललाय अस मित्र म्हणतात..
       इथे सध्या सगळीकडे Semester किंवा Yearly Pattern सुरु आहेत. शिकवण्याचे , शिकायचे आणि पगाराचेही... पण माझ्या होम लोन देणाऱ्या बँकेला हा Pattern माहित नसावा त्यामुळे ते मला महिन्याच्या महिन्याला पैसे मागतात.  कदाचित माझ्या बापजाद्यांनी खूप काही मोठी संपत्ती माझ्या साठी राखून ठेवलीय अस कोणीतरी सांगितलं असावे.
       सध्या मी जॉब करतोय, बरेच लोक त्याला मास्तरकी म्हणतात काही जन त्याला पाट्या टाकणे सुधा म्हणतात. पण मला लहानपणा पासून याचा जॉब चा खूप आदर वाटतो. मग ते सगळे अस का म्हणतात मला कोणास ठावूक. खूप प्रगती झाली आहे आपल्या शिक्षण पद्धतीत.. आता आधी सारख नाही राहील आपल्यासारख ४ वाजता उठून अभ्यास करा वगेरे मोठी मोठी जाडजूड पुस्तके घेऊन. इथे एका छोट्याश्या मोबिईल वरच अभ्यास करतात अगदी दिवस रात्र. कधी कधी एकत्र अभ्यासही करतात specially संध्याकाळी... जसा जसा अंधार वाढत जाईल तसा तसा अभ्यास वाढत जातो.. मुल-मुली एकत्रच अभ्यास करतात बर का... पण अंधारात का अभ्यास करतात मला समजत नाही.
       इथे आता प्रत्यक्ष भेटून बोलाव लागत नाही. नवीन एक अप्लिकेशन आलाय Whatsup म्हणतात त्याला.. खूप मस्त आहे ते. अगदी आपण एकमेकांच्या शेजारी बसलो असलो तरी बोलण्याची गरज पडत नाही. फक्त बोटांचा खेळ. मी सुद्धा तेच वापरतो. आम्ही घरातही असाच करतो. आपापल्या रुममध्ये आम्ही बसलेलो असतो आणि msg करत राहतो. बोलत कोणीच नाही. त्यामुळे घरात खूप शांती आहे.
       विद्यार्थी सुद्धा आता प्राध्यापकांशी खूप मिळून मिसळून राहतात.. कधी कधी आम्ही एकत्र देखील “बसतो” एकाच टेबलावर.
       मला कधीकधी आश्चर्य वाटत कि इतके सगळे व्यवस्थित चाललेलं असताना कुठतरी काहीतरी निसटल्यासारख वाटत... कदाचित वेळ असेल.. कदाचित तुही असशील.. कदाचित मी..
       कधी मन उदास झाल कि मुव्ही पाहतो, मठात जातो.. इथे देवाला नमस्कार सुद्धा अगदी छोटा करावा लागतो. ते म्हणतात ना flying kiss त्या सारख. कारण देवालाही माहित आहे. या भक्तानेच पृथ्वी चालवण्याचा ठेका घेतला आहे कदाचित त्याला वेळ नसेल हात जोडण्या साठी.
का कोणास ठावूक.. तू सोबत नाहीस याच समाधान वाटत.. आपल्या दोघांना एकत्र अस वागण जमलं नसत.. उगाच Old Fashion म्हणून म्हणून चिडवून घ्यावे लागले असते...
 आठवण आली कि त्याच टपरी वर जातो जिथ बसून आपण चहा पीत पुस्तकांवरती गप्पा मारायचो..
इथ तसं चालत नाही ... इथ Corn Grill Sandwich खात खात गप्पा कराव्या लागतात.. कोण कोणासोबत कधी कसा काय करत होता ते

Yours Y


“किडनी ऑन सेल”

“किडनी ऑन सेल” 

“किडनी ऑन सेल”


       रघुनाथराव गावातील तसं बडे प्रस्थ.. जिल्ह्यातील एक नामवंत उद्योजक..
       स्वत:च्या मागे कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीने, त्यांनी गेल्या ३० वर्ष्यांमध्ये अपार कष्ट सोसून आपले हे साम्राज्य उभारले. अनेक उद्योग धंद्यांबरोबर त्यांच्या स्वत:च्या बऱ्याच संस्था होत्या. जिल्ह्यातील बऱ्याच सामाजिक आणि राजकीय संस्थांमध्येही ते मोठ मोठ्या पदांवर ते कार्यरत होते. एकूणच रघुनाथराव म्हणजे त्या पंच क्रोशी मधील एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

       टेबलाखालून च्या व्यवहारांमुळे त्यांनी आपल्या उद्यागत लागणाऱ्या बऱ्याचश्या परवानग्या मिळवल्या होत्या. त्यांची संपत्ती आणि नावलौकिक गेल्या १० वर्ष्यांमध्ये बराच वाढला होता.  सर्व प्रकारची सुख-समृद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत होती.
       वेळ बदलली , काळ बदलला, परिस्थिती बदलली तसे रघुनाथरावही बदलले व त्यांचे शौकही बदलले. ते व्यसनांच्या अधीन होत होते. पत्नी व्यतिरिक्त गावातील एका तरून विधवेचा ही ते सांभाळ करत होते. ती विधावा सुद्धा जगण्याचा एक आधार म्हणून त्यांना त्यांच्या पत्नी प्रमाणेच सर्व सुख देत होती बदल्यात तिला महिन्याचे काही  धान्य आणि खर्चाला थोडे पैसे मिळत असत.
          एका बाजूला रघुनाथरावांचा रुबाब शौक वाढत होता तर दुसऱ्या बाजूला त्यांची नैतिकता ढासळत होती. मोठ्या – मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढली होती पण आपल्या पदरी असणारे नोकर चाकर , कर्मचारी यांच्या बद्दलचा आदरही कमी होत होता. पत्नी आणि त्या विधवेलाही ते तुच्छतेने वागवत.
       त्यांच्या वागण्यातील हा बदल त्या विधवेला आणि त्यांच्या पत्नीला जाणवत होता. त्या दोघानाही रघुनाथराव कडून एक एक मुलगे झाले होते. आता ते बऱ्यापैकी मोठेही झाले होते.
       त्यांच्या पत्नीला त्यांचा मुलाची आणि संपत्तीची काळजी होती. त्यांच्या पश्यातच सर्व संपत्ती आपल्या मुलाला मिळावी यासाठी ती धडपडत होती.
       विधवेला पूर्ण गाव रघुनाथरावची रखेल म्हणूनच ओळखत होते. तिच्या मुलाला तिने शहरात पाठवून दिले. तिथे एक हॉटेलात तो काम करू लागला. कधी कधीतो गावी आलच तर राखेलीचा मुलगा म्हणून त्याची लोक हेटाळणी करत असत. याला वैतागून त्याने गावी येणे कमी करत करत बंद केले. विधवा रघुनाथरावच्या तुकड्यांवर जगात होती.
       पुन्हा वेळ बदलली. रघुनाथांचे शौक आता अंगलट येत होते. बऱ्याच रोगांनी त्यांना आतून पोखरायला सुरवात केली. पत्नी काळजी करेनाशी झाली. मुलगाही बापावर गेला. बऱ्याच वाईट नादांना लागला होता. विधवेच्या घरी रघुनाथरावांचे जाने कमी होत होते. तीच बाई कधी कधी मग धान्य , पैसे संपले तर त्यांच्या घरी जाऊ लागली. साहजिकच त्यांच्या पत्नीला त्या विधवेचे घरी येणे पटत नसे. पत्नी त्या विधवेचा सडेतोड अपमान करत शिव्या देत हाकलून लावत असे. आपल्या पतीच्या अवस्थेला ही विधवाच जबाबदार आहे अस तिच्या मनात ठासून भरले होते.
       विधवेचे दिवस हलाखीत जात होते. रखेल म्हणून हेटाळणी वर कोणी कामही देत नसे. जो कोणी काम देण्यास पुढे येई बऱ्याच वेळी तो तिच्या कडून वेगळ्याच अपेक्षेने येत असे. ती लाचार झाली होती. रावांनी फक्त तिच्या शरीराचा उपयोग करून घेतला आणि आता तसा उपयोग करून घेता येत नसल्यामुळे आपली हालाखीची अवस्था झाली असल्याचे वाटून तिला वाईट वाटत असे.
       दारूच्या व्यसनामुळे रघुनाथरावानच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. पत्नी आणि मुलाने आपली किडनी देण्यासाठी नकार दिला. पण जोपर्यंत पूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर होत नाही तोपर्यंत आपल्या पतीला जिवंत ठेवण्यावाचून पर्याय नाही याची कल्पना पत्नीला होती. कमीत कमी पैश्यामध्ये कोणी किडनी देणार मिळतो का याचा ती शोध घेऊ लागली.
       रघुनाथरावांच्या बदललेल्या स्वभावामुळे पैसे घेऊनही कोणी किडनी देण्यासाठी तयार होत नसे. आणि जे कोणी तयार होत ते खूप साऱ्या पैश्याची मागणी करत त्यामुळे त्यांच्या पत्नीला ते मान्य होत नसे.
       विधवेचे दिवसही हलाखीचे होते. खाण्या पिण्याची पंचायत झाली होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून निर्लज्ज पणे पुन्हा रघुनाथाच्या दाराशी जाऊन भिक मागायची तिने ठरवले आणि ती निघाली. रघुनाथरावांच्या पत्नीने नेहानी प्रमाणे तिला दारातच उभी राहून शिव्या देऊ लागली. विधवा मान खाली घालून ऐकत होती तरीही तिला आतून राव येतील आणि काहीतरी मदत करतील या अपेक्षेने सहन करत होती.
       विधवेची अवस्था आणि गरज पाहून पत्नीला एक कल्पना सुचली तिने विधवे समोर एक प्रस्ताव ठेवला कि, जर विधवेने एक किडनी दिली तर तिला महिन्याला एक ठराविक रक्कम आणि धान्य देण्यात येईल.
       विधवा विचार करू लागली. ज्याचे चोचले पुरवण्यात तीच पूर्ण शरीर निकामी झालं, ते सांभाळन्यासाठी तिला त्यातलाच एक भाग द्यावा लागत होता. पण नाईलाज होता. ती तयार झाली.
       नाईलाजास्तव तिघानाही हा सौदा मान्य करावा लागला.
       रघुनाथरावानी आपली हयात ऐश आरामात घालवली पण या आजारपानात ते लाचार होते. जगण्यासाठी त्यांना हा सौदा मान्य करावाच लागला. त्यांच्या पत्नीला आपल्या पतीच्या संपत्ती मधला एक रुपायाही दुसऱ्याला देण्याची इच्छा नसताना तिला हा सौदा मान्य करावा लागला कारण रघुनाथराव जिवंत राहिल्याशिवाय तिला त्यांच्याकडून पूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर करून घेता येणार नव्हती. राहिली ती विधवा, तिचा तर अस्तित्वाचा प्रश्न होता आणि हा सौदा मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायही तिच्याकडे नव्हता.

            
      

“Z ब्रिज – उन्मत्त प्रेमाचा पूल”

 Z ब्रिज – उन्मत्त प्रेमाचा पूल”
      
Z ब्रिज – खरंतर न ची केळकर रोड आणि जंगली महाराज रोड यांना जोडणारा पूल. असा पुणे महापालिकेचा अर्थ
मी गुगल केल तर मला त्याच्याबद्दल ची अजून माहिती मिळाली ती अशी. “Z Bridge is not just a link between roads but also a popular hangout of Pune where friends and lovers linger around this bridge for hours together म्हणजे Z ब्रिज फक्त दोन रस्ते जोडणारा पूल नसून मित्रांसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी तासनतास एकत्र बसण्याचा पूल.
या पुलाच खर नाव देखील मला गुगल वरच समजल कि काकासाहेब गाडगीळ ब्रिज, पण त्या नावाचा बोर्ड मला तरी कुठे दिसला नाही. कदाचित माझ त्या बोर्डाकडे लक्ष नसेल ( कसं असेल ???) किंवा खूप लहानसा बोर्ड असेल कुठेतरी कोपऱ्यात.

Z ब्रिज –
एका बाजूला सदाशिव पेठ आणि दुसऱ्या बाजूला FC ची फॅशन स्ट्रीट,
एका बाजूला पुण्याची १५० वर्ष्यांपासुनाची संस्कुती तर दुसऱ्या बाजूला गेल्या १५ वर्ष्यांची संस्कृती.
एका बाजूला पुणेरी झब्बा आणि साडी चोळी तर दुसऱ्या बाजूला टॉप्स जीन्स स्कर्ट्स जॅकेट्स
एका बाजूला पुणेरी मिसळ दुसर्या बाजूला पिझ्झा बर्गर सँडविच...
एका बाजूला MPSC ची तयारी करण्यात ४-५ वर्षे घालवत असणारी पोर-पोरी.. आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याला आपल्या बोटांवर नाचवत बिंदासपणे ऐश करणारी Buddies

अस बरच काही...
आणि या बदला तील तो मधला Z ब्रिज,
       मी जंगली महाराज रोडवर गाडी पार्क केली आणि Z ब्रिज कडे गेलो. पण इथे सुद्धा मला पार्किंग ची सोय दिसली. गाडी रोडलाच Parallel ठेऊन बऱ्याच २ Wheelers एका ओळीत उभा केलेल्या. एवढी पार्किंग ची शिस्त तर मला जंगली महाराज रोडवर दिसली नाही.
       मी पुढे निघालो तसतसे मला जाणवू लागले कि च्यायला आपण एकटेच आहोत असे एकटेच फिरणारे... म्हणजे एकटा तर कोणीच नाही.. त्याच प्रमाणे चालतही कोणीच नाहीये. सगळे जन जोड्यांमध्ये आपापल्या गाडीच्या मागे बसले आहेत. कदाचित सावलीला बसले असतील. पण तसही नोवेंबर महिन्यात संध्याकाळी ५ वाजता सावलीत बसावे अस काही कारण असू शकेल हे मला तरी जरा शंकास्पद वाटले...
मी पुलाच्या कठड्याला टेकून सूर्यास्त पाहू लागलो..
पण कदाचित मी एकटाच ते पाहत असेन.. सगळे जन आपापल्या चंद्राला आणि चांदणीला पाहण्यात मश्गुल होते.

सूर्य बुडाला .. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागलो..
सगळे चिमणा चिमणी आपापल्या छोट्याश्या घरट्याच्या मागे एकेमेकांना एकदुसऱ्यांच्या चोचीने दाने भरत असावेत असा तो नजारा..
मला राहवेना पण एवढ्या थंडीतही वातावरण तापलेलं पाहून मी निघालो.

एका मुलीचा फोनवर बोलताना आवाज ऐकू आला.. “हां बाबा मी फ्रेंड्स सोबत दगडूशेट ला आलीय.. तासाभरात येईन परत”..
       आई घातली बरोबर चुना लावला.. मी दगडूशेठ ला मनातूनच नमस्कार केला. म्हणालो देवा या “निष्पाप जीवाला माफ कर” तसही तुला रोज अशे खूप सारे भक्त भेटत असतील.
       माझे मन राहवेना.. चिमणा – चिमणी ची भूक काही संपत नव्हती. उलट जितके दाने खातील तितकी अजून भूक पेटत होती.. वाटल प्रत्येकाला जाऊन सांगाव.. मित्रानो.. एवढी भूक लागली असेल तर उद्या माझ्या घरी या... मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो.. जेवढ काही जेवायचं आहे तेव्हडे जेवून घ्या...
       .. मी गाडी काढली आणि सुन्न मनाने दगडूशेठ कडे निघालो... मंदिरा समोरून जाता जाता फक्त मान हलवून नमस्कार केला. “देवा यात चूक आणि बरोबर अस काहीच नाही... हा आम्ही आमच्या व्यक्ती स्वतंत्रतेचा काढलेला अर्थ आहे... फक्त एवढीच विनंती कि त्या मुलीच्या बाबांना तासभर तरी त्या Z ब्रिज वरून पाठवू नको. पाखरू उपाशी असेल बिचारी.”
      
  


ब्लड टॅटू

         
x
ग्रेस (Grace)..नावच  सांगून जातं कि इंग्रजी शाळेत शिकलेली मुलगी. पण महाराष्ट्रीयन नावही ठेवलं होत 'पूजा'. नावातच फक्त भावुकता होती तशी ती वागण्यात मात्र बरीच मॉडर्न होती. नेहमी हसतमुख असणारी, स्वताचे निर्णय स्वत: घेणारी आणि तिच्याच शब्दात म्हणाल तर UNIQUE होती ती.

       फक्त एक निर्णय तिने आपल्या वडिलांचा ऐकला तो हा की, इंजिनीरिंग साठी पुण्यात शिकायला जायचं. वडील आर्मी ऑफिसर असल्यामुळे स्वताच्या एकुलत्या एका मुलीलाही एका  अनोळखी शहरात शिक्षणासाठी पाठवण्यात ते जराही कचरले नाहीत. त्यांच्याच  एकाप्राध्यापक मित्राने पुजाला आपल्याच इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकण्यासाठी पाठविण्याकरिता बराच पाठपुरावा केल्यानंतर, पूजाचे वडीलही तिला आपल्या मित्राच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये पाठविण्याकरिता  विश्वासाने तयार झाले.

       पूजा पुण्यात आली पण तिचे कॉलेज खरंतर पुणे शहरापासून  २०-२५ किलोमीटर बाहेर होत. इथल्या इंजिनीरिंग कॉलेजची एक विचित्र गोष्ट तिला इथे आल्यावर समजली ती म्हणजे अशी कि संपूर्ण पुणेजिल्ह्यामध्ये जितके काही इंजिनियरिंग कॉलेजेस असतील तितके सगळेच्या सगळे कॉलेजेस म्हणजे पुण्यातच; अगदी हाकेच्या अंतरावर किंवा कात्रज पासून अगदी २०-३० मिनिटांच्या अंतरावर आहे असे म्हणतात आणि मानतात देखील. मग भलेही ते कॉलेज सदाशिव पेठेपासून दीडशे-दोनशे किलोमीटर दूर का असेना.

       आउट ऑफ द सिटी कॉलेजच्या या वातावरणामुळे पूजा थोडी नाखूष होती. पण तिच्या येण्यामुळे कॉलेजमधली बाकीची मुले मात्र खुश होती. कारण त्या कॉलेजमधील जवळपास सर्व विद्यार्थी हे आजूबाजूच्या गावांमधून आणि खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून होते, आणि शहरातून फारच थोडे विद्यार्थी ज्यांना १२वी च्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडलेत आणि त्यामुळे शहरातील कॉलेजमधे प्रवेश न मिळालेले असे. थोडक्यात म्हणजे ओवाळून टाकलेले. पूजा या दोन्ही कॅटेगिरी मधून आलेली नव्हती. एकतर ती शहरातून आलेली व  इंग्रजी शाळेत शिकलेली हुशार मुलगी होती. 

       वपु म्हणायचे तसे सुंदर मुलीवर प्रेम करण्यासाठी डोक लागत नाही. त्याप्रमाणे पूजा कॉलेज मधील सर्वात सुंदर आणि स्मार्ट मुलगी असल्यामुळे साहजिकच तिच्या पाठीमागे पहिल्या वर्षीपासूनच मजनू मुलांचा ससेमिरा लागलेला होता. पण ती लक्ष देत नसे.

       आदित्य तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरातील मुलगा, तिच्यासोबतचज्युनियर कॉलेज मध्ये होता. तोही हुशार होता. एव्हाना पूजापेक्षाही ज्यास्त हुशार होता असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळे पुणे शहरामधल्याएका प्रतिष्ठित इंजिनीरिंग कॉलेज मध्ये त्याला प्रवेश मिळाला होता. पुजाला पुण्यात इंजिनीरिंग साठी येण्याकरिता मनवन्यामध्ये त्याचा सुद्धा मोठा रोल होता. त्यानेच पुजाच्या वडिलांना पुण्याच्या कॉलेज मध्ये इंजिनीरिंग करण्यामध्ये खूप स्कोप आहे अस समजावून तयार केले होते.
       जुनियर कॉलेज मध्ये असताना पूजा आणि आदित्यने बराच वेळ सोबत घालवला होता... एकच कॉलेज, एकच क्लास आणि अभ्यासही एकत्रच.. एकमेकांना एकमेकांच्या आवडी निवडींची चांगलीच ओळख होती. They were like a Best Friends.
                पुढे कॉलेज बदलल्या मुळे थोडा दुरावा वाढला असेल तरी मोबाईल मुळे त्या दोघानाही ते जाणवलं नाही. जवळपास रोजच ते एकमेकांशी बोलत असत एकमेकांच्या कॉलेज बद्दल गप्पा गोष्टी करत असत. आदित्यला आपल्या कॉलेजचा खूप अभिमान होता, असायलाही हवा कारण पुण्यातल नामांकित पहिल्या १० कॉलेज मधील कॉलेजमध्ये तो शिकत होता. पुजाला तो यावरून अधून मधून चिडवत असे. पुजालाही हे पटत असे. कारण तिच्या कॉलेजच्या लोकल च्या पोरांचा जवळ पास रोज कोण न कोण तिला फ्रेन्डशिप साठी किंवा रिलेशनशिप साठी प्रपोज करत असे. त्यामुळे का असेना पण ती मान्य करीत असे. जणू काही जगातील एवढी एकच सुंदर मुलगी शिल्लक राहिली आहे आणि तिला मिळविण्यासाठीचा पण प्रत्येकाने केला होता कदाचित.. कोणाकडे मदत म्हणून कोणा मुलासोबत बोलली तरी दुसऱ्या दिवसापासून तिला त्या नावाने चिडवायला सुरवात होत असे. अश्या मुलांच्या maturity ची कीव येवून सगळे असे प्रपोजल्स ती उडवून लावत असे.
       त्यामुळे मोकळ्या गप्पा ज्या हकी असतील त्या ती आदित्य सोबतच करत असे.
       गप्पा वाढत होत्या.. आवडी निवडी जुळत होत्या.. भावना कळत होत्या. Hi.. Good Morning मध्ये असणारे Conversation आता Miss U... Need u मध्ये बदलले होते. आदित्य आजारी असला कि पूजा काळजी करत असे आणि त्यालाही स्वत:ची काळजी करण्याबद्दल ओरडून सांगत असे. फ्रेन्डशिप च्या पुढे जाणारी त्यांची मैत्री एकमेकांना संकेत देत होती. शेवटी आदित्यने स्वता:हून पुढाकार घेऊन तिला प्रपोज केले. तिने लगेच होकार कळवला नाही आणि तसा तिचा नकारही नव्हता. त्यामुळे ते रिलेशनशिप सेल्फ डीक्लेरड BF-GF मध्ये पोहचले.
       कॉलेज मध्ये पूजा चे मन रमत नसे. सोबती म्हणून मदत करणारी मैत्रीण किंवा मित्र तिला कॉलेजमध्ये मिळत नव्हते. नाही म्हणायला फक्त अमर होता तिच्याच क्लास मध्ये जो तिला प्रक्टिकल आणि सबमिशन मध्ये मदत करत असे. पूजाला होस्टेलचे जेवण आजीबात आवडत नसे त्यामुळे अमर कधी कधी आपला टिफिन तिच्यासोबत शेअर करत असे. इतर मुलांप्रमाणे तो कधी flirt करून तिच्यासोबत बोलत नसे. त्यामुळे पूजालाही त्याच्या सोबत बोलण्यात comfortable वाटत असे त्यामुळे ती सुद्धा बऱ्याच वेळी अमरची मदत घेत असे.
       अमरच्या मित्रांनी त्याला हळू हळू चिडवण्यास आणि झाडावर चढवण्यास सुरवात केली होती.  कॉलेज मधील सर्वात सुंदर आणि स्मार्ट मुलगी फक्त त्याच्यासोबत बोलते याचे आश्चर्य जसे त्याच्या मित्रांकडून त्याला ऐकायला मिळेल तसे तसे आपणही कोणीतरी स्पेशल आहोत याची त्याला जाणीव होऊ लागली. या ना त्या कारणासाठी अगदी लहान सहन कारणांसाठीही तो पूजाला मदत करू लागे. पुजालाही त्याच्या स्वभावामुळे कॉलेज मधला एकुलता एक मित्र या रूपाने मिळत होता त्यामुळे कधी कधी तिला त्याच्यानावावरून Comment जरी आल्या तरी ती दुर्लक्ष करीत असे.
       आदित्य सोबत आपल्या कॉलेज बद्दलच्या गप्पा गोष्टी करत असताना पूजा कधी कधी अमर बद्दल बोलत असे. पण जस जसा अमर चा उल्लेख तिच्या बोलण्यात ज्यास्त येऊ लागला तास तसे आदित्य ला राग येत असे. अमर वरून आदित्य आणि पूजा मध्ये रुसवे फुगवे वाढू लागले. प्रत्येक वेळो पूजा अमर हा फक्त आपला मित्र आहे याची खात्री आदित्य ला देत असे आणि त्याचा राग कमी करत असे.
       अमरला याची जाणीव होत होती. पुजासोबतच्या बोलण्यातून त्याला आदित्य आणि पूजाच्या रिलेशनशिप बद्दल आधीपासूनच कल्पना होती. आदित्य च्या अश्या वागण्याच्या त्याला आश्चर्य वाटत असे आणि राग सुद्धा येत असे.
       एक दिवस आदित्य आणि पूजा मधील भांडण अगदी टोकाला पोहचले. त्यानंतर मात्र पूजाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. बरेच दिवस बोलणे बंद झाले. त्रास दोघानाही होत होता. पूजाला या मानसिक त्रासामध्ये पाहून अमर तिची ज्यास्तक काळजी करू लागला. आणि शक्य तितका वेळ तो तिच्यासोबत तिचे दुख: कमी करण्यात तिला समजावण्यात घालवू लागला. आदित्य रागावला होता.. त्याने ड्रिंक्स घ्यायला सुरवात केली. आपल्या पट्टीच्या व्यसनी मित्रांना त्याने जवळ केले आणि त्यांच्या व्यसनांनाही त्याने जवळ केले.
       भावनेच्या भरात आदित्य ने त्याच्या हातावर ब्लेडने पूजाचे नाव लिहून तिला पाठवला. त्याचा हा वेडेपणा बघून, पूजाने त्याला स्वत: भेटून त्याची समजूत काढायचे ठरवले. भेटायला जाताना त्याने अमरलाही सोबत नेण्याचे ठरवले जेणेकरून तिघांमध्ये असलेली गैरसमजूत प्रत्यक्ष भेटून दूर करण्यात येईल.
       आपल्या Blood Tattoo ला पाहून पूजाला आपल्या प्रेमच जाणीव झाली असेल आणि ती भेटायला येत असेल अशी आदित्यचीसमजूत झाली होती. पूजा भेटायला आल्यानंतर तिच्यासमोर पुन्हा एकदा तिच्या नावाचा blood  tattoo तिच्या समोरच काढून तिला इम्प्रेस करून अमर पासून तिला दूर करायचे ठरवले.
       भेटायला आल्यानंतर त्याने पूजा सोबत अमर आल्याचे बघितले आन त्याच्या रागाचा पार चढला. पूजा समोरच तो अमर वर धावून गेला. पूजाने त्या दोघांन थांबवण्याचा पप्रयत्न करू लागली. आदित्य काही ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. रागाच्या भारत त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने अमर वर वार केले. पूजाने आरडा ओरडा करून मदतीला लोक बोलावले. लोकांनी आदित्य आणि  अमरला बाजूला केले. अमरला हॉस्पिटल मध्ये आणि आदित्यला पोलिसांकडे घेऊन गेले. एवढा मोठा तमाशा झालेला पाहून पूजा आतून हादरून गेली होती. पोलिसांनी तिघांच्या आई वडिलांना बोलावून घेतले. आदित्यला त्याच्याच वडिलांनी पोलिसांसमोरच मुस्कटात ठेऊन द्यायला सुरवात केली. पोलिसांनी त्यांची संजुत काढून त्यांना पाठवून दिले. आर्मी ऑफिसर असणाऱ्या पुजाच्या वडिलांना तिची यात काहीच चुकी नसल्याची जाणीव होती. तिला या धक्यातून बाहेर काढण्यासाठी तिला सोबत घेऊन ते काही दिवस आपल्यासोबत घेऊन गेले.