#PaytoProfessor-Part II
गरजे पासून गर्जने पर्यंत .... गर्जने पासून गाजरांपर्यंत..
१८ डिसेंबर २०१७ पासून सुरु झालेल्या असहकार आंदोलनाचा आज ३१ जानेवारी २०१८ चा २९ वा दिवस..
५ डिसेंबरला रीतसरपणे निवेदन देऊन मॅनेजमेंटला गेल्या १४ महिन्यांच्या पगाराची मागणी करण्यात आली होती . अन्यथा १८ तारखेपासून असहकार आंदोलनाला सुरवात करण्यात येईल व सर्व प्राध्यापक कॉलेजच्या कोणत्याही कामकाजामध्ये भाग घेणार नाहीत याचे सूतोवाच करण्यात आले.
बारा महिन्यांचा ६०% पगार आणि दोन महिन्यांचा पूर्ण पगार प्रलंबित असताना १४ महिने आंम्ही कसे काढलेत ते आमचे आम्हालाच ठाऊक.
पगार होणे म्हणजे आमच्या साठी एक प्रकारे जोकच झाला होता. कारण सिंहगडचा पगार कधी होणार, किती होणार याची माहित खुद्द ब्रह्मदेवाला जरी विचारले तरी त्याला देखील सांगता येणार नाही. त्यात आमची आनंद को. ऑपरेटिव्ह बँक म्हणजे एक अजूबाच आहे म्हणा... कारण विचार करा सन २०१८ मध्ये सुद्धा या बँकेकडे ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशी कोणतीही सुविधा नाही. गणपती मंडळाचे वर्गणी पुस्तक असावे त्याप्रमाणे असणारे चेकबुक, त्यावरील अकाउंट नंबर सुद्धा शिक्के मारून छापलेले. RBI ला अशी कोणती बँक भारतात अस्तित्वात आहे याची कल्पना आहे कि नाही कोणास ठाऊक. बरं.. एकदा पगार जमा झाला आहे आणि चेक डिपॉजिट करायला सांगितल्यावर देखील पगार होईल याचीही काही खात्री नाही कारण लवकर चेक जमा केला नाही की लेट चेक जमा केलेल्या लोकांचा पगार नाही झाला असे समजावे. जगातील हि एकमेव बँक असावी ज्यामध्ये अजूनही लँडलाईन बँकिंग सुरु आहे तुम्हाला जर तुमच्या खात्यावरील रक्कम जाणून घ्यायची असेल तर त्या बंकरच्या लँडलाईन नंबर वर फोन करून विचारावे (तुमचे नशीब चांगले असेल तर बँकवाले फोन उचलतीलही ).
नियमित पगार होणाऱ्या कॉलेज मधील लोकांसाठी आम्ही सिंहगड वाले म्हणजे चेष्टेचा विषय.. आणि ५ - ६ महिने पगाराचा एक छदाम हि न देणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाला आम्ही म्हणजे त्यांच्या कॉलेज मध्ये उशिरा पगार करण्यासाठी एक उदाहरण झालो होतो कि हे पहा सिंहगड कॉलेज ची एवढे सगळे ऍडमिशन फुल्ल असून देखील वर्षभर पगार होत नाहीत, आणि येथील प्राध्यापक देखील काही न बोलता सहन करतात अश्या प्रकारे...
(बाकीच्या संस्थांची पण कमालच आहे... ३०० इनटेक वरून सुरु झालेल्या सिंहगड संस्थेला आता जवळपास FE चा ७००० चा इनटेक आहे.. With Full Admission... सर्व कॉलेजेस NACC मुल्यांकन प्राप्त.. सिंहगड कडून शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत पण बाकीच्या संस्थांनी आदर्श घेतला तो फक्त पगाराचा.. विशेषतः उशिरा पगार करणारे भिकारी कॉलेजेस..... असो...)
१८ तारखेपूर्वीच एखादी मोठी रक्कम देऊन हे आंदोलन आधीच दडपता आले असते पण सिंहगड व्यवस्थापनाने पुन्हा २ BASIC + AGP चा तुकडा आमच्या समोर टाकला... आम्ही उचाशिक्षित कुत्री आहोत याची पहिली जाणीव झाली ती इथेच... जवळपास १००० प्राध्यापकांनी दिलेल्या १४ महिन्याच्या प्रलंबित पगाराच्या निवेदनाला .... वर ठेऊन उडवण्यात आले...
शेवटी आम्ही मूर्ख (उच्चशिक्षित पढीत मूर्ख) प्राध्यापक लोक करणार तरी काय होतो. १८ डिसेंबरला असहकार आंदोलनाची सुरवात झाली. आता कोणाच्या बापाला माहित कि नक्की आंदोलन करायचे म्हणजे तरी काय करायचे ते. फक्त काम न करता आपापल्या कॉलेज मधील ठराविक एका ठिकाणी बसून राहायचे, म्हणजेच असहकार आंदोलन करायचे आणि जोपर्यंत पगार करत नाहीत तोपर्यंत उठायचे नाही असे समजून आम्ही उतरलो मैदानात उतरलो. आंदोलन किती दिवस चालेल, कुठ पर्यंत जाईल, परिणाम काय होतील याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती.
बर, या आंदोलनाला सिंहगड मधील सर्व प्राध्यापकांचा पाठींबा होता का? तर तसेही नाही. सर्व HOD, बहुतेक सिनियर स्टाफ आणि नवीन जॉईन झालेले स्टाफ यांचा पाठींबा मिळाला नाही (कदाचित भीतीमुळे किंवा फाटल्यामुळे असेल)
पहिल्याच दिवशी न्यूज वाल्यांनी आमची दाखल घेतली त्यातून थोडा हुरूप आला. पण दुसरीकडे आमच्या मॅनेजमेंटने पहिले काम काय केले असेल तर ते म्हणजे लिस्ट बनविण्यास सुरवात केली कि कोण आंदोलनात आहे आणि कोण नाही. हळूहळू दबावाच्या तंत्रांना सुरवात झाली. या आंदोलना जे कोणी आहेत त्यांच्यावर नंतर कारवाई करण्यात येईल काढून टाकण्यात येईल वगेरे वगेरे वगेरे...
आमचे नशीब चांगले म्हणा किंवा देवाला आमची थोडीफार दया आली असावी की पहिल्या २ - ३ दिवसांमधेच TAFNAP (Teachers Association For Non Aided Polytechnics) संघटनेचे श्रीधर वैद्य यांनी आमच्या आंदोलकांना भेट दिली. पहिल्या वाक्यातच त्यांनी आमच्या सारख्या उच्च शिक्षित पढीक मूर्खाना जागा दाखवून दिली कि 'You are exploited because you deserve to be exploited.' म्हणून. ५ वर्षे सहन कारण करून आता तुम्हीच स्वताचा स्वाभिमान गहाण ठेऊन काम करण्याची सवय लावून दिली आहे. त्यानंतर त्यांनी अत्यंत योग्य रितेने आंदोलनाची दिशा दाखवून दिली. या आंदोलनाचे होणारे परिणाम त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचे मार्गही समजले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी हे ही सांगितले की, Its a psychological war हे एक मानसिक युद्ध आहे जिथे ज्या पक्षाचा आत्मविश्वास आधीढळेल त्याचा पराभव निश्चित होईल याची जाणीव करून दिली. आणि सर्व प्राध्यापकांनी शेवट पर्यंत अशीच एकी ठेवली तर कोणालाही काहीही न होता या युध्दात आपण विजयी होवू याची खात्री दिली.
दरम्यानच्या काळात आम्ही AICTE, DTE आणि SPPU ची दारे ठोठावली. एवढ्या मोठ्या जमावाचा प्रक्षोभ बघून AICTE प्रत्येक कॉलेज ला कमिटी पाठवून वस्तुस्थिती जाणून घेतली. कमिटी समोर प्राध्यापकांनी अक्षरशः लोटांगण घालून आमच्या पगाराचा प्रश्न सोडविण्याची भिक मागितली. आम्ही विद्यापीठातही मोर्चा काढला व कुलगुरूंना निवेदन देऊन या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती वजा सूचना केली.
इकडे कॉलेज मध्ये आम्ही आंदोलनकर्ते प्राध्यापक म्हणजे चूxxx आहोत असेही काही लोकांचे म्हणणे होते. मॅनेजमेंट म्हणजे पंधरा हत्ती आहे त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जसे पाहिजेल तसेच तो पगार करणार यातून काही निष्फन्न होणार नाही उलट जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावर वर्षअखेरीस कारवाई होऊन काढून टाकण्यात येईल अशी चर्चा होत असे. लोक खिडकी मधून बघत असत आमच्याकडे पाहून हसत असत. आणि या आंदोलनातून जर काही पगार केलेच लवकर तर आपण आत राहूनही पगार लवकर मिळेल व आपला जॉब मात्र सुरक्षित राहील अश्या भावनेने लोक मनोमन खुश होते. ज्यांनी ६ महिने कधी वर्गाचे तोंडही बघितले नाही असे लोक देखील लेक्चर घेऊ लागले. आणि आंदोलनकर्त्या लोकांशिवायहि आपण आपल्या डिपार्टमेंट चे कामकाज चालू ठेऊ शकतो हे मॅनेजमेंटला दाखवून तिथेही आपल्याच सोबत बिनपगारी काम करुन मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रयत्न करत होते. याचा आंदोलन कर्त्यांना जरी काही फरक पडत नसला तरी मॅनेजमेंट वर जेवढा दबाव यायला हवा होता तेवढा येत नव्हता.
१५ दिवसांनी प्रिन्सिपलनि सर्व HOD सोबत आंदोलकांची मिटिंग घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला कि प्रेसिडेंट पगार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत लवकरच पगार होतील. आम्हाला हि राग येण्याचीच घटना होती कि मिडिया, AICTE, DTE आणि SPPU चे लोक येवून भेटून गेले तरी ज्यांची सगळ्यात पहिली जबाबदार आहे ते लोक मात्र १५ दिवसांनी आले. त्यांच्या कडून कॉलेज चे नेहमीचे रडगाणे ऐकून घेण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे त्या मिटिंग मधून काही निष्पन्न झाले नाही.
त्यानंतर १ जानेवारीला प्रेसिडेंट नि स्वत मिटिंग घेतली. तोरा आणि कीर्तन मात्र नेहमीचेच होते. फक्त यावेळी त्यांनी पुढील ६ महिन्यामध्ये पाठीमागचे थकीत वेतन कसे देण्यात येईल याचे एक सर्क्युलर दिले. याच्या आधी अश्या प्रकारच्या कागदांचे गाजर बघून बघून वैतागलेल्या आंदोलनकर्त्या लोकांना यात नवीन काही दिसले नाही. त्यानुळे आंदोलन पुढे चालूच राहिले. मात्र आम्ही चर्चेला तयारी दाखवली.
आमच्या पैकी बरेचसे आंदोलकानी मात्र प्रेसिडेंट नि दिलेला कागद प्रमाण मानुन आंदोलनातून माघार घेतली. इथे आमचा थोडा आत्मविश्वास डळमळीत होतो आहे कि काय असे वाटू लागले. कारण ज्या लोकांना पाहून दुसरे लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तेही लोक बिथरले व माघार घेऊ लागले.
मॅनेजमेंटने ३ तारखेला चर्चे साठी आमच्या प्रतिनिधीना आमंत्रण दिले. मात्र अचानक २ तारखेला रात्री चर्चा मॅनेजमेंट कडून रद्दबादल करण्यात आली. कारण काहीही नाही. ९ तारखेला पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण आले. आमचे १४ प्रतिनिधी व मॅनेजमेंट कडून ६ प्रतिनिधी उपस्थित राहिले. स्वत: प्रेसिडेंट मात्र आले नाहीत. कळली ११ वाजता सुरु झालेली चर्चा ३ टप्यांमध्ये घेण्यात आली. एकमेकांवर हरएक प्रकारे दबाव टाकण्यात आला. जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या मुख्य मागणी म्हणजे एकरकमी रक्कम मिळावी याला मात्र ४ महिन्यांच्या कालावधी मध्ये ४ हप्त्यात करण्याचा करार करण्यात आला.
खरे म्हणजे हातात आमच्या काहीच मिळाले नव्हते पण कदाचित आमचाच अजून संयम राहिला नसता वर अजून FE SE PHASE I च्या परीखेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची भीती होती त्यामुळे याला बहुमताने मान्यता देण्यात आणि. सर्वांच्या मनामध्ये मात्र एकच शंका होती कि मॅनेजमेंट हा करार किती पाळेल याचा.
पहिल्या हप्त्याची तारीख होती २४ जानेवारी. त्यामुळे २४ तारखे पर्यंत वाट पाहण्याशिंवाय गत्यंतर नव्हते. २ आठवड्याच्या या कालावधी मध्ये आम्ही बराच अभासक्रम शिकवून पूर्ण केला. २४ तारखेपर्यंत आमच्या खात्यात एक केळहि जमा करण्यात आले नाही. उलट एक पुन्हा नवीन पत्रक काढून पैसे आहेत पण आयकर विभागाने कॉलेजची बँक खाती गोठवली असल्यामुळे पगार करण्यात अडचणी येत आहेत असे नवीन कारण देण्यात आले. आणि पुढची तारीख ३१ जानेवारी देण्यात आली.
पुन्हा पदरी निराशाच..
पुन्हा २५ पासून आंदोलनाला सुरवात झाली. जोपर्यंत आमच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत तो पर्यंत कामाला सुरवात करायची नाही असा पवित्रा घेण्यात आला. साहजिकच ३१ ला काही पगार झाला नाही. आता मात्र हद्द झाली होती. कोणाच्या शब्दांना, कागदाला किंमत राहिली नव्हती. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार AICTE, DTE, SPPU, सिहगड संस्था म्हणजे केवळ आमची चेष्टा करण्यासाठी आहेत कि काय असा आम्हाला पडू लागला. आता भिक मागायची तरी कोणाकडे. फक्त पोकळ बोलने आणि कागदाशिवाय पदरात काहीच पडत नव्हते. असंतोष वाढत होता. जे लोक आर्ध्यातून परत गेले होते त्यांची निराशा झाली त्यामुळे तेही सामील झाले... काही नवीन लोकही सामील झाले...
६००-७०० प्राध्यापकांनी हातामध्ये गाजर घेऊन सिंहगडच्या ऑफिस वर मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली... करार मोडल्याची जबाबदारी घेऊन सर्व प्रिन्सिपलचे राजीनामे मागण्यात आले....
तारीख पे तारीख... तारीख पे तारीख..आम्ही झालो बारीक... तुम्ही खा खारीक..तुम्ही खा पोळी .. आम्हाला दया केळी
२ फेब्रुवारीला आंदोलनात नसलेल्या प्रत्येकाला आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आले. मग त्यात कोणी सिनियर स्टाफ असो कि HOD असो... आपली खुर्ची सांभाळायची असेल तर आपली खुर्ची, नेमप्लेट LAPTOP जे काही असेल ते घेउन आंदोलनांत सहभागी होण्यास सांगण्यात आले... कारण उद्यापासून आंदोलनाचा उद्रेक होणार होता.. टाळे लावण्याचीहि तयारी करण्यात आली..
सध्या आम्ही या वळणावर आहोत...
दरम्यानच्या काळात बरेच दुसर्या कॉलेजचे लोक आम्हाला विचारात असत कि आंदोलन कुठपर्यंत आले आहे वगेरे.. ज्यांचे पगार रेगुलर होत आहेत ते लोक हसत असत आमच्यावर आणि शहाणे असाल तर हे कॉलेज सोडून दुसरे कॉलेज जॉईन करण्याचे पण उपदेश देत होते...
पण अस किती दिवस चालणार आहे...
९९.९९ % प्रायव्हेट कॉलेजेस नि सरकार आणि नियमन करणाऱ्या संस्थांना धाब्याव्रर बसवले आहे... फक्त एक पाकीट देऊन प्रयेक कॉलेज ने आपली आपली प्रकारने दाबून ठेवली आहेत...
KJ सारख्या प्रलंबित पगार ठेवणाऱ्या कॉलेज चे NACC मुल्यांकन झाले..
JSPM सारख्या आम्ही म्हणेल तो पगार.. बाही 6th पे वरेगे सगळ्यांना.... लावला आहे..
झील कॉलेज जिथे व्यक्तीनुसार DA बदलण्याची प्रथा आहे.. डी. वाय. पाटील ग्रुप, भारती विद्यापीठ ग्रुप, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, नवसह्याद्री, युनिव्हर्सल, सिद्धांत, सगळेच्या सगळे एका माळेचे मनी....फक्त फरक एवढाच कि त्यांची शोषण करण्याची पद्धत वेगळी आहे.. तिथल्या प्राध्यापकांना कश्या प्रकारे त्यांची मारतात याची कदाचित जाणीव असेल... आम्हाला तरी कुठे होती म्हणा... पण आंम्ही सगळेच उच्च शिक्षित चू... आहोत हे मात्र नक्की...
देशाचे भविष्य अश्या प्रकारच्या कॉलेजेस च्या धोरणामुळे धोक्यात आहे याची जाणीव कोणालाच नसावी... निराशेत बुडालेल्या प्राध्यापाकांमुळे त्यांच्या शिकवण्यावर होणारा परिणाम.. त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि एकूणच देशातील इंजिनिअरिंग ची खालावलेली परिस्तिथी... याचे मोजमाप करण्याचे परिमाण काहीच नसल्यामुळे सरकारचे, शिक्षण नियामक मंडळांचे मुद्दामून होणारे दुर्लक्ष म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच होत नाही का... की भारत महासत्ता बनण्यात इंजिनिअरिंगचा मोठा वाटा असेल हे म्हणजे शिक्षण सम्राटांनी पैसे कमविण्यासाठी सरकारला आणि जनतेला दाखवलेले सगळ्यात मोठे गाजरच नाही का म्हणायचे.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा