साला आजचा दिवस आपण जगला...
आज ना भविष्याची चिंता ना भूतकाळातील लाचारी..
आज ना भविष्याची चिंता ना भूतकाळातील लाचारी..
आज फक्त मी...
ना कोणी सांगायची गरज ना कोणाच्या धमक्यांची भीती...
ना कोणी सांगायची गरज ना कोणाच्या धमक्यांची भीती...
भीती... अहो पण कश्याची... जॉब वरून काढल्यानंतर जगणार कसे याची कि बिन पगारी काम करून करून रोज कुढत-कुढत, आतल्या आत मरत-मरत जिवंत राहायची...
अस आणि तसही रोज रोज मरण्यापेक्षा आज एकदाचे होऊन जाऊदे जे होईल ते... उद्या काय होईल ते होईल पण आज काही नाही.. आजचा दिवस माझा..
गेल्या दोन-तीन वर्ष्यांपासून सतत मनामध्ये एक विचार घोळत असतो कि, साला आपल्या आयुष्यामध्ये काय सस्पेन्स - थ्रिल नावाची गोष्ट आहे कि नाही... शिक्षित मध्यम वर्गातला जन्म, अति हुशार नाही तरी जवळपास सर्व अभ्यासात आणि कलागुणाची जाण, गुरुकुलात प्राथमिक शिक्षण , नंतर विवेकानंद कॉलेज, नंतर इंजिनीरिंग BE.. M.TECH पुढे इंजिनीरिंग कॉलेज मध्ये Asst. Professor पदावर काम करत करत PhD करण्याची इच्छा, पुण्यात स्वत:चा Flat (निम्यापेक्षा ज्यास्त पगार EMI मध्ये जात असला तरी) एवढ सर्व काही सुरळीत चालू असताना मनाची अशी फडफड का कि लाईफ मध्ये काही तरी सस्पेन्स - थ्रिल असायला पाहिजे अस..
जन्मच झाला तो स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्ष्यानी म्हणजे गुलामगिरी भोगली नाही... पोलिओ प्लेग असे आजार सुद्धा निघून गेलेत त्यामुळे मेजर असा रोग झाला आहे कि ज्यामुळे कमी दिवसामध्ये ज्यास्त जागून घेण्याची भूक लागली आहे असाही नाही.. झालीच तर कधीतरी थोडीफार सर्दी आंनी ज्यास्त चहा पिऊन पिऊन आलेलं तोंड... गाडी खूप शिस्तीत आणि नियमात चालवतो अस काही नसतानाही कधी हात पाय तुटावे असा अपघात नाही.. साला म्हणून अलीकडे असं नेहमी वाटत राहते कि आपल्या आयुष्यात कोणाला काही सांगावे अश्या गोष्टी आहेत कि नाहीत..
हो पण हे कधी पर्यत..
कालपर्यंत ची गोष्ट..
आज आहे माझ्याकडे सांगण्यासाठी..
कारण आज पहिल्यांदा जे केल ते स्वतःच्या मनाने.. आज पर्यंत केल ते दुसर्यांना माझ्याबद्दल काय वाटेल , माझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल काय वाटेल या विचारानेच...
पण आजचा तो पहिला दिवस जो जगाला तो स्वताच्या मनाने..
४ वर्ष्यांच्या जॉब च्या एका टप्प्यानंतर मी प्रगतीचा एक पुढचा नवीन टप्पा म्हणून पुण्यातल्या एका नामांकित कॉलेज मध्ये आलो..
या ४ वर्ष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील खूप नव्या गोष्टी शिकलो.. विशेषत: इंजिनिअरींग मधील..
भरमसाट वाढलेली इंजीनिरीन कॉलेज.. त्यामुळे एकूणच विद्यार्थी आणि विद्येचा खालावलेला दर्जा.. विद्यार्थी गोळा करण्यासाठी कॉलेजेस ची एकमेकांवर चाललेली कुरघोडी.. हुशार विद्यार्थी, आणि मुली यांना शेक्षणिक सवलत म्हणून कमी फी मध्ये अडमिशन च्या जागा भरण्यासाठी चालवलेला इंजिनिअरीग चा बाजार... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. प्रोफेसर लोकांच्या पगारातील अनियमितता...
अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणार्या एका नवीन इंजिनिअरीग कॉलेज मध्ये अडमिशन वाढविण्यासाठी चाललेल्या हरएक प्रयत्नामध्ये सर्व तोपरी भाग घेऊन शेवटी मी ठरवलं कि आता ही मरमर सोडून पुण्यात वेल-सेटल्ड कॉलेज मध्ये काम करावे आणि नवीन शक्य तितक्या गोष्टी शिकाव्यात..
म्हणून ६ महिन्यापूर्वी मी एक नामांकित संस्थेमध्ये रुजू झालो.. पगाराची अनियमितता आहे याची कल्पना असून देखील मी हा निर्णय घेतला याचे माझे मलाच आश्चर्य वाटत असे.. पण नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्यामुळे मी खुश होतो.. पैश्यांची थोडीफार ओढाताण होत होती पण इट्स ओके.. मिळालेल्या सोयीसुविधा पाहता त्याची झळ पोहचण्याची तीव्रता कमी वाटत होती..
डिसेंबर महिन्याचा होम लोनचा EMI गेल्यानंतर मात्र मी मोकळा झालो. मोकळा म्हणजे. पाकीट मोकळे आणि बँक अकौंटंही मोकळे.. कसाबसा FD मोडून यावेळच्या EMI ची सोय केली पण आता पुढे काय..
आधीच्या कॉलेजने तीन पगार थांबवले... त्यांना मागायला जावे तर त्यांचीच झोळी मोकळी.. ज्याना उधारी दिली त्याना मागावे तर तेही मोकळेच (जर भरलेले असतेच तर मला कश्याला मागितले असते)
आणि नवीन कॉलेज मध्ये तर पगार होण्याचा संबंधच नव्हता कारण मी येण्या पूर्वीच ८ महिन्यांचा पगार बाकी होता आणि आता टोटल १४ महिन्यांचा पगार बाकी आहे..
नक्की ही भानगड काय आहे ती मला काही समजत नव्हती.
साला पगार ही तर महिन्याच्या महिन्याला होण्याची साधी गोष्ट आहे कारण खर्च तर रोजच आहे ना... मग हे ४ महिने पगार नाही ८ महिने नाही १४ महिने नाही.. हा नक्की काय प्रकार आहे... कारण इथले अडमिशन तरी फुल आहेत.. १००० पेक्षा ज्यास्त इनटेक आहे... या संस्थेमुळे पुण्याच्या आजुबाजुंची वीसएक कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली आहे मग अस का याच उत्तर मला काही सापडले नाही.. आणि विचाराचे तर कोणाला..
साला AICTE, DTE, LIC, SPPU, NACC या संस्था नक्की करतात तरी काय मग.... महाराष्टातील जवळपास ८० % इंजिनिअरींग कॉलेजेस ची हीच अवस्था.. नियमित पगार करणारे कॉलेज स्केल देत नाही.. स्केल देणारे कॉलेज नियमित पगार देत नाही.. आणि स्केल असून नियमित पगार देणार कॉलेज अस्तित्वात असेल अस मला तरी वाटत नाही..
या सगळ्यांमध्ये पिसला गेला तो म्हणजे मी आणि आमच्या सारखे प्रोफेसर लोक... सध्या अवस्था अशी आणि कि घरातील स्वताच्या लग्नकार्यला किंवा म्हणाल तर अगदी जवळच्या च्या अंतीम संस्कारालाही उधारी मध्ये किंवा क्रेडीट कार्ड वर NO COST EMI लग्नाचा जथ्था किंवा तिरडीचे साहित्य घ्यावे लागेल...
बर नाक घासून पू चाटून पगार होत असते तर ते ही केल असते ( already करून झालंय) पण तेही नाही...
"रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग" याची अनुभूती येत आहे.. त्यासाठी कोणत्या महायुद्धाची गरज नाही..
रोज असे गेले १४ महिने लाचार होऊन जगणे किंव्हा मित्रांकडे.. बायकोकडे.. आई वडिलांकडे.. संस्थेकडे लाचार होऊन भिक मागणे म्हणजे रोजचे मरण नाही का... एक वेळ तलवारीने एका क्षणात मान कापून जीव गेला तरी समाधान वाटेल पण रोज असे मान झुकवून कधी होणार कधी होणार याचा विचार करत लटकत असलेली मान कधी गळून पडेल हे आता सांगता येत नाही..
म्हणून आजचा दिवस मी जगायचं ठरवला आहे...
रोजच मरण हे पुरे झाले...
आता हक्कासाठी लढताना बळी पडलो तरी बेहत्तर..
मरणाच्या अंतिम क्षणी या काही दिवसांपुरते तरी आंम्ही आमचे आयुष्यभराचे षंढत्व बाजूला ठेऊन ताठ मानेने लढलो हे आठवून श्वास सोडायला मोकळे होऊ......
पण हा क्षण आम्ही जिवंतपणी जगून दाखवला याचे समाधान राहील..
#PaytoProfessor पुढील भाग वाचा
#PaytoProfessor: Part V – “President Sir, Yes you are guilty”
#PaytoProfessor पुढील भाग वाचा
#PaytoProfessor: Part V – “President Sir, Yes you are guilty”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा