# Hidden Folder
Study Material
सिक्युरिटी गार्डला सांगूनही त्याने त्या दोघांना हटकले नाही. शेवटी तिथल्या एका सरांनीच त्या दोघांना ओरडून हाकलून लावले. आणि त्यानंतर आम्ही किती तरी वेळ या गोष्टीवर विचार करत राहिलो..
तुला GF किंवा BF आहे का? हे विचारणे म्हणजे तू मोबाईल वापरतो का अस विचारण्यासारखा तो जोक होईल. पुण्यासारख्या शहरामध्ये शिकण्यासाठी आलेल्या कोणत्याही डिग्रीच्या मुलाला किंवा मुलीला हे विचाराने म्हणजे खरंतर मूर्खपणाच आहे. रूम, मेस, क्लास, मोबाईल आणि GF या by-default अश्या गोष्टी आहेत.
पण
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.. नो पार्किंग मध्ये गाड्या लावू नयेत.. रेड सिग्नल असला कि गाड्या थांबवाव्यात.. या गोष्टी जश्या सहज समजणाऱ्या पण अशक्यप्राय गोष्टी आहेत. तसेच म्हणजे कॉलेज कॅम्पसमध्ये किसिंग किंवा Obscene Acts करणे..
PL मध्ये कॉलेज कॅम्पस बराचसा रिकामा असतो.. एक्झाम च्या कामासाठी येणारा स्टाफ आणि सिक्युरिटी गार्ड सोडून सहसा कोणी कॉलेज मध्ये फिरकत नाही. नवीनच जॉईनिंग केलेल्या काही स्टाफ ना मात्र सुट्टी नसते. एका सरांच्या केबिन शेजारीच असणाऱ्या निमुळत्या रस्त्यावर एक कपल भर दुपारी रंगात आले आहे.. एकमेकांना कवेत घेऊन उभारलेल्या कपल ला पाहून त्यांना थोडं अस्वस्थ वाटलं पण पुन्हा त्यांनी स्वताला आपल्या आपल्या कामात लक्ष्य घालायला सुरवात केली. ही काही त्यांना आश्चर्य करणारी किंवा नवीनच गोष्ट अस वाटण्याचे काही कारण नव्हते. एवढ्या मोठ्या कॅम्पस मध्ये अश्या लहान सहान गोष्टी चालणारच म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. थोड्या वेळानी ते कपल गेले असेल कि अजून असेल या उत्सुकतेने त्यांनी पडदा थोडासा सरकवला. त्या कपल मधील मुलाने आपल्या GF ला मागून पडकून नवल सोबत खेळत तिच्या off shoulder टी शर्ट मधून बाहेर आलेल्या नॉटला आपल्या ओठांनी सोडत liplock केले.
त्या स्टाफने दुसऱ्या क्षणाला झटकन पडदा ओढून घेत बाहेर जाऊन सिक्युरिटी गार्डला सांगितले. सिक्युरिटी गार्डला सांगूनही त्याने त्या दोघांना हटकले नाही. शेवटी तिथल्या एका सरांनीच त्या दोघांना ओरडून हाकलून लावले.
चिडलेल्या त्या स्टाफने आपल्या कलीगसना ही गोष्ट सांगितली. अश्या प्रकारच्या गोष्टी कॉलेज कॅम्पस मध्ये कोणत्याही परिस्थितीत झाल्या नाही पाहिजेत असे त्याचे म्हणणे... आता खरंच ही गोष्ट चुकीची आहे यात शंका नाही पण.. डिस्कशनचे अनेक मुद्दे होते. जसे कि अश्या गोष्टी कश्या काय होतात तेही कॉलेज कॅम्पसमध्ये.. त्याला जोडूनच दुसरा मुद्दा आला कि कॉलेज कॅम्पसमध्ये ही गोष्ट जर चुकीची असेल तर मग मुव्ही थियेटर, z ब्रिज सारसबाग, शनिवार वाडा.. कॅम्प, सिंहगड अश्या पुण्यातल्या चिक्कार ठिकाणी चालणारी गोष्ट बरोबर आहे का... साहजिकच जर नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ती चालते कशी.. आणि जर बरोबर असेल तर ?????
कोणी म्हणाले कि अश्या गोष्टी इग्नोर करा..
कोणी म्हणाले कि आताची जनरेशन तशीच आहे.. आणि कुठेही अस करू नये अस लिहिलेलं नाहीये..
कोणी म्हणाले कि आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय केले असते..
आपल्याला अस काही करता आले नाही म्हणून जळतो कि काय...
त्यांनी केले त्यांचे ते बघू देत... आपल्या हातात काय आहे..
कोणी म्हणाले.. आजपर्यंत कोणी BP बघितले नाही सांगा.. (आम्ही सगळे गप्प) मग जगाला शहाणपणा सांगण्याची काय गरज... वगेरे वगेरे...
डिस्कशन संपेपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहचलो कि ज्यास्तीत ज्यास्त आपण इतकेच म्हणू शकतो कि इतकेच जर तुंबले असेल तर बाळानो ही घ्या माझ्या flat ची चावी आणि जा... उरकल कि फक्त चावी परत आणून द्या...
आम्ही हसलो आणि चर्चा संपवून घरी निघालो..
रात्री असच एका मित्राने Whatsup वर मेसेज पाठवला..
We’re the middle children of history, man. No purpose or place. We have no Great War. No Great Depression. Our Great War’s a spiritual war… our Great Depression is our lives. We’ve all been raised on television to believe that one day we’d all be millionaires, and movie gods, and rock stars. But we won’t. And we’re slowly learning that fact. And we’re very, very pissed off.”
आपण इतिहासाच्या अश्या एका मधल्या टप्प्यावरची मुले आहोत, जिथे आपल्याला इतिहासात कुठेही जागा नाहीये .. कोणताही मोठा उदेश्य नाही. कोणतेही युद्ध नाही , डिप्रेशन नाही.. आमचे महान युद्ध एक आध्यात्मिक युद्ध आहे ... आमचे सगळ्यात मोठे डिप्रेशन आमचे रोजचे जगणे आहे. आपण अश्या प्रकारच्या TV वरच्या सेरीअल्स आणि मुव्ही बघून विश्वास ठेवतो की एक दिवस आपण सगळे कोट्याधीश असाल आणि रॉकस्टार यांच्यासारखे असाल. पण आम्ही नाही असे काहीच नाहीये. आपण हळूहळू खरं शिकत आहोत कि सर्व सोयी सुविधांनी युक्त जीवन आपले "झंड" (Pissed Off ला योग्य शब्द हाच वाटला) झाले आहे.
पब्लिक प्लेस मध्ये किंवा कॉलेज कॅम्पस मध्ये वाढणाऱ्या या नव्या संस्कृतीला आपण पाहायचे ते कसे?
सध्या सर्व काही इंटरनेट वर उपलब्ध आहे. सगळ्या सोयी इतक्या सहजतेने मिळत आहेत कि काळजी करावी असे काहीच नाही. १५ मिनिटात आपण १ GB पर्यंतचा डेटा डाऊनलोड करू शकतो.. अस असेल तर अभ्यासाचे ते किती आपण पाहतो. किती आपल्या कामाचे पाहतो. एका सर्वेक्षणानुसार २१ ते ३० या वयातील मुले आणि मुली यांचा दिवसाचा इंटरनेट चा उपयोग हा जवळपास १२ तास आहे पैकी फक्त २ तास हा कामासाठी आणि नंतर इतर उद्योगासाठी..
ज्या इतर उद्योगांना आपण म्हणतो "Hidden Folders"...
तसा तो आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो.. डोक्यात असतो..
अश्या गोष्टी ज्या आपण उघडपणे बघितल्या कि नकोश्या वाटतात पण आपण एकटे असू तर केल्याने काही फरक पडणार नाहीत असा विचार करतो...
त्या कराव्या कि नाही याच्यासाठी आपल्याकडे कधी शिक्षण देण्यात येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा