सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

“Z ब्रिज – उन्मत्त प्रेमाचा पूल”

 Z ब्रिज – उन्मत्त प्रेमाचा पूल”
      
Z ब्रिज – खरंतर न ची केळकर रोड आणि जंगली महाराज रोड यांना जोडणारा पूल. असा पुणे महापालिकेचा अर्थ
मी गुगल केल तर मला त्याच्याबद्दल ची अजून माहिती मिळाली ती अशी. “Z Bridge is not just a link between roads but also a popular hangout of Pune where friends and lovers linger around this bridge for hours together म्हणजे Z ब्रिज फक्त दोन रस्ते जोडणारा पूल नसून मित्रांसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी तासनतास एकत्र बसण्याचा पूल.
या पुलाच खर नाव देखील मला गुगल वरच समजल कि काकासाहेब गाडगीळ ब्रिज, पण त्या नावाचा बोर्ड मला तरी कुठे दिसला नाही. कदाचित माझ त्या बोर्डाकडे लक्ष नसेल ( कसं असेल ???) किंवा खूप लहानसा बोर्ड असेल कुठेतरी कोपऱ्यात.

Z ब्रिज –
एका बाजूला सदाशिव पेठ आणि दुसऱ्या बाजूला FC ची फॅशन स्ट्रीट,
एका बाजूला पुण्याची १५० वर्ष्यांपासुनाची संस्कुती तर दुसऱ्या बाजूला गेल्या १५ वर्ष्यांची संस्कृती.
एका बाजूला पुणेरी झब्बा आणि साडी चोळी तर दुसऱ्या बाजूला टॉप्स जीन्स स्कर्ट्स जॅकेट्स
एका बाजूला पुणेरी मिसळ दुसर्या बाजूला पिझ्झा बर्गर सँडविच...
एका बाजूला MPSC ची तयारी करण्यात ४-५ वर्षे घालवत असणारी पोर-पोरी.. आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याला आपल्या बोटांवर नाचवत बिंदासपणे ऐश करणारी Buddies

अस बरच काही...
आणि या बदला तील तो मधला Z ब्रिज,
       मी जंगली महाराज रोडवर गाडी पार्क केली आणि Z ब्रिज कडे गेलो. पण इथे सुद्धा मला पार्किंग ची सोय दिसली. गाडी रोडलाच Parallel ठेऊन बऱ्याच २ Wheelers एका ओळीत उभा केलेल्या. एवढी पार्किंग ची शिस्त तर मला जंगली महाराज रोडवर दिसली नाही.
       मी पुढे निघालो तसतसे मला जाणवू लागले कि च्यायला आपण एकटेच आहोत असे एकटेच फिरणारे... म्हणजे एकटा तर कोणीच नाही.. त्याच प्रमाणे चालतही कोणीच नाहीये. सगळे जन जोड्यांमध्ये आपापल्या गाडीच्या मागे बसले आहेत. कदाचित सावलीला बसले असतील. पण तसही नोवेंबर महिन्यात संध्याकाळी ५ वाजता सावलीत बसावे अस काही कारण असू शकेल हे मला तरी जरा शंकास्पद वाटले...
मी पुलाच्या कठड्याला टेकून सूर्यास्त पाहू लागलो..
पण कदाचित मी एकटाच ते पाहत असेन.. सगळे जन आपापल्या चंद्राला आणि चांदणीला पाहण्यात मश्गुल होते.

सूर्य बुडाला .. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागलो..
सगळे चिमणा चिमणी आपापल्या छोट्याश्या घरट्याच्या मागे एकेमेकांना एकदुसऱ्यांच्या चोचीने दाने भरत असावेत असा तो नजारा..
मला राहवेना पण एवढ्या थंडीतही वातावरण तापलेलं पाहून मी निघालो.

एका मुलीचा फोनवर बोलताना आवाज ऐकू आला.. “हां बाबा मी फ्रेंड्स सोबत दगडूशेट ला आलीय.. तासाभरात येईन परत”..
       आई घातली बरोबर चुना लावला.. मी दगडूशेठ ला मनातूनच नमस्कार केला. म्हणालो देवा या “निष्पाप जीवाला माफ कर” तसही तुला रोज अशे खूप सारे भक्त भेटत असतील.
       माझे मन राहवेना.. चिमणा – चिमणी ची भूक काही संपत नव्हती. उलट जितके दाने खातील तितकी अजून भूक पेटत होती.. वाटल प्रत्येकाला जाऊन सांगाव.. मित्रानो.. एवढी भूक लागली असेल तर उद्या माझ्या घरी या... मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो.. जेवढ काही जेवायचं आहे तेव्हडे जेवून घ्या...
       .. मी गाडी काढली आणि सुन्न मनाने दगडूशेठ कडे निघालो... मंदिरा समोरून जाता जाता फक्त मान हलवून नमस्कार केला. “देवा यात चूक आणि बरोबर अस काहीच नाही... हा आम्ही आमच्या व्यक्ती स्वतंत्रतेचा काढलेला अर्थ आहे... फक्त एवढीच विनंती कि त्या मुलीच्या बाबांना तासभर तरी त्या Z ब्रिज वरून पाठवू नको. पाखरू उपाशी असेल बिचारी.”
      
  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा