x
ग्रेस (Grace)..नावच सांगून जातं
कि इंग्रजी शाळेत शिकलेली मुलगी. पण महाराष्ट्रीयन नावही ठेवलं होत 'पूजा'. नावातच फक्त भावुकता होती तशी ती वागण्यात मात्र बरीच मॉडर्न होती. नेहमी हसतमुख असणारी, स्वताचे निर्णय स्वत: घेणारी आणि तिच्याच शब्दात म्हणाल
तर UNIQUE होती ती.
फक्त
एक निर्णय तिने आपल्या वडिलांचा ऐकला तो हा की, इंजिनीरिंग साठी पुण्यात शिकायला
जायचं. वडील आर्मी ऑफिसर असल्यामुळे स्वताच्या एकुलत्या एका मुलीलाही एका अनोळखी शहरात शिक्षणासाठी
पाठवण्यात ते जराही कचरले नाहीत. त्यांच्याच एकाप्राध्यापक मित्राने पुजाला आपल्याच इंजिनियरिंग कॉलेज
मध्ये शिकण्यासाठी पाठविण्याकरिता बराच पाठपुरावा केल्यानंतर, पूजाचे वडीलही तिला आपल्या मित्राच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये पाठविण्याकरिता विश्वासाने तयार
झाले.
पूजा पुण्यात आली पण तिचे कॉलेज खरंतर पुणे शहरापासून २०-२५ किलोमीटर बाहेर होत. इथल्या इंजिनीरिंग कॉलेजची एक विचित्र गोष्ट तिला इथे आल्यावर समजली ती म्हणजे अशी कि
संपूर्ण पुणेजिल्ह्यामध्ये जितके काही इंजिनियरिंग कॉलेजेस असतील तितके सगळेच्या सगळे कॉलेजेस म्हणजे पुण्यातच; अगदी हाकेच्या अंतरावर किंवा कात्रज पासून अगदी २०-३० मिनिटांच्या अंतरावर आहे असे म्हणतात आणि मानतात देखील. मग भलेही
ते कॉलेज सदाशिव पेठेपासून दीडशे-दोनशे किलोमीटर दूर का असेना.
आउट ऑफ द सिटी कॉलेजच्या या वातावरणामुळे
पूजा थोडी नाखूष होती. पण तिच्या येण्यामुळे कॉलेजमधली बाकीची मुले मात्र खुश होती. कारण
त्या कॉलेजमधील जवळपास सर्व विद्यार्थी हे आजूबाजूच्या गावांमधून आणि खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून होते, आणि शहरातून फारच थोडे विद्यार्थी ज्यांना १२वी च्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडलेत आणि त्यामुळे शहरातील कॉलेजमधे प्रवेश न मिळालेले असे. थोडक्यात म्हणजे ओवाळून टाकलेले. पूजा
या दोन्ही कॅटेगिरी मधून आलेली नव्हती. एकतर ती शहरातून आलेली व इंग्रजी शाळेत शिकलेली हुशार मुलगी होती.
वपु म्हणायचे तसे सुंदर मुलीवर प्रेम करण्यासाठी डोक लागत नाही. त्याप्रमाणे पूजा कॉलेज मधील सर्वात सुंदर आणि
स्मार्ट मुलगी असल्यामुळे साहजिकच तिच्या पाठीमागे पहिल्या वर्षीपासूनच मजनू मुलांचा ससेमिरा लागलेला होता. पण ती लक्ष देत नसे.
आदित्य तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरातील मुलगा, तिच्यासोबतचज्युनियर कॉलेज मध्ये होता. तोही हुशार होता. एव्हाना पूजापेक्षाही
ज्यास्त हुशार होता असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळे पुणे शहरामधल्याएका प्रतिष्ठित इंजिनीरिंग कॉलेज मध्ये त्याला प्रवेश मिळाला होता. पुजाला पुण्यात इंजिनीरिंग साठी येण्याकरिता मनवन्यामध्ये त्याचा
सुद्धा मोठा रोल होता. त्यानेच पुजाच्या वडिलांना पुण्याच्या कॉलेज मध्ये
इंजिनीरिंग करण्यामध्ये खूप स्कोप आहे अस समजावून तयार केले होते.
जुनियर
कॉलेज मध्ये असताना पूजा आणि आदित्यने बराच वेळ सोबत घालवला होता... एकच कॉलेज,
एकच क्लास आणि अभ्यासही एकत्रच.. एकमेकांना एकमेकांच्या आवडी निवडींची चांगलीच ओळख
होती. They were like a Best Friends.
पुढे कॉलेज बदलल्या
मुळे थोडा दुरावा वाढला असेल तरी मोबाईल मुळे त्या दोघानाही ते जाणवलं नाही.
जवळपास रोजच ते एकमेकांशी बोलत असत एकमेकांच्या कॉलेज बद्दल गप्पा गोष्टी करत असत.
आदित्यला आपल्या कॉलेजचा खूप अभिमान होता, असायलाही हवा कारण पुण्यातल नामांकित
पहिल्या १० कॉलेज मधील कॉलेजमध्ये तो शिकत होता. पुजाला तो यावरून अधून मधून चिडवत
असे. पुजालाही हे पटत असे. कारण तिच्या कॉलेजच्या लोकल च्या पोरांचा जवळ पास रोज
कोण न कोण तिला फ्रेन्डशिप साठी किंवा रिलेशनशिप साठी प्रपोज करत असे. त्यामुळे का
असेना पण ती मान्य करीत असे. जणू काही जगातील एवढी एकच सुंदर मुलगी शिल्लक राहिली
आहे आणि तिला मिळविण्यासाठीचा पण प्रत्येकाने केला होता कदाचित.. कोणाकडे मदत
म्हणून कोणा मुलासोबत बोलली तरी दुसऱ्या दिवसापासून तिला त्या नावाने चिडवायला
सुरवात होत असे. अश्या मुलांच्या maturity ची कीव येवून सगळे असे प्रपोजल्स ती उडवून लावत
असे.
त्यामुळे
मोकळ्या गप्पा ज्या हकी असतील त्या ती आदित्य सोबतच करत असे.
गप्पा
वाढत होत्या.. आवडी निवडी जुळत होत्या.. भावना कळत होत्या. Hi.. Good
Morning मध्ये
असणारे Conversation आता Miss U... Need u मध्ये बदलले होते. आदित्य आजारी असला कि पूजा
काळजी करत असे आणि त्यालाही स्वत:ची काळजी करण्याबद्दल ओरडून सांगत
असे. फ्रेन्डशिप च्या पुढे जाणारी त्यांची मैत्री एकमेकांना संकेत देत होती. शेवटी
आदित्यने स्वता:हून पुढाकार घेऊन तिला प्रपोज केले. तिने लगेच होकार कळवला नाही
आणि तसा तिचा नकारही नव्हता. त्यामुळे ते रिलेशनशिप सेल्फ डीक्लेरड BF-GF मध्ये पोहचले.
कॉलेज
मध्ये पूजा चे मन रमत नसे. सोबती म्हणून मदत करणारी मैत्रीण किंवा मित्र तिला
कॉलेजमध्ये मिळत नव्हते. नाही म्हणायला फक्त अमर होता तिच्याच क्लास मध्ये जो तिला प्रक्टिकल
आणि सबमिशन मध्ये मदत करत असे. पूजाला होस्टेलचे जेवण आजीबात आवडत नसे त्यामुळे
अमर कधी कधी आपला टिफिन तिच्यासोबत शेअर करत असे. इतर मुलांप्रमाणे तो कधी flirt करून तिच्यासोबत
बोलत नसे. त्यामुळे पूजालाही त्याच्या सोबत बोलण्यात comfortable वाटत असे त्यामुळे
ती सुद्धा बऱ्याच वेळी अमरची मदत घेत असे.
अमरच्या
मित्रांनी त्याला हळू हळू चिडवण्यास आणि झाडावर चढवण्यास सुरवात केली होती. कॉलेज मधील सर्वात सुंदर आणि स्मार्ट मुलगी
फक्त त्याच्यासोबत बोलते याचे आश्चर्य जसे त्याच्या मित्रांकडून त्याला ऐकायला
मिळेल तसे तसे आपणही कोणीतरी स्पेशल आहोत याची त्याला जाणीव होऊ लागली. या ना त्या
कारणासाठी अगदी लहान सहन कारणांसाठीही तो पूजाला मदत करू लागे. पुजालाही त्याच्या
स्वभावामुळे कॉलेज मधला एकुलता एक मित्र या रूपाने मिळत होता त्यामुळे कधी कधी तिला
त्याच्यानावावरून Comment जरी आल्या तरी ती दुर्लक्ष करीत असे.
आदित्य
सोबत आपल्या कॉलेज बद्दलच्या गप्पा गोष्टी करत असताना पूजा कधी कधी अमर बद्दल बोलत
असे. पण जस जसा अमर चा उल्लेख तिच्या बोलण्यात ज्यास्त येऊ लागला तास तसे आदित्य
ला राग येत असे. अमर वरून आदित्य आणि पूजा मध्ये रुसवे फुगवे वाढू लागले. प्रत्येक
वेळो पूजा अमर हा फक्त आपला मित्र आहे याची खात्री आदित्य ला देत असे आणि त्याचा
राग कमी करत असे.
अमरला
याची जाणीव होत होती. पुजासोबतच्या बोलण्यातून त्याला आदित्य आणि पूजाच्या
रिलेशनशिप बद्दल आधीपासूनच कल्पना होती. आदित्य च्या अश्या वागण्याच्या त्याला
आश्चर्य वाटत असे आणि राग सुद्धा येत असे.
एक
दिवस आदित्य आणि पूजा मधील भांडण अगदी टोकाला पोहचले. त्यानंतर मात्र पूजाने
त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. बरेच दिवस बोलणे बंद झाले. त्रास
दोघानाही होत होता. पूजाला या मानसिक त्रासामध्ये पाहून अमर तिची ज्यास्तक काळजी
करू लागला. आणि शक्य तितका वेळ तो तिच्यासोबत तिचे दुख: कमी करण्यात तिला
समजावण्यात घालवू लागला. आदित्य रागावला होता.. त्याने ड्रिंक्स घ्यायला
सुरवात केली. आपल्या पट्टीच्या व्यसनी मित्रांना त्याने जवळ केले आणि त्यांच्या
व्यसनांनाही त्याने जवळ केले.
भावनेच्या
भरात आदित्य ने त्याच्या हातावर ब्लेडने पूजाचे नाव लिहून तिला पाठवला. त्याचा हा
वेडेपणा बघून, पूजाने त्याला स्वत: भेटून त्याची समजूत काढायचे ठरवले. भेटायला
जाताना त्याने अमरलाही सोबत नेण्याचे ठरवले जेणेकरून तिघांमध्ये असलेली गैरसमजूत
प्रत्यक्ष भेटून दूर करण्यात येईल.
आपल्या
Blood Tattoo ला पाहून पूजाला आपल्या प्रेमच जाणीव झाली असेल आणि ती भेटायला येत
असेल अशी आदित्यचीसमजूत झाली होती. पूजा भेटायला आल्यानंतर तिच्यासमोर पुन्हा एकदा
तिच्या नावाचा blood tattoo तिच्या समोरच काढून
तिला इम्प्रेस करून अमर पासून तिला दूर करायचे ठरवले.
भेटायला
आल्यानंतर त्याने पूजा सोबत अमर आल्याचे बघितले आन त्याच्या रागाचा पार चढला. पूजा
समोरच तो अमर वर धावून गेला. पूजाने त्या दोघांन थांबवण्याचा पप्रयत्न करू लागली.
आदित्य काही ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. रागाच्या भारत त्याने सोबत
आणलेल्या ब्लेडने अमर वर वार केले. पूजाने आरडा ओरडा करून मदतीला लोक बोलावले.
लोकांनी आदित्य आणि अमरला बाजूला केले.
अमरला हॉस्पिटल मध्ये आणि आदित्यला पोलिसांकडे घेऊन गेले. एवढा मोठा तमाशा झालेला
पाहून पूजा आतून हादरून गेली होती. पोलिसांनी तिघांच्या आई वडिलांना बोलावून
घेतले. आदित्यला त्याच्याच वडिलांनी पोलिसांसमोरच मुस्कटात ठेऊन द्यायला सुरवात
केली. पोलिसांनी त्यांची संजुत काढून त्यांना पाठवून दिले. आर्मी ऑफिसर असणाऱ्या
पुजाच्या वडिलांना तिची यात काहीच चुकी नसल्याची जाणीव होती. तिला या धक्यातून
बाहेर काढण्यासाठी तिला सोबत घेऊन ते काही दिवस आपल्यासोबत घेऊन गेले.
Bhava ekch no..
उत्तर द्याहटवा