सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

अस इथे चालत नाही

अस इथे चालत नाही
Dear X,
                खूप दिवसांनी पत्र लिहितोय तुला.  कदाचित १२ वर्षांनी. तू सध्या काय करत असशील याची उत्स्तुकता मला नाहीये पण सकाळी त्या चहाच्या टपरीवर चहा पिताना हातातून ग्लास निसटला आणि तुझी आठवण झाली. तसही बरच काही हातातून निसटल अस वाटतंय... आधी करियर निसटल.. नंतर तू नंतर मी स्वत:च, स्वतापासून निसटलो.
       सध्या माझ बर चाललाय अस मित्र म्हणतात..
       इथे सध्या सगळीकडे Semester किंवा Yearly Pattern सुरु आहेत. शिकवण्याचे , शिकायचे आणि पगाराचेही... पण माझ्या होम लोन देणाऱ्या बँकेला हा Pattern माहित नसावा त्यामुळे ते मला महिन्याच्या महिन्याला पैसे मागतात.  कदाचित माझ्या बापजाद्यांनी खूप काही मोठी संपत्ती माझ्या साठी राखून ठेवलीय अस कोणीतरी सांगितलं असावे.
       सध्या मी जॉब करतोय, बरेच लोक त्याला मास्तरकी म्हणतात काही जन त्याला पाट्या टाकणे सुधा म्हणतात. पण मला लहानपणा पासून याचा जॉब चा खूप आदर वाटतो. मग ते सगळे अस का म्हणतात मला कोणास ठावूक. खूप प्रगती झाली आहे आपल्या शिक्षण पद्धतीत.. आता आधी सारख नाही राहील आपल्यासारख ४ वाजता उठून अभ्यास करा वगेरे मोठी मोठी जाडजूड पुस्तके घेऊन. इथे एका छोट्याश्या मोबिईल वरच अभ्यास करतात अगदी दिवस रात्र. कधी कधी एकत्र अभ्यासही करतात specially संध्याकाळी... जसा जसा अंधार वाढत जाईल तसा तसा अभ्यास वाढत जातो.. मुल-मुली एकत्रच अभ्यास करतात बर का... पण अंधारात का अभ्यास करतात मला समजत नाही.
       इथे आता प्रत्यक्ष भेटून बोलाव लागत नाही. नवीन एक अप्लिकेशन आलाय Whatsup म्हणतात त्याला.. खूप मस्त आहे ते. अगदी आपण एकमेकांच्या शेजारी बसलो असलो तरी बोलण्याची गरज पडत नाही. फक्त बोटांचा खेळ. मी सुद्धा तेच वापरतो. आम्ही घरातही असाच करतो. आपापल्या रुममध्ये आम्ही बसलेलो असतो आणि msg करत राहतो. बोलत कोणीच नाही. त्यामुळे घरात खूप शांती आहे.
       विद्यार्थी सुद्धा आता प्राध्यापकांशी खूप मिळून मिसळून राहतात.. कधी कधी आम्ही एकत्र देखील “बसतो” एकाच टेबलावर.
       मला कधीकधी आश्चर्य वाटत कि इतके सगळे व्यवस्थित चाललेलं असताना कुठतरी काहीतरी निसटल्यासारख वाटत... कदाचित वेळ असेल.. कदाचित तुही असशील.. कदाचित मी..
       कधी मन उदास झाल कि मुव्ही पाहतो, मठात जातो.. इथे देवाला नमस्कार सुद्धा अगदी छोटा करावा लागतो. ते म्हणतात ना flying kiss त्या सारख. कारण देवालाही माहित आहे. या भक्तानेच पृथ्वी चालवण्याचा ठेका घेतला आहे कदाचित त्याला वेळ नसेल हात जोडण्या साठी.
का कोणास ठावूक.. तू सोबत नाहीस याच समाधान वाटत.. आपल्या दोघांना एकत्र अस वागण जमलं नसत.. उगाच Old Fashion म्हणून म्हणून चिडवून घ्यावे लागले असते...
 आठवण आली कि त्याच टपरी वर जातो जिथ बसून आपण चहा पीत पुस्तकांवरती गप्पा मारायचो..
इथ तसं चालत नाही ... इथ Corn Grill Sandwich खात खात गप्पा कराव्या लागतात.. कोण कोणासोबत कधी कसा काय करत होता ते

Yours Y


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा